Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangali News : किल्ले संवर्धनातून शिवरायांना मानवंदना ; बाणूरगड येथे प्रशासनाच्यावतीने अनोखी शिवजयंती उत्साहात साजरी

शिवरायांचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या प्रशासनातील शिस्त, लोककल्याणाची भूमिका आणि दूरदृष्टी आजच्या पिढीने अंगीकारणे गरजेच आहे, असे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल यांनी सांगितले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Feb 22, 2026 | 03:21 PM
Sangali News : किल्ले संवर्धनातून शिवरायांना मानवंदना ; बाणूरगड येथे प्रशासनाच्यावतीने अनोखी शिवजयंती उत्साहात साजरी
Follow Us
Follow Us:
  • किल्ले संवर्धनातून शिवरायांना मानवंदना;
  • बाणूरगड येथे प्रशासनाच्यावतीने अनोखी शिवजयंती उत्साहात साजरी
सांगली : शिवरायांचे राष्ट्रनिर्मितीतील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या प्रशासनातील शिस्त, लोककल्याणाची भूमिका आणि दूरदृष्टी आजच्या पिढीने अंगीकारणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल यांनी केले. खानापूर तालुक्यातील बाणूरगड येथे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सांगली पॅटर्न’ अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ‘किल्ले महोत्सव’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
तहसील कार्यालय, खानापूर (विटा) यांच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात ऐतिहासिक व प्रेरणादायी मार्गदर्शनपर व्याख्याने, विचार प्रबोधनात्मक सत्रे, पोवाडे व शिवगीते यांचा समावेश होता.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश शिवरायांच्या जीवनकार्याची ओळख करून देणे,त्यांच्या शौर्य, पराक्रम, राष्ट्रभक्ती व आदर्श प्रशासकीय व्यवस्थेची प्रेरणा समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे हा होता. ‘किल्ले महोत्सव’ या संकल्पनेतून किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करत तरुण पिढीमध्ये इतिहासाबाबत जागर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमात विजय लोहार सदस्य, भारत इतिहास संशोधक मंडळ यांनी “छत्रपती शिवाजी महाराज जीवन चरित्र” या विषयावर सखोल व्याख्यान दिले. रामराजे माने प्राध्यापक व विभागप्रमुख रसायनशास्त्र यांनी भूपाळगड  स्वराज्याचा खंबीर रक्षक” या विषयातून भूपाळगड किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व उलगडले.

Kolhapur News : “पूरनियंत्रण प्रकल्पात त्रुटी राहता कामा नये”; आमदार राजेश क्षीरसागर यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

शिवगर्जना सादर करून राष्ट्रभक्तीची ऊर्जा निर्माण केली
धनश्री शिवाजी शिंदे यांनी आदर्श राजा शिवछत्रपती आणि त्यांची प्रशासकीय व्यवस्था या विषयावर विचार मांडले, तर कु. शरण्या अमोल जंगम बाल शिव व्याख्याती यांनी शिवबा राजे या विषयावर भावपूर्ण सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. गर्जा महाराष्ट्र माझा स्वरांगण ग्रुपकडून पोवाडा व शिवगीते सादर करण्यात आली. अवनी संदीप लाड यांनी शिवगर्जना सादर करून वातावरणात राष्ट्रभक्तीची ऊर्जा निर्माण केली.अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरण
या कार्यक्रमास तहसीलदार योगेश्वर टॉपे, गटविकास अधिकारी डॉ. संताजी पाटील, गटशिक्षणाधिकारी वैभव सराटे, नायब तहसीलदार अभिजित हजारे व विजय सांळुखे, मंडल अधिकारी फैय्याज मुलाणी, तलाठी शुभम यादव, सज्जन बाबर, प्रदीप गायकवाड आदींचे सहकार्य लाभले. गणेश भेंडे यांनी सूत्रसंचालन केले. संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.

Satara News : फुले दाम्पत्याचा घेतला आदर्श ; साताऱ्यात अनोखा सत्यशोधक आंतरजातीय विवाह

 

Web Title: Unique shiv jayanti celebrated with enthusiasm by the administration tribute to shivaji maharaj through fort conservation at banurgad sangli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • Marathi News
  • Sangali News
  • Shivjayanti 2026

संबंधित बातम्या

Rice Storage Tips: तांदूळ हवाबंद डब्यात ठेवूनही किडे पडतात? ‘हे’ कारण जाणून घ्या!
1

Rice Storage Tips: तांदूळ हवाबंद डब्यात ठेवूनही किडे पडतात? ‘हे’ कारण जाणून घ्या!

Nepal Flood Viral Video: पूराच्या थैमानातही लाजिरवाणी घटना; मृत महिलेचे कानातले काढण्याचा प्रयत्न, Video Viral
2

Nepal Flood Viral Video: पूराच्या थैमानातही लाजिरवाणी घटना; मृत महिलेचे कानातले काढण्याचा प्रयत्न, Video Viral

शाळांना पोषण आहारासाठी परवाना सक्ती नको! मुख्याध्यापक संघ आक्रमक, बहिष्काराचा इशारा
3

शाळांना पोषण आहारासाठी परवाना सक्ती नको! मुख्याध्यापक संघ आक्रमक, बहिष्काराचा इशारा

Chandrapur News: चंद्रपुरात वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; 19 हजारांहून अधिक जणांवर कारवाई
4

Chandrapur News: चंद्रपुरात वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; 19 हजारांहून अधिक जणांवर कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.