Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Koyna Dam: कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Koyna Dam: कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलसागर पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असून धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट उचलून एकूण 6,129 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 31, 2026 | 03:46 PM
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Follow Us
Follow Us:
  • कोयना पाणलोट क्षेत्रासह पाटण तालुक्यात मुसळधार..
  • धरणाचे ६ वक्र दरवाजे १ फुटाने उघडले
  • मुळगाव पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता
पाटणा: सातारा जिल्ह्यातील कोयना (Koyna Dam) धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज जलसागर पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने 30 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूट उचलून पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.

धरणातून 5,129 क्युसेक्स पाणी वक्र दरवाज्यांद्वारे आणि 1,050 क्युसेक्स पाणी पायथा विद्युतगृहातून सोडण्यात येत असून, एकूण 6,129 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे.

Barvi Dam: बारवी धरणातील पाणीसाठा 73.58 टक्क्यांचा टप्पा पार, ठाणे जिल्ह्याची चिंता कमी

धरणात पाण्याची आवक झपाट्याने वाढली

31 जुलै रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना धरणात 25,293 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू होती. गेल्या 24 तासांत धरणातील पाणीसाठ्यात 2.16 टीएमसीची वाढ झाली आहे.

सध्या धरणात 86.11 टीएमसी (81.81 टक्के) इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस

गेल्या 24 तासांत झालेल्या पावसाची नोंद पुढीलप्रमाणे आहे:

कोयनानगर : 121 मिमी (हंगामी एकूण 2,895 मिमी)

नवजा : 174 मिमी (हंगामी एकूण 3,509 मिमी)

महाबळेश्वर, नवजा, कोयना आणि परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाण्याची आवक सातत्याने वाढत आहे.

पाटण तालुक्यात ढगफुटीसदृश परिस्थिती

रात्री 3 वाजल्यापासून कोयना, नवजा, पाथरपुंज आणि संपूर्ण पाटण तालुक्यात ढगफुटीसदृश पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तालुक्यातील लहान-मोठे ओढे, नाले आणि नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

पाटण शहरातही रात्रीपासून अतिवृष्टी सुरू असून मुळगाव घाट पाण्याखाली गेला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास मुळगाव पूलही पाण्याखाली जाण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

धरणातून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोयना धरण व्यवस्थापनाने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्रात किंवा पूरप्रवण भागात जाणे टाळावे, तसेच स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

ठाणे जिल्ह्यातील धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा; बारवी धरण ५९ टक्क्यांवर, धरणसाठ्यात समाधानकारक वाढ

Web Title: Koyna dam water release heavy rain mahabaleshwar patan alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • Koyna Dam
  • maharashtra
  • Rain Update

संबंधित बातम्या

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी
1

उजनीच्या पाण्यावर ठेकेदाराचा ताबा नको, मच्छिमारांचे सिंचन भवनासमोर बेमुदत उपोषण; ई-टेंडर प्रक्रिया रद्द करण्याची मागणी

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर
2

गणेशोत्सवात कृत्रिम फुलांचा ‘सुळसुळाट’, अस्सल फुलांची मागणीच घटली; झेंडूचे दर ३५ ते ४० रुपयांवर

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत
3

ऐन गणेशोत्सवातही फुलांचे भाव कोमेजले; अपेक्षेप्रमाणे बाजारभाव मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड
4

Eknath Shinde Helicopter: गुजरात दौऱ्यात एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे उड्डाण रद्द; टेकऑफपूर्वी तांत्रिक बिघाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.