Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऊसदराची कोंडी कोण फोडणार? पहिली उचल किती मिळणार? कारखानदारांच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष

गळीत हंगामाचे पडघम वाजू लागले, कारखान्यांच्या धुराड्यांची तयारी सुरू झाली; मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष किती पैसे पडणार, हा कळीचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 25, 2026 | 03:25 PM
ऊसदराची कोंडी कोण फोडणार? पहिली उचल किती मिळणार? कारखानदारांच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष

ऊसदराची कोंडी कोण फोडणार? पहिली उचल किती मिळणार? कारखानदारांच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष

Follow Us
Follow Us:
  • ऊस उत्पादकांची प्रतिटन ५ हजार रुपये दराची मागणी
  • गळीत हंगाम सुरू होण्याआधी पहिली उचल जाहीर करण्याची प्रतीक्षा
  • वाढता उत्पादन खर्च आणि ऊसदरावरून शेतकऱ्यांमध्ये चिंता
गारगोटी/अजित यादव : गळीत हंगामाचे पडघम वाजू लागले, कारखान्यांच्या धुराड्यांची तयारी सुरू झाली; मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात प्रत्यक्ष किती पैसे पडणार, हा कळीचा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे. एकीकडे खतांचे वाढते दर, महागडी मशागत, मजुरी, तोडणी आणि वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला आहे, तर दुसरीकडे कर्जाचे हप्ते, घरखर्च आणि पुढील हंगामाची आर्थिक जुळवाजुळव करण्याचे आव्हान उभे आहे. अशा परिस्थितीत ऊसदराची कोंडी कोणता साखर कारखाना फोडणार आणि पहिली उचल किती जाहीर करणार, याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादकांचे लक्ष लागले असून शेतकऱ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, शेतकरी संघटनांनी प्रतिटन ५ हजार रुपये दर जाहीर करावा या मागणीसाठी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे.

ठोस निर्णयाची प्रतीक्षा! 

साखर कारखानदारी ही केवळ कारखानदारांची आर्थिक उलाढाल नाही, ती हजारो शेतकरी कुटुंबांच्या जगण्याशी जोडलेली व्यवस्था आहे. त्यामुळे कारखान्यांनी आर्थिक परिस्थितीचा विचार करतानाच ऊस उत्पादकांच्या वाढत्या खर्चाचीही दखल घेणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाला न्याय देणारा दर, वेळेत ऊस बिल अदा करण्याची हमी या बाबी महत्त्वाच्या ठरणार असून शेतकरी ठोस निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत.

कारखान्यांची तयारी जोरात; दराच्या घोषणेचे काय?

कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या साखर उद्योगाचा गळीत हंगाम म्हणजे शेतकऱ्यांच्या आर्थिक चक्राला गती देणारा महत्त्वाचा काळ. मात्र, हंगामाची तयारी आणि प्रत्यक्ष ऊसदर यामध्ये मोठे अंतर राहू नये, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. कारखान्यांकडून गाळपाचे नियोजन, यंत्रसामग्रीची तयारी आणि ऊसतोडणीचे नियोजन सुरू असताना पहिली उचल जाहीर करण्याबाबत नेमकी भूमिका काय, हा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरवर्षी गळीत हंगामाच्या तोंडावर ऊसदराची चर्चा रंगते. शेतकरी संघटना, कारखानदार आणि सहकार क्षेत्रातील नेत्यांच्या भूमिकांकडे सर्वांचे लक्ष लागते. मात्र, प्रत्यक्ष दर जाहीर होईपर्यंत शेतकऱ्यांच्या मनातील संभ्रम कायम राहतो. यंदाही हीच परिस्थिती निर्माण झाली असून, दराच्या घोषणेत पुढाकार कोण घेणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

हिशेब जुळवायचा कसा?

ऊस लागवडीपासून पीक कारखान्यापर्यंत पोहोचेपर्यंत शेतकऱ्याला मोठा आर्थिक भार सहन करावा लागतो. जमिनीची मशागत, बेणे, खते, कीटकनाशके, पाणी व्यवस्थापन, मजुरी, तोडणी आणि वाहतूक या प्रत्येक टप्प्यावर खर्च करावा लागतो. त्यात हवामानातील बदल, रोगराई आणि उत्पादनातील अनिश्चितता यांची भर पडते. वर्षभर शेतात राबल्यानंतरही हातात पुरेशी रक्कम उरण्याची खात्री नसल्याने शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. ऊस बिलातूनच अनेक शेतकरी कर्जफेड, मुलांचे शिक्षण, कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि पुढील पिकासाठी लागणाऱ्या खर्चाची तरतूद करतात. त्यामुळे ऊसदर कमी पडल्यास त्याचा परिणाम केवळ एका हंगामापुरता मर्यादित राहत नाही: तर संपूर्ण वर्षाच्या आर्थिक नियोजनावर होतो. ऊस पिकविण्याचा खर्च शेतकऱ्याने सोसायचा आणि दराबाबत मात्र प्रतीक्षा करायची, ही परिस्थिती किती दिवस चालणार? असा सवाल ऊस उत्पादकांच्या वर्तुळातून उपस्थित होत आहे.

हे सुद्धा वाचा : मध्य प्रदेशातून गावठी पिस्तूल आणून संभाजीनगरमध्ये विक्री, सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश; तब्बल…

पहिली उचल ठरणार प्रतिष्ठेचा मुद्दा! 

जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये पहिली उचल जाहीर करण्यावरून चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. एखाद्या कारखान्याने समाधानकारक दर जाहीर केला, तर इतर कारखान्यांवरही आपली भूमिका स्पष्ट करण्याचा दबाव वाढू शकतो. त्यामुळे यंदा पहिली उचल जाहीर करणारा कारखाना कोणता आणि तो किती दर देणार, याबाबत शेतकरी, ऊसतोड मजूर, वाहतूकदार आणि सहकार क्षेत्रातील जाणकारांमध्ये चर्चा सुरू आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची यंदाची प्रमुख मागणी काय आहे?

    Ans: कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांनी प्रतिटन ५ हजार रुपये ऊसदर जाहीर करण्याची मागणी केली आहे. यासाठी शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

  • Que: यंदाच्या गळीत हंगामात ऊसदराचा प्रश्न का महत्त्वाचा ठरत आहे?

    Ans: खते, मशागत, मजुरी, तोडणी आणि वाहतुकीचा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांवरील आर्थिक भार वाढला आहे. ऊस बिलातूनच कर्जफेड, घरखर्च, मुलांचे शिक्षण आणि पुढील हंगामाची तयारी केली जात असल्याने योग्य ऊसदर मिळणे महत्त्वाचे आहे.

  • Que: कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना कोणत्या घोषणेची प्रतीक्षा आहे?

    Ans: साखर कारखाने गळीत हंगामाच्या तयारीला लागले असून, कोणता कारखाना सर्वप्रथम पहिली उचल जाहीर करणार आणि प्रतिटन किती दर देणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. दराची अधिकृत घोषणा झाल्यानंतर इतर कारखान्यांवरही दबाव वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Farmers in kolhapur district have become aggressive over sugarcane prices nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 25, 2026 | 03:25 PM

Topics:  

  • Farmers
  • In Kolhapur
  • Sugarcane Bill

संबंधित बातम्या

Purandar Airport : विमानतळ भूसंपादनात ‘रात्रीच्या व्यवहारां’ची चर्चा; शासकीय विश्रामगृहातील कथित मोबदला वाटपावर आरोप
1

Purandar Airport : विमानतळ भूसंपादनात ‘रात्रीच्या व्यवहारां’ची चर्चा; शासकीय विश्रामगृहातील कथित मोबदला वाटपावर आरोप

Jayant Patil: ‘पाच हजारांची मदत अत्यल्प; शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारने हात मोकळे सोडावेत’, जयंत पाटील यांची मागणी
2

Jayant Patil: ‘पाच हजारांची मदत अत्यल्प; शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी सरकारने हात मोकळे सोडावेत’, जयंत पाटील यांची मागणी

Dharashiv farmers: धाराशिवमध्ये पीक विमा योजनेला मोठा प्रतिसाद! ४ लाख ७९ हजार अर्ज, २,५०७ कोटींचे विमा संरक्षण
3

Dharashiv farmers: धाराशिवमध्ये पीक विमा योजनेला मोठा प्रतिसाद! ४ लाख ७९ हजार अर्ज, २,५०७ कोटींचे विमा संरक्षण

‘शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई द्या’; छत्रपती संभाजीनगरातून सुप्रिया सुळेंची मागणी
4

‘शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई द्या’; छत्रपती संभाजीनगरातून सुप्रिया सुळेंची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.