Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : इराण-इस्त्रायल युद्धाचा फटका; कोल्हापुरात गॅस दरवाढीमुळे रिक्षाचालकांना संताप

इस्त्रायल आणि इराणच्या युद्धामुळे इंधनावर देखील याचा मोठा परिणाम झाल्याचं दिसून आलं आहे. इंधनाच्या तुटवडा आणि दरवाढीमुळे कोल्हापुरात रिक्षाचालक संतप्त झाले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 13, 2026 | 04:26 PM
Kolhapur News : इराण-इस्त्रायल युद्धाचा फटका; कोल्हापुरात गॅस दरवाढीमुळे रिक्षाचालकांना संताप
Follow Us
Follow Us:
  • इराण-इस्त्रायल युद्धाचा फटका;
  • कोल्हापुरात गॅस दरवाढीमुळे रिक्षाचालकांना संताप
कोल्हापूर : लिशा हॉटेल परिसरातील ‘कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेड’ च्या पंपावर रिक्षा गॅसच्या दरात अचानक आणि भरमसाठ वाढ केल्याने गुरुवारी रिक्षाचालकांचा संयम सुटला. काही दिवसांपूर्वी ४३ रुपये दराने मिळणारा गॅस थेट ८० रुपयांवर पोहोचल्याने संतापलेल्या सुमारे २०० रिक्षाचालकांनी पंपावर घेराव घातला. तासातासाला बदलणाऱ्या दरांबाबत कर्मचाऱ्यांना जाब विचारण्यात आल्याने परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता.

लुटीचा कळस; ७५ चा गॅस थेट ८० वर; रिक्षाचालकांत संताप
सकाळपासूनच या पंपावर दरांचा खेळ सुरू होता. रिक्षाचालकांच्या मते, सकाळी ७५ रुपये दराने मिळणारा गॅस अवध्या – काही वेळातच ८० रुपये करण्यात आला. दहा-दहा मिनिटाला रेट कसे काय वाढतात? ही सामान्य रिक्षाचालकांची सरळ – सरळ लूट आहे, असा संताप व्यक्त करत रिक्षाचालकांनी पंप परिसरात रिक्षा उभ्या करून निदर्शने केली. यामुळे पंपावरील गॅस विक्री पूर्णपणे बंद पडली.

आंबा, काजू नुकसानग्रस्तांना नैसर्गिक आपत्ती घोषित करा; राजू शेट्टींची मागणी

माघार न घेण्याचा रिक्षाचालकांचा पवित्रा
रिक्षा संघटनेचे अध्यक्ष राजू जाधव यांनी या प्रकाराचा तीव्र निषेध केला. ते म्हणाले की, गेल्या आठ दिवसांपासून हे दरवाढीचे सत्र सुरू आहे. गॅस दरवाढ झाली असेल तर त्यासंबंधीचे अधिकृत कंपनीचे पत्र किंवा ईमेल आम्हाला दाखवावा, अशी मागणी आम्ही केली, मात्र कर्मचाऱ्यांनी असे कोणतेही कागदपत्र दाखवण्यास स्पष्ट नकार दिला. मग ही दरवाढ नेमकी कोणाच्या आदेशाने सुरू आहे, असा सवाल संतप्त चालकानी विचारला. जोपर्यंत दरवाढीचा ठोस खुलासा मिळत नाही आणि दर कमी होत नाहीत, तोपर्यंत माधार घेणार नाही, असा पवित्रा रिक्षाचालकांनी घेतला होता,

जागतिक परिस्थितीचे कारण; रिक्षावाल्यांचे कंबरडे मोडले
या गोंधळाबाबत कंपनीच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात इंधन टंचाई निर्माण झाली आहे. आयातीचे दर वाढल्याने त्याचा थेट परिणाम गॅस दरावर झाला आहे. महाराष्ट्रातील सर्व शहरांत हेच दर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले, मात्र, ही दरवाढ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने रिक्षा व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे.

Kolhapur News : शेतीचा खर्च, मजुरांची टंचाई… बळीराजाने लढवली शक्कल, भर उन्हात माळरानावर तरारले भुईमूग

Web Title: Kolhapur newsimpact of iran israel war rickshaw drivers angry over gas price hike in kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • Iran Israel Conflict
  • kolhapur news

संबंधित बातम्या

Election Commission Controversy : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका; SIR थांबवण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?
1

Election Commission Controversy : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात थेट हायकोर्टात याचिका; SIR थांबवण्याची मागणी, नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.