
नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या कामामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती, विहिरी आणि अन्य मालमत्ता बाधित झाली होती. या महामार्गाच्या बहुतांश टप्प्यांमध्ये शेतकऱ्यांना चौपट दराने मोबदला देण्यात आला होता. मात्र अंकली ते चोकाक या सुमारे 33 किलोमीटरच्या टप्प्यात अधिग्रहित जमीनधारक शेतकऱ्यांना केवळ दुप्पट दराने भरपाई देण्याचा प्रस्ताव असल्यानं शिरोळ व हातकणंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला होता. या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांनी मोर्चे, आंदोलने करून महामार्गाचे कामही अनेकदा बंद पाडले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रश्नावर सकारात्मक निर्णय घेत या 33 किलोमीटरच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना चौपट दर देण्यास मंजुरी दिली आहे.या निर्णयामुळे महामार्गासाठी वाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्या शेतीच्या नुकसानाची योग्य भरपाई मिळणार आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक मानला जात आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यड्रावकर यांनी बाधित शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि शासन पातळीवर हा विषय प्रभावीपणे मांडला. त्यांनी राज्य शासनाकडे निवेदन सादर करून याच महामार्गासाठी इतर भागात चौपट दर मिळत असताना शिरोळ व हातकणंगले मतदारसंघातील शेतकऱ्यांना दुप्पट दर देणे हा गंभीर अन्याय आहे. त्यामुळे संबंधित विभागाची तातडीची बैठक घेऊन शेतकऱ्यांना समान न्याय द्यावा, अशी ठाम मागणी केली.
नागपूर-रत्नागिरी महामार्गातील अंकली ते चोकाक या 33 किमी भागात 937 खातेदार – असून, दुप्पट दराने केवळ 94 कोटी रुपये मिळणार होते. मात्र आमदार पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नाने शासनाने चौपट दरास मंजुरी दिल्याने शेतकऱ्यांना एकूण 171 कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सुमारे 76 कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे.
Ans: इतर टप्प्यांप्रमाणेच अंकली–चोकाक टप्प्यातील शेतकऱ्यांनाही चौपट दराने नुकसानभरपाई मिळावी, ही शेतकऱ्यांची दीर्घकालीन मागणी होती.
Ans: या 33 किमी टप्प्यासाठी शेतकऱ्यांना केवळ दुप्पट दराने मोबदला देण्याचा प्रस्ताव होता.
Ans: शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.