Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 31 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शक्तिपीठ’साठी लवकरच केले जाणार जमीन अधिग्रहण; वर्ध्यातील 20 गावांमध्ये…

आता भूसंपादनाविषयी मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाला आहे. सूचना प्राप्त होताच भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती येणार आहे. शक्तिपीठ महामार्ग हा १२ जिल्ह्यातील ३९ तालुके, ३७१ गावांच्या हद्दीतून जाणार आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 07, 2026 | 01:05 PM
शक्तिपीठसाठी जमीन अधिग्रहण लवकरच

शक्तिपीठसाठी जमीन अधिग्रहण लवकरच

Follow Us
Follow Us:

वर्धा : विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण होत गोवा राज्याशी जोडणारा शक्तिपीठ महामार्ग राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा मार्ग वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्गमधील पत्रादेवी असा एकूण ८०२ किमीचा राहणार असून, तो वर्धा जिल्ह्यातील २ तालुक्यातून जात आहे. या महामार्गासाठी जिल्ह्यातील २० गावांतील जमीन संपादित केली जाणार आहे.

नुकताच जमीन मोजणी होऊन वर्धा उपविभागीय महसूल अधिकारी कार्यालयाला जमिनीचा संयुक्त मोजणी अहवाल (जेएलएसआर) सादर झाल्याने तातडीने आणि तो एमएसआरडीसीकडे पाठवण्यात आला आहे. आता भूसंपादनाविषयी मार्गदर्शक सूचनांची प्रतीक्षा जिल्हा प्रशासनाला आहे. सूचना प्राप्त होताच भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती येणार आहे. शक्तिपीठ महामार्ग हा १२ जिल्ह्यातील ३९ तालुके, ३७१ गावांच्या हद्दीतून जाणार आहे. त्यासाठी राज्यातील सुमारे ८ हजार ६१५ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. हा महामार्ग वर्धा तालुक्यातील १० व देवळी तालुक्यातील १० गावातून जाणार आहे. त्यासाठी ४८६.७८९ हेक्टर जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. महामार्गासाठी लागणाऱ्या जमिनीची मोजणी भूमिअभिलेख विभागातर्फे करण्यात आली आहे.

दरम्यान, शक्तिपीठ महामार्ग हा वर्धा तालुक्यातील दिग्रस, पांढरकवडा, झाडगाव, गणेशपूर, तिगाव, रोठा, धोत्रा (रेल्वे), निमगाव, पढेगाव, चिकणी तर देवळी तालुक्यातील देवळी, इसापूर, काजळसरा, वाटखेडा, बाभूळगाव (खोसे), सैदापूर, कर्मलापूर, वाबगाव, काशिमपूर, खर्डा या गावातून जाणार आहे.

शक्तिपीठ महामार्गासाठी २० हजार ७८७ कोटींची तरतूद

राज्यातील महत्वाच्या तीर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या आणि मराठवाड्यातील सहा जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गासाठी (Shaktipeeth Highway) राज्य शासनाने २० हजार ७८७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. परभणी जिल्ह्यातील (Parbhani News) अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी यात जाणार असून, कित्येकजण भूमिहीन होणार आहेत. परभणी तालुक्यातील सहजपूर जवळा येथे शेताची मोजणी करण्यासाठी गेलेल्या पथकास शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला. प्रचंड घोषणाबाजी करत महिला व पुरुष शेतकऱ्यांनी ही प्रक्रिया रोखण्याचा प्रयत्न केला.

हेदेखील वाचा : Shaktipeeth Highway ला परभणीतून तीव्र विरोध; शेतकऱ्याने अंगावर पेट्रोल ओतून घेतल्याने तापले वातावरण

Web Title: Land acquisition for shaktipeeth highway to be done soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 01:05 PM

Topics:  

  • Shaktipeeth Highway
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : वनविभाग पिंजतोय जंगल; नर वाघाचा मुक्तसंचार, १० गावांना वनविभागाचा सतर्कतेचा इशारा
1

Wardha News : वनविभाग पिंजतोय जंगल; नर वाघाचा मुक्तसंचार, १० गावांना वनविभागाचा सतर्कतेचा इशारा

Wardha News: जुलैतही पावसाची तूट कायम, जलाशयही अर्धे रितेच; उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर गरजेचा
2

Wardha News: जुलैतही पावसाची तूट कायम, जलाशयही अर्धे रितेच; उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर गरजेचा

कोलमाइन्स प्रकल्पावर हरकतींचा भडीमार, नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3

कोलमाइन्स प्रकल्पावर हरकतींचा भडीमार, नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांकडे तक्रार

६०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, ५१ हजार ग्राहकांकडे १२.३२ कोटींची महावितरणची थकबाकी
4

६०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, ५१ हजार ग्राहकांकडे १२.३२ कोटींची महावितरणची थकबाकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.