Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Krishna River Pollution: अरे हे काय चक्क… कृष्णा नदीचे पाणी झालं हिरवं गडद! नदीकाठच्या लोकांना संसर्गाचा धोका

Krishna River News: सातारा जिल्ह्यातील नांदगाव आणि तारगाव परिसरातील कृष्णा नदीचे पाणी गडद हिरवे झाल्याने खळबळ उडाली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची तातडीने चौकशी करावी अशी मागणी रामचंद्रभाऊ जगदाळे यांनी केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 10, 2026 | 08:26 PM
Krishna River Pollution

Krishna River Pollution

Follow Us
Follow Us:
  • अरे हे काय चक्क…
  • कृष्णा नदीचे पाणी झालं हिरवं गडद!
  • नदीकाठच्या लोकांना संसर्गाचा धोका
टिटवेवाडी : नांदगांव, तारगांव येथील कृष्णा नदीच्या पाण्याला हिरवा गडद रंग चढला आहे. नदी प्रवाहातून वाहणारे पाणी सुद्धा हिरवे गडद वाहत आहे. नदीकाठच्या लोकांना या दूषित पाण्याने संसर्ग बाधा होण्याचा धोका असून, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तर हिरव्या गडद रंगाचे पाणी पाहून नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे.

सातारा, कोरेगाव, कराड तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारी कृष्णा नदी म्हणून याकडे नजरा लागल्या आहेत. सध्या मात्र कृष्णा नदी वेगळ्याच समस्याने ग्रासलेली आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून नदीतील पाणी हिरवे झाल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, हे प्रमाण नगण्य होते.

आजमितीस या पाण्याला गडद हिरवा रंगाने वेढले असून, नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरू झाला आहे. या प्रकारामुळे पर्यावरण तसेच जलचर जीवसृष्टीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली आहे. आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अचानक पाण्याने रंग बदलल्याने तर्कवितर्क आणि संभ्रम निर्माण झाला आहे.

Sangli News : सांगलीत कृष्णा नदीचा काठ बनतोय ‘ब्लॅक स्पॉट’!

अनेक पाणीपुरवठा योजना नदीकाठी आहेत, तर पाळीव जनावरेही नदीचे पाणी पिण्यासाठी आणली जातात. यामुळे हा आरोग्यकरिता खूप मोठा धोका मानला जात आहे. तसेच नदीच्या पाण्याचा वापर करणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी व उपाययोजना करण्याची मागणीही होत आहे.

नदीच्या पाण्यावर निर्माण झालेल्या या गूढ हिरव्या रंगामागील नेमके कारण काय, याकडे आता परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. संबंधित विभागाने तात्काळ पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातील नागरीकांनी व्यक्त केली आहे.

दोन आठवड्या पासून नांदगाव, तारगाव परिसरातील कृष्णा नदीच्या पात्रात गडद हिरव्या रंगाचा तवंग दिसून येत आहे. संबंधित प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ, जलसंपदा विभाग व आरोग्य विभाग यांनी तातडीने दखल घेऊन नदीच्या पाण्याचे नमुने तपासावेत व वस्तुस्थिती जाहीर करून नागरीकांना दिलासा द्यावा. – रामचंद्रभाऊ जगदाळे, माजी चेअरमन अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, शेंद्रे.

कृष्णा नदीत सापडला तब्बल 25 किलोंचा दुर्मिळ कटला मासा; नागरिकांची एकच गर्दी

Web Title: Krishna river water turns dark green risk of infection for people living along the riverbanks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 08:26 PM

Topics:  

  • Krishna River
  • Satara News
  • water pollution

संबंधित बातम्या

Satara ZP Education Officer: सातारा जिल्हा परिषदेत खळबळ! शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे राज्य शासनाकडून निलंबित
1

Satara ZP Education Officer: सातारा जिल्हा परिषदेत खळबळ! शिक्षणाधिकारी धनंजय चोपडे राज्य शासनाकडून निलंबित

Satara Voter Registration Camp 2026: सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी! १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिर
2

Satara Voter Registration Camp 2026: सातारकरांसाठी महत्त्वाची बातमी! १९, २०, २६ आणि २७ सप्टेंबरला विशेष मतदार नोंदणी शिबिर

घटत्या पटसंख्येमुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर; वसंतराव मानकुमरे यांचे विधान
3

घटत्या पटसंख्येमुळे शाळा बंद होण्याच्या मार्गावर; वसंतराव मानकुमरे यांचे विधान

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना
4

Satara News : गणपती बाप्पा मोरया”च्या जयघोषात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन; सोमवारी दुपारपर्यंत घरोघरी प्रतिष्ठापना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.