प्रकल्पामुळे सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, कर्नाटक या व्यापक औद्योगिक पट्टयास थेट जागतिक व्यापारमार्गाशी जोडणारा नवा मार्ग निर्माण होईल. त्यामुळे याकडे तातडीने लक्ष घाला, अशा सूचना मंत्री राणे यांनी दिल्या. या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे आमदार गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी अशोक काकडे उपस्थित होते, तर मंत्री दालनात भाजपा किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटील, भाजपा राज्य परिषद सदस्य मिलिंद कोरे, अप्पर मुख्य सचिव बंदरे, संबंधित विभागाचे अधिकारी, भाजपा पदाधिकारी प्रत्यक्ष उपस्थित होते. मंत्री राणे म्हणाले, रांजणी ड्रायपोर्ट ही मागणी सकारात्मक असून, सांगली जिल्ह्याच्या औद्योगिक व सर्वांगीण विकासासाठी हा प्रकल्प अत्यंत आवश्यक आहे. सर्व संबंधित विभागांनी सकारात्मक दृष्टीने, वेगाने काम करून सर्व अडथळे दूर करावेत. राज्य शासनामार्फत केंद्रस्तरावर प्रकल्पासाठी भक्कम पाठपुरावा करण्यात येईल. तसेच त्यांनी प्रकल्पाचा नियमित आढावा घेतला जाईल अशी हमीदेखील दिली.
जिल्ह्याच्या विकासासाठी – ठरणार ऐतिहासिक प्रकल्प मंत्री नितेश राणे यांचे मी आभार मानतो आणि या निर्णयाचे स्वागत करतो, सांगली जिल्ह्याच्या विकासासाठी हा प्रकल्प ऐतिहासिक ठरेल, दुष्काळी भागाला समुद्र जौडला जाऊन, या -प्रकल्पने समृद्धी येईल.
– गोपीचंद पडळकर, आमदार, जत






