या कालावधीत तिने नैसर्गिक शिकारीचे उत्कृष्ट कौशल्य दाखवत स्वतः शिकार केली आणि सलग तीन दिवस त्या शिकारीवरच उपजीविका केली. तिचे हे वर्तन जंगलातील स्वतंत्र जीवनासाठी ती पूर्णतः सक्षम असल्याचे स्पष्ट करणारे ठरले. महाराष्ट्र वन विभागाच्या वतीने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील नैसर्गिक अधिवासात ही मुक्तता शास्त्रीय पद्धतीने राबविण्यात आलेल्या ‘सॉफ्ट रिलीज’ प्रक्रियेच्या यशस्वी पूर्ततेनंतर करण्यात आली. यापूर्वी व्यवस्थापन टप्प्यात टी 7 (एस 2) म्हणून ओळखली जाणारी व्याघ्रिणी तारा हिला विशेषरित्या तयार करण्यात आलेल्या सॉफ्ट रिलीज पिंजऱ्यात ठेवले होते. या संपूर्ण कालावधीत तिचे आरोग्य, हालचाली, वर्तन आणि परिसराशी जुळवून घेण्याची क्षमता वनाधिकारी व वन्यजीव तज्ज्ञांकडून सातत्याने निरीक्षणात ठेवण्यात आली.
सह्याद्रा व्याघ्र प्रकल्पाताल नसागक कोअर जंगलात एसटीआर- 05 (तारा) व एसटीआर04 या दोन प्रौढ वाघिणींच्या मुक्ततेमुळे येत्या काळात वाघांची वंशवृद्धी होईलच, शिवाय शाश्वत वन पर्यटनाला चालना मिळून नवीन रोजगारनिर्मितीही होणार आहे.
रोहन भाटे
(मानद वन्यजीव रक्षक)
कर्मचाऱ्यांकडून नियमित निरीक्षण, देखरेख
सततच्या वर्तन निरीक्षण व पशुवैद्यकीय तपासणीनंतर तारा ही शारीरिक त्र वर्तनात्मकदृष्ट्या नैसर्गिक जंगलात मुक्त करण्यास पूर्णतः योग्य असल्याचे निष्पन्न झाले. मुक्ततेनंतरही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडून तिचे नियमित निरीक्षण व देखरेख करण्यात येणार असून, ती नैसर्गिक अधिवासाशी सुरळीतपणे जुळवून घेत आहे, याची खात्री केली जाणार आहे.
यावेळी महाराष्ट्र वन विभागाने सह्याद्री परिसरात शास्त्रीय, नैतिक व संवर्धनाभिमुख वन्यजीव व्यवस्थापनासाठी आपली कटिबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली. ही संपूर्ण प्रक्रिया क्षेत्र संचालक तुषार चव्हाण व भारतीय वन्यजीव संस्थेचे शास्त्रज्ञ रमेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये विभागीय वनाधिकारी स्नेहलता पाटील, सहाय्यक वनसंरक्षक संदेश पाटील, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, अजितकुमार पाटील, वनक्षेत्रपाल ऋषिकेश पाटील (चांदोली), प्रदीप कोकीटकर (आंबा) यांच्यासह वनपाल व वनरक्षक सहभागी होते.
88 व्याधिणी एसटीआर -05 (तारा) हिने सॉफ्ट रिलीज कालावधीत अत्यंत उत्कृष्ट
नैसर्गिक वर्तन प्रदर्शित केले आहे. पिंजऱ्यात स्वतः शिकार करून तिने तिची शारीरिक तंदुरुस्ती आणि जंगलात स्वतंत्र जीवनासाठीची तयारी सिद्ध केली आहे. तिची आजची मुक्तता ही सह्याद्री परिसरात टिकाऊ व्याघ्र लोकसंख्या उभारण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल आहे.
– तुषार चव्हाण
भा.व.से., क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प
88 ताराची मुक्तता शास्त्रीय निकष, वर्तन मूल्यांकन व निश्चित प्रोटोकॉलनुसार करण्यात आली आहे. हा उपक्रम महाराष्ट्र वन विभागाच्या विज्ञानाधिष्ठित व दीर्घकालीन व्याघ्र संवर्धन दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहे.
– एम. एस. रेड्डी,
मुख्य वन्यजीव संरक्षक, महाराष्ट्र






