इचलकरंजी महापालिकेच्या बाबतीत सध्या तरी महाविकास आघाडी फारशी आक्रमक दिसत नसली, तरी प्रत्यक्ष निवडणूक रणांगणात उतरल्यावर चित्र बदलू शकते. इचलकरंजीत स्थानिक नेतृत्व आणि विकासकामांवर आधारित राजकारण नेहमीच निर्णायक ठरले आहे. भाजपाचे माजी मंत्री प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे आणि त्यांना साथ देणारे सुरेश हळवणकर यांचे एकत्रित नेतृत्व पाहता ही निवडणूक त्यांच्यासाठी तुलनेने सोपी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरीही निवडणुकीच्या शेवटच्या टण्यात होणाऱ्या घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत. (Maharashtra Local body Ekection)
इस्रायली धमाक्यांनंतर निसर्गाचा कहर! गाझात मुसळधार पावसामुळे भीषण पूरस्थिती
कोल्हापूर जिल्ह्यात नेहमीच पक्षापेक्षा स्थानिक नेत्यांचे वजन अधिक राहिले आहे. प्रभागनिहाय प्रभाव, जातीय-सामाजिक समीकरणे आणि स्थानिक प्रश्न यांवर निवडणूक निकाल ठरतात. आतापर्यंतही याच पद्धतीने महापालिका निवडणुका झाल्या आहेत.
यंदा मात्र केंद्र आणि राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपा प्रणीत युतीची एकहाती सत्ता असल्याने या निवडणुकीला वेगळीच रंगत येणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेत भाजप राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासह विविध पक्षांचे नेते सक्रिय झाले आहेत.
या चौघांची स्वतंत्र राजकीय ताकद आणि कार्यकत्यांचे जाळे असल्याने कोल्हापूरची लढत अत्यंत चुरशीची ठरण्याची शक्यता आहे. यातच काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून यंत्रणा अधिक सक्रीय केली आहे.
महायुती विरुद्ध महाविकास आघाडी या थेट लढतीबरोबरच स्थानिक आघाड्या, बंडखोरी आणि अपक्ष उमेदवारही निकालावर प्रभाव टाकू शकतात.
मेक्सिकोत भीषण दुर्घटना! इमरजन्सी लँडिंगदरम्यान इमारतीवर कोसळले विमान ; ७ जणांचा मृत्यू , VIDEO
सध्या तरी कोल्हापूर (Kolhapur) आणि इचलकरंजी दोन्ही महानगरपालिकांवर भाजपाचा महापौर असावा, असे चित्र महायुतीकडून उभे केले जात आहे. त्यादृष्टीने संघटनात्मक तयारी, प्रभागनिहाय गणिते आणि संभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीही योग्य रणनीती आखून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. एकूणच या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्याबरोबरच स्थानिक आघाड्या, नेत्यांची प्रतिष्ठा आणि प्रभागातील स्थानिक प्रश्न हे सर्व घटक निर्णायक ठरणार आहेत. त्यामुळे कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका निवडणूक जिल्ह्याच्या राजकारणासाठी अत्यंत महत्त्वाची आणि लक्षवेधी ठरणार, यात शंका नाही.
कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत ४ लाख ९४ हजार ७११ मतदारांना मतदान करण्याची संधी मिळणार आहे. त्यामध्ये महिलांची सर्वाधिक संख्या म्हणजे लाख तब्बल ४१ हजार ५०१ मतदार वाढले आहेत. २ लाख ४९ हजार ९४० तर पुरुष मतदारांची संख्या तर २ लाख ४४ हजार ७३४ इतकी आहे. ३७ मतदार है तृतीयपंथी आहेत.
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत २, लाख ४९ हजार, १२९ मतदारांना मतदान करण्याची संधी मिळणार आहे त्यामध्ये महिलांची संख्या ৭लाख २३ हजार २८७ तर १ लाख २५ हजार ७८७पुरुष मतदार असणार आहे ५५ तृतीयपंथी व इतर मतदार मतदानाचा हक्क बजावतील.






