Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prakash Abitkar : आता महागड्या तपासण्यांचा खर्च वाचणार! पालकमंत्री प्रकाश आबिटकरांची कोल्हापूरला मोठी भेट

Prakash Abitkar : कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात आता अत्याधुनिक MRI, CT Scan, IPHL लॅब आणि यलो फीवर लसीकरण सुविधा सुरू झाली आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या सुविधांचे लोकार्पण करण्यात आले.

  • By विवेक
Updated On: Oct 31, 2026 | 09:44 PM
Prakash abitkar

Prakash abitkar

Follow Us
Follow Us:
  • कोल्हापूरच्या सेवा रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे लोकार्पण
  • MRI आणि CT Scan सुविधेमुळे रुग्णांना मोठा दिलासा
  • पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सुविधांचे उद्घाटन
 

कोल्हापूर : आता महागड्या वैद्यकीय तपासण्यांसाठी खासगी रुग्णालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज कमी होणार आहे. कोल्हापूरच्या कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये MRI, CT Scan, IPHL लॅब आणि यलो फीवर लसीकरण केंद्राचा समावेश आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या सुविधांचे लोकार्पण करण्यात आले. (Prakash Abitkar)

शासकीय रुग्णालयांमध्येही खासगी रुग्णालयांच्या तोडीच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात, हा शासनाचा प्रयत्न असल्याचे मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले. सर्वसामान्य नागरिकांना मोफत किंवा माफक दरात दर्जेदार उपचार मिळावेत, यावर आरोग्य विभागाचा भर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाला खासदार शाहू महाराज छत्रपती, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महापौर रुपाराणी निकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उजनीतील ऊर्जा प्रकल्पांविरोधात जनक्षोभ! महामार्गावर रास्ता रोको; Rohit Pawar आक्रमक, म्हणाले…

कोल्हापूरला मेडिकल हब बनवण्याचा प्रयत्न

कोल्हापूरला मेडिकल हब म्हणून विकसित करण्यासाठी शासकीय रुग्णालयांमध्ये टप्प्याटप्प्याने अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सेवा रुग्णालयात आगामी काळात कॅन्सर निदान आणि उपचार सुविधाही सुरू करण्याचे नियोजन आहे.

याशिवाय ब्रेन स्ट्रोक सेंटर, कॅन्सर सर्जरीसाठी ऑन्कोलॉजी विभाग आणि कॅथलॅब सुरू करण्याची तयारी असल्याची माहिती आबिटकर यांनी दिली.

शेंडा पार्कमध्ये ५०० बेडचे रुग्णालय

शेंडा पार्क येथे मित्रा संस्थेच्या सहकार्याने ५०० बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे. तसेच २०० बेडचे कॅशलेस रुग्णालय सुरू करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयाची क्षमता १०० वरून २०० बेडपर्यंत वाढवण्यात येणार आहे. इचलकरंजीच्या आयजीएम रुग्णालयातही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहेत.

यलो फीवर लसीकरण केंद्राचा अनेक जिल्ह्यांना फायदा

सेवा रुग्णालयात यलो फीवर लसीकरण केंद्र सुरू झाल्याने कोल्हापूरसह आसपासच्या पाच ते सहा जिल्ह्यांतील नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.

खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी या सुविधांचा लाभ सर्वसामान्य रुग्णांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर राजेश क्षीरसागर यांनी खासगी रुग्णालयांमधील महागड्या तपासण्यांचा आर्थिक भार कमी होण्यास या सुविधांची मदत होईल, असे सांगितले.

एकंदरीत, सेवा रुग्णालयातील या नव्या सुविधांमुळे कोल्हापूर आणि परिसरातील रुग्णांसाठी उपचारांच्या नव्या सोयी उपलब्ध झाल्या आहेत. आता या सुविधा प्रत्यक्षात किती प्रभावीपणे रुग्णांपर्यंत पोहोचतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

Pune Water: विरोधात असताना आंदोलन, आता सत्तेत मौन; पुणेकरांवर एक दिवसाआड पाणीपुरवठ्याचे संकट?

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोल्हापूरच्या सेवा रुग्णालयात कोणत्या नवीन सुविधा सुरू झाल्या आहेत?

    Ans: सेवा रुग्णालयात अत्याधुनिक MRI, CT Scan, IPHL लॅब आणि यलो फीवर लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.

  • Que: सेवा रुग्णालयातील नवीन सुविधांचा फायदा कोणाला होणार आहे?

    Ans: कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यासह आसपासच्या पाच ते सहा जिल्ह्यांतील नागरिकांना या सुविधांचा लाभ होणार आहे.

  • Que: कोल्हापुरात आणखी कोणत्या आरोग्य सुविधा सुरू होणार आहेत?

    Ans: ब्रेन स्ट्रोक सेंटर, कॅन्सर सर्जरीसाठी ऑन्कोलॉजी विभाग, कॅथलॅब आणि शेंडा पार्क येथे ५०० बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे नियोजन आहे.

Web Title: Prakash abitkar kolhapur seva hospital mri ct scan modern health facilities launch vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2026 | 09:41 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Medical Sector
  • Prakash Abitkar

संबंधित बातम्या

Arogya Samvad Yatra: नांदेडमधून राज्यव्यापी ‘आरोग्य संवाद यात्रेला’ सुरुवात; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर साधणार जनतेशी थेट संवाद
1

Arogya Samvad Yatra: नांदेडमधून राज्यव्यापी ‘आरोग्य संवाद यात्रेला’ सुरुवात; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर साधणार जनतेशी थेट संवाद

Kolhapur News: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड लांबणीवर; कोरमअभावी सभा तहकूब
2

Kolhapur News: गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाची निवड लांबणीवर; कोरमअभावी सभा तहकूब

Gokul Milk Chairman Election 2026: गोकुळच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; फडणवीसांच्या भेटीपूर्वीच सतेज पाटलांचा मोठा डाव
3

Gokul Milk Chairman Election 2026: गोकुळच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; फडणवीसांच्या भेटीपूर्वीच सतेज पाटलांचा मोठा डाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.