
Kolhapur News, Shahuwadi News, Udaysing Gaikwad, Cooperative Sugar Factory
उदयसिंग गायकवाड यांनी सुरू केलेला साखर कारखाना सोडला तर इथं म्हणावा तसा सहकारही उभा राहू शकलेला नाही. तरुणांच्या हाताला कामधंदा नाही. शेतीवर अवलंबून असलेली अर्थव्यवस्था तोकडी ठरत चालली आहे. प्रक्रिया उद्योग, पर्यटनावर आधारित रोजगार निर्मिती किंवा उद्योगधंदे याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. परिणामी या तालुक्यातल्या बेरोजगार युवकांचे लोंढेच्या लोंढे हे पुण्या-मुंबईसारख्या महानगरांकडे वळत आहेत. गावं ओस पडत आहेत आणि तरुण पिढी हळूहळू गावांपासून तुटत चालली आहे.
“मुंब्रा हिरवे करण्याचा उद्देश राजकीयच…”, किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर Sahar Sheikh यांचा माफीनामा
दुसरीकडे वन्य प्राण्यांचा वाढता धोकाही शाहुवाडीकरांच्या रोजच्या जगण्याचा भाग बनला आहे. वाघ, बिबट्या, डुक्कर, गवे यांच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त होत आहे. शेकडो एकर जमीन पिकांवाचून पडून आहे. रात्री तर सोडाच, दिवसा शेतात जाण्याचीही भीती वाटते. अनेक ठिकाणी या दहशतीमुळे वाड्या-वस्त्यांवरील मुलांच्या शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. शिक्षणाचा प्रश्न इथे केवळ शैक्षणिक न राहता सुरक्षिततेचा प्रश्न बनला आहे.
गेल्याच महिन्यात गव्याच्या हल्ल्यात जखमी झालेला एक शेतकरी आपला जीव वाचवण्यासाठी पोटातली आतडी हाताने सावरत पळत होता. नशीब बलवत्तर म्हणून तो कसाबसा वाचला. आतापर्यंत गव्याच्या हल्ल्यांत एक शेतकरी, बिबट्याच्या हल्ल्यांत दोन लेकरं दगावली आहेत. आम्ही आमची लेकरं-बाळं ही वन्य प्राण्यांच्या घशात घालण्यासाठी जन्माला घालतो आहोत का.? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संबंधित कुटुंबांना मदतीचे धनादेश दिले म्हणजे लोकप्रतिनिधींची जबाबदारी संपते का.? हा खरा प्रश्न आहे. शेतीच्या, लोकांच्या सुरक्षेचं काय.? यावर कोण बोलणार.?
तालुक्यातल्या दोन-तीन प्रमुख बाजारपेठा सोडल्या तर आजही अनेक भागांतील प्रमुख गावांमध्ये साधा आठवडी बाजार भरत नाही. आठवड्याच्या बाजारासाठीसुद्धा लोकांना बाजूच्या तालुक्यातील बाजारपेठांमध्ये जावे लागते. याला दुर्दैव म्हणावे का.? दुसरे काय.? दळणवळणाच्या सोयी-सुविधा वाढवाव्यात, आपल्या गावात, भागात मार्केट उभं राहावं. यासाठी कोणीच प्रयत्न करताना दिसत नाही. दुर्दैवाने या तालुक्यात म्हणावी तशी व्यासायिक प्रशिक्षण देणाऱ्या शाळा, कॉलेजेस सुद्धा उभी राहिलेली नाहीत.
Chandrapur Congress Conflict: चंद्रपूर काँग्रेसमध्ये फूट… हर्षवर्धन सपकाळांनी स्पष्टचं सांगितलं
या निवडणुकीत रोजगार, आरोग्य, शिक्षण, बाजारपेठा, वन्य प्राण्यांपासून सुरक्षितता, बेरोजगार तरुणांचे इतरत्र होणारे स्थलांतर यावर बोलायला कोणीच तयार नाही.? दीर्घकालीन विकास आराखडा खरंतर कुणाकडेच दिसत नाही. मात्र इथल्या सर्वसामान्य जनतेतून ‘राजकारणाच्या पलीकडे जाऊन लोकांच्या जगण्याला केंद्रस्थानी ठेवणारा विकास होईल का.?’ हा भोळा-भाबडा प्रश्न विचारला जात आहे.
विकास म्हणजे फक्त रस्ते, हॉल आणि गटर्स एवढाच असतो का.? रस्ते आवश्यक आहेत, पण रस्त्यांवर चालणारा माणूस बेरोजगार असेल, तर तो विकास कसला.? प्रश्न अनेक आहेत, पण त्यावर ठोस उत्तर देणाऱ्या नेतृत्वाचा मात्र अभाव प्रकर्षाने जाणवतो.
निवडणुकीला उभे रहायचे. निवडून आले की ठेकेदार निर्माण करायचे, पोसायचे. त्यातून पैसा कमवायचा आणि पैशातून पुन्हा सत्ता. आपण मतदानातून हेच चक्र सुरू राहणार असेल तर आपण निवडणुकीत नेमकं मतदान करतोय की राजकारणातल्या बदमाशीवर शिक्कामोर्तब करतोय. हे ही मतदार राजाने आपल्या सद्सदविवेक बुद्धीला विचारायला पाहिजे.