
फोटो सौजन्य: iStock
सध्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यावर होता. मात्र, कोपरगाव, देवळाली, नेवासा आणि पाथर्डी नगरपरिषदांमध्ये नगराध्यक्षपदाच्या पात्रतेसंदर्भात दाखल केलेली अपीले २३ नोव्हेंबर २०२५ नंतर निकाली निघाल्याने आयोगाने या चारही ठिकाणचे आधीचे निवडणूक वेळापत्रक रद्द केले आहे.
आता धारावीचा पुनर्विकास होणार! एसआरएला निवेदन देत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची अधिकाऱ्यांबरोबर बैठक
आयोगाने स्पष्ट केले की, ज्या नगरपरिषदांमध्ये न्यायालयीन वाद प्रलंबित होते किंवा नियमानुसार प्रक्रिया बाधित झाली होती, त्यांच्यासाठीच सुधारित निवडणूक कार्यक्रम लागू होणार आहे. नवीन कार्यक्रमानुसार ०४ डिसेंबर २०२५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून सुधारित निवडणूक वेळापत्रक जाहीर केले जाईल. उमेदवारांना नामनिर्देशन मागे घेण्यासाठी १० डिसेंबर २०२५ दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत असेल.
सुधारित वेळापत्रकानुसार मतदान २० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होईल. विशेष म्हणजे मतमोजणी दुसऱ्याच दिवशी, २१ डिसेंबर सकाळी १० वाजता सुरू होईल. यामुळे अवघ्या २४ तासांत पाच स्थानिक संस्थांचे नवे कारभारी कोण, हे स्पष्ट होणार आहे.
Metro Car Shed : मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना जारी, परिवहनमंत्र्यांची माहिती
या निर्णयामुळे चारही नगरपरिषदांच्या राजकीय वर्तुळात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. उमेदवारांच्या प्रचार रणनीती, खर्च व्यवस्थापन आणि जनसंपर्क मोहीम यावर पुन्हा एकदा विचार करण्याची वेळ आली आहे. अनेकांनी प्रचारात घेतलेली आघाडी टिकवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी अतिरिक्त कालावधीचा कसा उपयोग करायचा, यावर आता पक्षांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.