शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडिया पोस्ट पार्थ पवार अटकेवरुन महायुतीला चार प्रश्न केले (फोटो - सोशल मीडिया)
अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर महायुती सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहे. यासंबंधित त्यांनी एक्स यावर पोस्ट करुन पार्थ पवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अंबादास दानवे यांनी लिहिले आहे की, पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला ‘अखेर’ अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे, असे म्हणत अंबादास दानवे यांनी चार प्रश्न उपस्थित केले आहेत.
हे देखील वाचा : अजित पवारांच्या घरी लगीनगाई! परदेशात पार पडणार विवाहसोहळा, राष्ट्रवादीच्या केवळ दोन नेत्यांनाच आमंत्रण
अंबादास दानवे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
१. जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही?
२. पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर देण्यासाठी अजून किती दिवस ‘मुदतवाढ-मुदतवाढ’ खेळणार आहात?
३. अमेडिया कंपनीत केवळ १ टक्का भागधारक दिग्विजय हा ९९ टक्के भागधारक असलेल्या पार्थ पवारांच्या मर्जीशिवाय सायनिंग अथॉरिटी झाला का?
४. मुद्रांक शुल्क माफ करणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे सरकार कधी जाहीर करणार?
ही शुल्क माफी राजकीय दबावाशिवाय होणे शक्य नाही महोदय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याची कल्पना नाही असे सांगणे, हे जनतेला शुद्ध वेडे बनवणे आहे. ते ही बहुमताच्या जोरावर! असा टोला अंबादास दानवे यांनी लगावला आहे.
पुण्याच्या जमीन प्रकरणात शीतल तेजवानीला ‘अखेर’ अटक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे जी, या प्रश्नांची उत्तरे जनता मागते आहे.. १. जमीन देणारी व्यक्ती अटकेत असेल तर मग घेणाऱ्या व्यक्तीला, त्याच्या पार्टनरला अटक का नाही?
२. पार्थ पवार प्रकरणात कंपनीने उत्तर… — Ambadas Danve (@iambadasdanve) December 4, 2025
हे देखील वाचा : सरकारी जमीन खाऊनही FIR मध्ये नाव नाही; पार्थ पवारांवर अंजली दमानियांचा चढला पारा
याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी देखील पार्थ पवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पुणे जमीन घोटाळा प्रकरणामध्ये शीतल तेजवानी हिला अटक करण्यात आली आहे. मात्र पार्थ पवार यांचे नाव एफआरआयमध्ये नाव नसल्यामुळे टीका केली जात आहे. अंजली दमानिया म्हणाल्या की, पुण्यातील जमीन प्रकरणातील कारवाई संपूर्ण फार्स असून त्याची सुरुवात पाच नोव्हेंबरपासून झाली. इतका संघर्ष करूनही या प्रकरणांमध्ये काहीच होत नाही. अजित पवारांच्या मुलाला कायदा लागू होत नाही, राजकारणी असाल तर तुम्हाला काहीच होत नसल्याचे त्या म्हणाल्या. अधिवेशनामध्ये गदारोळ होऊ शकतो म्हणूनच काहीतरी दाखवायचं म्हणून शीतल तेजवानीला अटक करण्यात आली, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला.






