Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हद्दच झाली! APMC ला देखील बांगलादेशींचा विळखा; अवैध धंद्यांत आणि गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाढ

मुंबईत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या संख्येत अनधिकृतपणे बांगलादेशी नागरिक राहत आहे. अनधिकृतपणे वास्तव्य आणि त्यांचा मोठ्या प्रमाणता गुन्हेगारी कृत्ये आणि अवैध धंद्यांमध्ये सहभाग हा फार चिंतेचा विषय ठरत आहे.

  • By नारायण परब
Updated On: Dec 21, 2024 | 06:33 PM
फोटो सौजन्य- प्रतिनिधी

फोटो सौजन्य- प्रतिनिधी

Follow Us
Close
Follow Us:

सावन वैश्य/ नवी मुंबई :- आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी बाजारपेठ असणाऱ्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला बांगलादेशींचा विळखा पडला आहे. अनधिकृतपणे घुसखोरी करून राहणाऱ्या या बांगलादेशी नागरिकांकडून मोठ्या प्रमामात अवैध धंदे केले जात आहेत. गुन्हेगारी कृत्यांमध्ये त्यांचा वावर वाढला असल्याने गुन्हेगारीत वाढ झाली आहे. या परिसरात गांजा, गुटखा, दारुच्या अवैध विक्रीसह खंडणी, चोरी, खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी देखील सापडले आहेत. आतापर्यंत बांगलादेशी नागरिकांचे आश्रयस्थान असलेल्या मार्केटमध्ये काही वर्षांपूर्वी गाडीमधून स्फोट घडवून आणण्यात आला होता. बाहेरील गुंडानी येऊन व्यापाऱ्याला मारहाण केली होती. पण यानंतरही येथील सुरक्षा व्यवस्थेमध्ये आणि प्रशासनाच्या गलथान कारभारामध्ये काहीही फरक पडलेला नाही, असेच दिसून येत आहे. मुख्य म्हणजे व्यापाऱ्यांकडून या बांगलादेशी नागरीकांना कामगार म्हणून रोजगार दिला जात असून, त्यामुळे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मूळ माथाडी कामगारांचे रोजगार देखील पळवले जात आहेत.

आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठेत कांदा – बटाटा मार्केट, मसाला मार्केट, धान्य मार्केट, तसेच भाजी व फळ मार्केटचा समावेश आहे. देशभराच्या विविध कानाकोपऱ्यातून या एपीएमसी मार्केटमध्ये माल येतो, व आलेला माल नवी मुंबई, मुंबईला तसेच आसपासच्या भागात वितरित केला जातो. एपीएमसीमधील या बाजारात विशेषतः फळ बाजारात बांगलादेशी नागरिक मोठ्याप्रमाणात वास्तव्य करत आहेत. याबाबतची धोक्याची सूचना माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर माथाडी मेळाव्यात व्यक्त केली होती. या बांगलादेशी नागरिकांमुळे गुन्हेगारी वाढीस लागली असून, दिवसभर एपीएमसीत काम करून रात्री चोऱ्या देखील केल्या जात आहेत. तसेच मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासनाला याबाबत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी अनेकदा पत्रव्यवहार करून कळवले देखील होते. मात्र यावर अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचं पाटील यांनी दैनिक नवराष्ट्रशी बोलताना सांगिले

भविष्यात घडणाऱ्या घटनेला जबाबदार कोण ?

एपीएमसीतील या फळ बाजारात देशातील विविध भागातून माल येतो. व विविध ठिकाणी विक्रीसाठी पाठवला जातो. मालाच्या या देवाणघेवाणीच्या आड समाज अहिताची कृती घडवून एखादी अप्रिय घटना घडली तर याला जबाबदार कोण ? कारण गाळा धारक अश्या बांगलादेशी नागरिकांची कोणतीही शाहानिशा न करता त्यांना कामगार म्हणून ठेवत आहेत.पोलीस प्रशासनाने सदर ठिकाणी छापा मारून बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना तात्काळ अटक करावी तसेच त्यांना वास्तव्य करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या गाळा धारकांवर देखील कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

याबद्दल बोलताना माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी सांगितले की,  एपीएमसी बाजार पेठेत विशेषतः फळ बाजारात अनधिकृत बांगलादेशी वास्तव्य करत आहेत. 25 सप्टेंबर ला याबाबत मी तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री व विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर माथाडी मेळाव्यात भाष्यता करत चिंता व्यक्त केली होती. तसेच एपीएमसी प्रशसनाला देखील याबाबत पत्रव्यवहार करून कल्पना दिली होती. मात्र त्यावर अजून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे लवकरच बांगलादेशी नागरिकांच्या विरोधात एक मोठं जन आंदोलन फळ बाजारात घेणार आहोत.

अनधिकृतपणे घुसखोरी करून राहणाऱ्या या बांगलादेशी नागरिकांकडून मोठ्या प्रमामात अवैध धंदे केले जात आहेत. गुन्हेगारी कृत्यांमध्ये त्यांचा वावर वाढला असल्याने गुन

Web Title: Large increase in the number of bangladeshi nationals in the apmc market and they are involved in criminal activities

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2024 | 06:31 PM

Topics:  

  • APMC Market
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

नवी मुंबईत भंगार माफियांकडून दादागिरी, वाहतूक पोलिसांचे मात्र मौन, नागरिकांचा आरोप
1

नवी मुंबईत भंगार माफियांकडून दादागिरी, वाहतूक पोलिसांचे मात्र मौन, नागरिकांचा आरोप

Mumbai Metro : नवी मुंबई मेट्रोचा नवा माईलस्टोन! अवघ्या 2 वर्षांत गाठला 1 कोटीहून अधिक प्रवासी संख्येचा टप्पा
2

Mumbai Metro : नवी मुंबई मेट्रोचा नवा माईलस्टोन! अवघ्या 2 वर्षांत गाठला 1 कोटीहून अधिक प्रवासी संख्येचा टप्पा

Navi Mumbai : जनता दरबाराच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी; समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा शिवसेनेचा आरोप
3

Navi Mumbai : जनता दरबाराच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी; समस्यांकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा शिवसेनेचा आरोप

‘गनिमी कावा’, अनेक महिने गुंडाळून ठेवलेल्या शिवस्मारकाचे अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण
4

‘गनिमी कावा’, अनेक महिने गुंडाळून ठेवलेल्या शिवस्मारकाचे अमित ठाकरे यांच्या हस्ते अनावरण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.