Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chandrapur News: निकृष्ट सोयाबीन बियाण्यांचा फटका! 60 हेक्टरवरील पीक धोक्यात, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

चंद्रपूर जिल्ह्यात निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. बियाण्यांची उगवण न झाल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असून कृषी विभागाने तपासणी सुरू केली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 14, 2026 | 01:48 PM
Chandrapur News: निकृष्ट सोयाबीन बियाण्यांचा फटका! 60 हेक्टरवरील पीक धोक्यात, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

Chandrapur News: निकृष्ट सोयाबीन बियाण्यांचा फटका! 60 हेक्टरवरील पीक धोक्यात, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट

Follow Us
Follow Us:
  • चंद्रपूरच्या वरोरा उपविभागात निकृष्ट सोयाबीन बियाण्यांमुळे 37 तक्रारी दाखल झाल्या आहेत.
  • बियाण्यांची उगवण न झाल्याने सुमारे 60 हेक्टरवरील पीक प्रभावित होऊन शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे.
  • कृषी विभागाने बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असून अहवालानंतर संबंधित कंपन्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
चंद्रपूर: खरीप हंगामात पेरणी पूर्ण झाल्यानंतर आता वरोरा उपविभागातील बोगस व शेतकऱ्यांसमोर निकृष्ट दर्जाच्या सोयाबीन बियाण्यांमुळे दुबार पेरणीचे मोठे संकट उभे ठाकले आहे. बियाणे उगवलेच नाही किंवा अत्यल्प प्रमाणात उगवले असल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे मोठ्या प्रमाणावर दाखल होत आहे. सोमवारपर्यंत वरोरा उपविभागात एकूण ३७ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींमुळे सुमारे ६० हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पीक बाधित झाल्याचे प्राथमिक तपासणीत समोर आले आहे.

सातारा जिल्हा बँक निवडणूक पूर्वतयारीने तालुक्यातील वातावरण ढवळले; ठरावांसाठी बैठकांचे सत्र सुरू

कृषी विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, वरोरा तालुक्यात ३, भद्रावती तालुक्यात १६ आणि चिमूर तालुक्यात १८ अशा एकूण ३७ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने कृषी अधिकाऱ्यांनी शेतांची पाहणी केली असता अनेक ठिकाणी सोयाबीनचे उगवण प्रमाण अत्यंत कमी असल्याचे निदर्शनास आले. (फोटो सौजन्य – AI Created)

प्राथमिक आकडेवारीनुसार वरोरा तालुक्यात ४ हेक्टर क्षेत्र (१२ बॅग), भद्रावती तालुक्यात २२ हेक्टर क्षेत्र (५४ बंग) आणि चिमूर तालुक्यात ३४ हेक्टर क्षेत्र (१११ बॅग) अशा एकूण ६० हेक्टर क्षेत्रावर १७७ बॅग बियाण्यांचा परिणाम झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचा अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च, पावसाचा अनिश्चितपणा आणि कर्जबाजारीपणामुळे शेतकरी अडचणीत असताना या प्रकाराने त्यांची चिंता आणखी वाढली आहे.

तक्रारींच्या विश्लेषणातून बुस्टर कंपनीच्या ‘हुतुतू’ या सोयाबीन वाणाविरोधात सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय इनोवज (महादेव), महागुजरात आणि हनीबेझर या कंपन्यांच्या बियाण्यांबाबतही उगवण न झाल्याच्या किंवा अत्यल्प उगवण झाल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे आल्या आहेत. दरम्यान, कृषी विभागाने संबंधित बियाण्यांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. संबंधित कंपन्यांकडून आवश्यकतेनुसार गार्ड सॅम्पल मागविण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर बियाण्यांच्या गुणवत्तेबाबत अंतिम निष्कर्ष स्पष्ट होणार आहे.

कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली असता संशयित बियाण्यांचा कोणताही साठा आढळून आला नाही. संबंधित बियाण्यांची संपूर्ण विक्री झाल्याचे कृषी केंद्र चालकांनी अधिकाऱ्यांना सांगितले आहे. दरम्यान, बाधित शेतांचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, त्याआधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. मात्र, आजपर्यंत वरोरा उपविभागात बोगस किंवा निकृष्ट बियाण्यांची विक्री करणाऱ्या कोणत्याही कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे प्रयोगशाळेचा अहवाल आणि पुढील प्रशासकीय कारवाईकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. तज्ज्ञांच्या मते, प्रयोगशाळेच्या अहवालात बियाणे निकृष्ट असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित कंपन्यांवर बियाणे कायद्यानुसार कारवाई होण्याबरोबरच बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

Maharashtra IMD Alert: विश्रांतीनंतर मान्सून पुन्हा सक्रिय? मुंबईसह ‘या’ ९ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

शासनाने दखल घेण्याची मागणी

शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार पाहणी केली जात आहे. तालुकास्तरीय कमिटी हा अहवाल तयार करते. त्यांच्या अहवालानंतरच कारवाई शक्य आहे. बियाण्यांच्या एका बॅगची किंमत ४ ते ४५०० रुपये आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Chandrapur farmers face re sowing crisis after poor quality soybean seeds fail to germinate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 01:48 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Marathi News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

अंबानी-अदाणींचे टेन्शन वाढणार! कुमार मंगलम बिर्लांची रिन्यूएबल क्षेत्रात सर्वात मोठी एन्ट्री; 17200 कोटींचा मेगा करार
1

अंबानी-अदाणींचे टेन्शन वाढणार! कुमार मंगलम बिर्लांची रिन्यूएबल क्षेत्रात सर्वात मोठी एन्ट्री; 17200 कोटींचा मेगा करार

Baramati News: विकासाचा विठ्ठल आमचा?; कवी विनोद खटकेंच्या कवितेने महाराष्ट्र हेलावला
2

Baramati News: विकासाचा विठ्ठल आमचा?; कवी विनोद खटकेंच्या कवितेने महाराष्ट्र हेलावला

BLO कामावरून शिक्षक संतप्त; ‘पूर्णवेळ कार्यमुक्त करा, FIRच्या धमक्या बंद करा’
3

BLO कामावरून शिक्षक संतप्त; ‘पूर्णवेळ कार्यमुक्त करा, FIRच्या धमक्या बंद करा’

असं तुमच्यासोबत घडू शकतं, विमा कंपनीने कँसर उपचारासाठीचा Mediclaim फेटाळला, Consumer Court ने दिला असा दणका, शेवटी 3 लाख…
4

असं तुमच्यासोबत घडू शकतं, विमा कंपनीने कँसर उपचारासाठीचा Mediclaim फेटाळला, Consumer Court ने दिला असा दणका, शेवटी 3 लाख…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.