Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati News: विकासाचा विठ्ठल आमचा?; कवी विनोद खटकेंच्या कवितेने महाराष्ट्र हेलावला

साहित्यिक व रसिकांच्या मते, ही कविता अजितदादांच्या असामान्य नेत्या विषयी जनमानसात असलेली आत्मीयता, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारी साहित्यकृती आहे. साधी, ओघवती आणि भावस्पर्शी शब्दरचना असल्याने कविता थेट हृदयाला स्पर्श करते.

  • By anuradha sagar
Updated On: Jul 14, 2026 | 10:48 AM
Baramati News: विकासाचा विठ्ठल आमचा?; कवी विनोद खटकेंच्या कवितेने महाराष्ट्र हेलावला
Follow Us
Follow Us:

Baramati News: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याची, जनसामान्यांशी असलेल्या त्यांच्या नात्याची आणि त्यांच्या अकाली जाण्याने निर्माण झालेल्या पोकळीची हृदयस्पर्शी शब्दांत अभिव्यक्ती करणारी बारामतीचे कवी विनोद खटके यांची “ओ माऊली…” ही कविता सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. कविता वाचताना किंवा ऐकताना प्रत्येक श्रोत्याच्या मनाला चटका लावणारी ही रचना समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात शेअर होत असून अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणत आहे.

“विकासाचा विठ्ठल आमचा नेलाय कुणी चोरून?” या ओळींनी सुरू होणारा भावनिक धागा संपूर्ण कवितेत कायम राहतो. कवीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना “विकासाचा विठ्ठल” अशी उपमा देत त्यांच्या अखंड कार्यशील स्वभावाचे, लोकांप्रती असलेल्या बांधिलकीचे आणि विकासासाठीच्या ध्यासाचे प्रभावी चित्रण केले आहे. “कामच त्याचा धर्म होता, कामच त्याची होती जात” या ओळींतून त्यांच्या जात व धर्मविरहित व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते.

Moshi Building Collapse: मोशी इमारत दुर्घटने प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार?

कवितेत वारकरी संप्रदायातील विठ्ठल-रुक्मिणीच्या प्रतिमांचा अत्यंत समर्पक वापर करून अजितदादांच्या अनुपस्थितीची वेदना अधिक गहिरी करण्यात आली आहे. “दार नसलेलं देऊळ त्याचं, तो नवसावाचून पावायचा” या ओळींतून सर्वसामान्यांसाठी सदैव उपलब्ध असलेल्या नेतृत्वाची आठवण जागी होते.

साहित्यिक व रसिकांच्या मते, ही कविता अजितदादांच्या असामान्य नेत्या विषयी जनमानसात असलेली आत्मीयता, प्रेम आणि कृतज्ञतेची भावना व्यक्त करणारी साहित्यकृती आहे. साधी, ओघवती आणि भावस्पर्शी शब्दरचना असल्याने कविता थेट हृदयाला स्पर्श करते.

Pune Police: पुणे पोलीस दलात ३५ टक्के पदे रिक्त; पोलीस अधिकाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण

अजित पवार यांच्या स्मृतींना शब्दरूपातून अभिवादन करणाऱ्या या कवितेने बारामतीसह राज्यभरातील नागरिकांच्या भावना व्यक्त केल्या असून, “विकासाचा विठ्ठल” ही उपमा आता अनेकांच्या ओठांवर रेंगाळताना दिसत आहे.

 

 

Web Title: Baramati news poet vinod khatke emotional poem o mauli on late ajit pawar vikasacha vitthal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 10:48 AM

Topics:  

  • ajit pawar news
  • baramati news
  • Maharashtra Politics
  • Marathi News

संबंधित बातम्या

AI Governance : जग AI वर नियंत्रणाची तयारी करत असताना ट्रम्पांचा विरोध; ‘ग्लोबल प्लॅन’ला अमेरिकेचा नकार
1

AI Governance : जग AI वर नियंत्रणाची तयारी करत असताना ट्रम्पांचा विरोध; ‘ग्लोबल प्लॅन’ला अमेरिकेचा नकार

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा
2

Solapur News : मुख्यमंत्र्यांच्या आधी अधिकारी बांधावर! करंब्यात करपलेल्या पिकांची पाहणी; मदतीच्या घोषणेची प्रतीक्षा

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव
3

Satara News : लिंब उड्डाण पूल की अपघाताचा सापळा? चढ-उताराच्या रस्त्यावर सुरक्षेचा अभाव

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद
4

Baramati News : जुन्या वादाचा खतरनाक शेवट! कोयत्याने सपासप वार; २४ तासांत दोघे जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.