कोल्हापूर: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी असलेल्या पन्हाळगड्याचे महत्व देशभरात कायम टिकून राहणार हा इतिहासाचा वारसा जपण्यासाठी शासन कुठेही कुठलाही निधी कमी पडून देणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ऐतिहासिक पन्हाळगडावर पन्हाळा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर, तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खा. धनंजय महाडिक, खा. धैर्यशील माने, आ. विनय कोरे, आ. प्रकाश आवाडे, आ. अशोकराव माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी के. कार्तिकायन, महापालिकेचे आयुक्त के. मंजूलक्ष्मी आदी यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, इतिहासामध्ये एक काळ असा होता मुघलांचा अतिरिकपणा मराठी शाही उद््ध्वस्त करण्याचा औरंगजेबचा प्लॅन अशा परिस्थितीमध्ये जिजाऊ माँ साहेबांनी त्यांना घडवलं. अनेक जातीच्या लोकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये जागृती करून या ठिकाणी स्वराज्याची स्थापना केली. छत्रपती होते म्हणून आपण आहोत, छत्रपती नसते तर आपल्यापैकी कोणीच या ठिकाणी दिसलो नसतो आणि म्हणूनच आज छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहेत.
छत्रपती शिवरायांनी मराठ्यांची फौज तयार करून अटकेपार झेंडा फडकवला
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल बोलायच झाले तर महापराक्रमी परमप्रतापी शंभू राजा होते. छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा ताराराणी असतील छत्रपती शिवरायांनी काही केलं असेल तर असंख्य मराठ्यांची फौज तयार केली, ज्या सेनेने अटकेपार झेंडा फडकवला आणि हिंदवी स्वराज्य हे अटकेपार नेण्याचं काम केलं हा छत्रपती शिवाजी महाराजांचे या ठिकाणी तेज होतं आणि पन्हाळगडाची जी लढाई आहे.
..तर तुमच जीवन कधीच पूर्ण होणार नाही
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, थ्रीडी मोमेंट या ठिकाणी तयार केली आहे. ही खरंतर ज्या ज्या इंजिनियरने ज्या ज्या कन्सल्टंट ज्या-ज्या कॉन्स्ट्रक्टरनी हे काम केलंय त्यांचं मनापासून आभार मानतो. इतिहासामध्ये कशाप्रकारे एखाद्या गडाचा इतिहास आणि आपला जाजवल्य महाराजांचा इतिहास हा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकेल त्याचं उदाहरण म्हणजे या ठिकाणी तयार झालेले वातावरण आहे. जगभरातील प्रेमींना विनंती आहे, जसा आपण म्हणतो रायगडावर गेलो नाही तर आपलं जीवन हे पूर्ण होऊ शकत नाही. स्वराज्याची ती राजधानी आहे, पण आता मी म्हणतो स्वराज्याच्या उपराजधानीत येऊन हा सिनेमा या ठिकाणी पाहिला नाही, तर तुमचं जीवन कधीच पूर्ण होणार नाही अशा प्रकारचा अनुभव या ठिकाणी एवढाच नाही.