
वाई : महावितरण कंपनीच्यानवीन कृषी पंप धोरणाविरोधात वाईतालुक्यातील शेतकरी आक्रमक झालेअसून, त्यांनी थेट सोलर पॅनेलच प्रतिकृती घेऊन आंदोलन केले आहे. पारंपरिक वीजकनेक्शन बंद करून थेट सौर ऊर्जेवरचालणारे 7.5 एच.पी. क्षमतेचे पंपकनेक्शन देण्याच्या शासनाच्या निर्णयामुळे पश्चिममहाराष्ट्रातील,विशेषतः वाई, साताराआणि कराड तालुक्यातील नदीकाठच्याशेतकऱ्यांपुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. गेल्या काही महिन्यांपासून महावितरण कंपनीने शेतीपंपांसाठी नवीन वीजकनेक्शन देणे पूर्णपणे थांबवले आहे. याला पर्याय म्हणून शासनाने ‘मागेलत्याला सौर कृषी पंप’ योजनेअंतर्गत 7.5 एच.पी. क्षमतेपर्यंतचे सौर पंप देण्याचानिर्णय घेतला. हा निर्णय वीज वितरण व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचा असला तरी, या धोरणाने अनेक व्यावहारिक अडचणी निर्माण केल्या आहेत. नदीपात्रातून पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जा प्रणाली व्यावहारिक नाही. त्यांना पारंपरिक वीज कनेक्शनचीच आवश्यकता आहे, असे शेतकऱ्यांचे मत आहे.
विद्युत वितरण नियंत्रण समितीचे सदस्य स्वप्निल गायकवाड यांनी या धोरणातील समस्यांवर बोट ठेवत, महावितरणने तातडीने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी केली. याआंदोलनात संतोष गायकवाड, रुपेश मिसाळ, बाजीगर इनामदार, अमित चव्हाण, उमेश मोरे, किरण बागडे, सिद्धार्थ कांबळे आणि शंकर भणगे यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते. महावितरणचे हे धोरण भूजल पातळीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त असले तरी, नदी आणि कॅनॉलच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांसाठी ते अन्यायकारक ठरत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाटबंधारे विभागाचा पाणी उपसा परवाना आहे, त्यांना 7.5 एच.पी. पेक्षा जास्त क्षमतेच्या पंपासाठी पारंपरिक वीज कनेक्शन देण्याचा पर्याय तातडीने सुरू करावा. सौर पंप प्रणाली ज्या ठिकाणी तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही (उदा. नदीपात्र, उंच हेड), अशा ठिकाणी पारंपरिक वीज – कनेक्शनला प्राधान्य देणारी लवचिक – पॉलिसी महावितरणने जाहीर करावी. -मोठ्या शेतीसाठी आणि बागायती क्षेत्रासाठी आवश्यक 10 एच.पी. किंवा – त्याहून अधिक क्षमतेच्या सौर पंपांचा पर्याय योजनेत समाविष्ट करावा.
जोपर्यंत महावितरण यावर ठोस उपाययोजना करत नाही, तोपर्यंत सातारा जिल्ह्यातील वाई, सातारा आणि कराड या तालुक्यांमधील शेतकऱ्यांचा असंतोष कायम राहील, शासनाने तातडीने या गंभीर प्रश्नाची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जब तक न होगा समाधान, तब तक जारी वेगळ्या आहेत. डोळ्यासमोर पाणी असून शेतक-याच्या शेतीला पाणी मिळणार नसेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, आंदोलनातील शेतकरी
-स्वप्नील गायकवाड यांनी सांगितलं आहे.
Ans: