
अपक्ष उमेदवारांनी नमूद केले आहे की, रात्री अपरिहार्य कारणामुळे ते गोदामाजवळ उपस्थित राहू शकले नाहीत, त्यामुळे त्यांनी आपले प्रतिनिधी म्हणून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शरद काटकर यांना पाठवले होते. त्यांच्या माहितीनुसार, गोदामाला सील करताना उमेदवारांच्या सह्या घेण्यात आल्या नाहीत. लावण्यात आलेले सील कधीही काढून परत लावता येऊ शकते. केवळ कुलूपच सीलबंद करण्यात आले आहे, असा गंभीर संशय उमेदवारांनी व्यक्त केला आहे. राज्यात काहीही घडू शकते, गोदाम सील करा.राज्यात काहीही घडू शकते, अशी भीती व्यक्त करत गोदामाच्या मुख्य दरवाजावर मध्यभागी मतमोजणीपर्यंत टिकेल अशा पद्धतीने सील करावे. त्या सीलवर त्यांच्या सह्या घेण्यात याव्यात. त्यांच्या सहह्यांचे सील गोदामाला करण्यात यावे, अशी विनंती या अपक्ष उमेदवारांनी प्रांताधिकाऱ्यांना केली आहे.
एकीकडे मतमोजणीवरुन उमेदवारांनी प्रांताधिकाऱ्यांकडे अर्ज केला तर दुसरीकडे , कोल्हापूर, नगरपालिका निवडणुकीतील चुरशीच्या लढतीनंतर आता उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. मात्र सर्वांना प्रतीक्षा असलेल्या मतमोजणी प्रक्रियेला अचानक पुढे ढकलण्यात आल्याने राजकीय वातावरणात अधिक तणाव निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने तांत्रिक आणि प्रशासकीय कारणास्तव मतमोजणीची तारीख २० दिवसांनी पुढे ढकलल्याचे जाहीर केले. यामुळे उमेदवार, त्यांचे कार्यकर्ते व मतदारांत धाकधूक निर्माण झाली आहे.मतदानाच्या दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच शहरातील प्रमुख राजकीय ठिकाणी, पक्षांच्या कार्यालयात आणि उमेदवारांच्या निवासस्थानी प्रचंड गर्दी पहायला मिळाली. सर्वच पक्षांच्या प्रमुखांनी विजयाचा दावा केला असला तरी प्रत्यक्ष निकाल येईपर्यंत निश्चित विधान करण्याचे टाळले, विशेष म्हणजे या निवडणुकीत अनेक प्रभागांमध्ये अत्यंत चुरशीची लढत होत असल्याने मतांची उलथापालथ अंतिम निकालावर मोठा प्रभाव टाकू शकते. त्यातच मतमोजणी लांबल्याने उमेदवारांच्या धडधडीत आणखी वाढ झाली आहे.
निवडणूक आयोगाकडून मतमोजणी केंद्रांवर सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्याची गरज होती. काही प्रभागांत मतदान यंत्रणांविषयी आक्षेप नोंदवले गेल्याने त्यांची पुनर्तपासणी करण्यात आली. मतमोजणी केंद्रांमध्ये वाढीव सीसीटीव्ही कॅमेरे, अतिरिक्त कर्मचारी आणि तीन टप्प्यात मतमोजणी करण्याचे नियोजन असल्याने तयारीसाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. मतमोजणी प्रक्रिया पारदर्शक राहावी, यासाठी आयोगाने अतिरिक्त प्रयत्नकरण्याचा निर्णय घेतला आहे.
Ans: अपक्ष उमेदवारांनी मतपेट्या ठेवलेल्या शासकीय गोदामाच्या सीलबंद प्रक्रियेत त्रुटी असल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार सीलबंद करताना उमेदवारांच्या सह्या घेण्यात आल्या नाहीत आणि लावलेले सील कधीही उघडून परत लावता येण्यासारखे आहे.
Ans: गोदामाच्या मुख्य दरवाजाला मजबूत आणि अपरिवर्तनीय सील लावावे. त्या सीलवर त्यांच्या सह्या घ्याव्यात. सीलबंद प्रक्रियेत पारदर्शकता ठेवावी.
Ans: लावण्यात आलेले सील संशयास्पद असून ते सहज काढता येऊ शकते. तसेच सील करताना उमेदवारांच्या सह्या न घेणे ही मोठी त्रुटी असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.