Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : चांदोली परिसरात गव्यांचा वाढता उच्छाद; वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे हाल

चांदोली 4 अभयारण्य परिसरात वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर दिवसेंदिवस वाढत चालला असून, शाहूवाडी तालुक्यातील उखुळ  येथे गव्याने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत दोन शाळकरी मुलांसह तिघे जण जखमी झाले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 09, 2026 | 06:33 PM
Kolhapur News : चांदोली परिसरात गव्यांचा वाढता उच्छाद; वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे हाल
Follow Us
Follow Us:
  • चांदोली परिसरात गव्यांचा वाढता उच्छाद
  • वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांचे हाल
कोल्हापूर : चांदोली 4 अभयारण्य परिसरात वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतील वावर दिवसेंदिवस वाढत चालला असून, शाहूवाडी तालुक्यातील उखुळ  येथे गव्याने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत दोन शाळकरी मुलांसह तिघे जण जखमी झाले. संजय बाळू वडाम वय 40 हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्या उदासीनतेबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटना स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, संजय बाळू वडाम हे त्यांचा मुलगा आदर्श संजय वडाम वय 11आणि पुतण्या अनुज नथुराम वडाम वय १४) यांच्यासह मणदूर येथे कामानिमित्त गेले होते. काम आटोपून संध्याकाळी 7.15 च्या सुमारास ते मोटारसायकलवरून घरी परतताना ही घटना घडली.

जखमींना उपचारासाठी कोल्हापूरला हलवले
मानवी वस्तीजवळ असलेल्या उखुळ येथील मुख्य रस्तावर मानवी वस्ती लगत अचानक चांदोली अभयारण्यातून आलेल्या गव्याने त्यांच्या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत संजय वडाम रस्त्याच्या कडेला फेकले गेले, त्यांच्या खुब्याला गंभीर दुखापत झाली आहे. सोबत असलेली दोन्ही मुलेही या अपघातात जखमी झाली. घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने धाव घेत जखमींना खासगी वाहनाने प्राथमिक आरोग्य केंद्र, शितूर येथे दाखल केले.तेथे संजय वडाम यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला पाठवण्यात आले, तर दोन्ही मुलांवर प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.

Kolhapur News : कॅन्सर रुग्णांसाठी आशेचा किरण; ‘आरोग्य मित्र’ संकल्पनेतून साकारतंय कॅन्सर हॉस्पिटल

महिनाभरात सातवी घटना; वनविभाग सुस्त
गेल्या महिन्याभरात या परिसरात गव्याने हल्ला करण्याची किंवा धडक देण्याची ही सहावी ते सातवी घटना आहे.
गव्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, इतक्या घटना घडूनही वनविभागाचे अधिकारी याकडे गांभीर्याने पाहायला तयार नाहीत.
जखमींना वेळेवर मदत मिळणे तर लांबच, पण माहिती देऊनही वनविभागाची गाडी वेळेवर उपलब्ध झाली नाही.
आमची गाडी जंगलात गेली आहे, आल्यावर पाठवतो, असे बेजबाबदार उत्तर वनविभागाकडून मिळाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

प्रशासकीय दिरंगाई व भौगोलिक अडचण
उखुळ गावाची वन्यजीव विभागाची कार्यालयीन व्यवस्था ही 40 किमी अंतरावर असलेल्या आंबा येथून चालते.भौगोलिक परिस्थिती पाहता, उखुळ हे वारणावती येथील वन्यजीव कार्यालयापासून अवघ्या 3 किमी अंतरावर आहे.त्यामुळे हे गाव वारणावती कार्यालयाला जोडावे, अशी मागणी वारंवार करूनही वनविभागाने याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.

आम्ही वारंवार वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधत आहोत. त्यांना गावात येऊन परिस्थितीची पाहणी करण्याची आणि स्थानिकांच्या समस्या समजून घेण्याची विनंती केली आहे. मात्र, अधिकारी या भागात फिरकायलाही तयार नाहीत. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे लोकांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.
– भाग्यश्री थोटफळ सरपंच, उखुळ

न्यायालयाने आदेश देवूनही ‘जैसे थे’ परिस्थिती
मुंबई हायकोर्टाने गेल्या गुरुवारी काही उपाययोजना सुचवले असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करावी असा आदेश असताना देखील आज अखेर कोणत्याही आदेशाची अंमलबजावणी केली नाही. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणीला आता फक्त अवघे ३ दिवस उरले आहेत. या ३ दिवसात वनविभाग काय निर्णय घेते कि अणखीण काही विपरीत घडते की काय? हे आता काळच ठरव शकते.

Sangali News : थकीत बिलं, शिक्षकांचा संताप, शाळा बंद आंदोलनाचा इशारा; जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण

Web Title: Kolhapur news increasing number of cows in chandoli area citizens plight due to laxity of the forest department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Marathi News
  • navrashtra news

संबंधित बातम्या

Abhijeet Dipke Update:  ‘देश जागा होतोय…’; जंतर मंतरवरील व्हिडीओ शेअर करत अभिजीत दिपकेंची गर्जना
1

Abhijeet Dipke Update: ‘देश जागा होतोय…’; जंतर मंतरवरील व्हिडीओ शेअर करत अभिजीत दिपकेंची गर्जना

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल
2

Nagpur News: MRP पेक्षा जास्त पैसे आकारणाऱ्या दुकानदारांवर कारवाई; नागपुरात 20 दुकानांवर गुन्हे दाखल

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी
3

Vijay Singh: टाटा ट्रस्ट्समध्ये मोठा बदल! विजय सिंग ऑगस्टमध्ये सोडणार जबाबदारी

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी
4

Raigad News: वारस नोंद प्रक्रियेतील बदलामुळे नागरिक हैराण; जुनी पद्धत पुन्हा लागू करण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.