Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain: ‘मूडी वरुणराजा’! पावसाचा बदलता पॅटर्न; अतिवृष्टीच्या घटनांमध्ये…

पूर्वी जून-जुलै महिन्यांत जोरदार पाऊस पडायचा, पण आता ऑगस्ट, सप्टेंबर आणि अगदी ऑक्टोबरमध्येही पाऊस जास्त सक्रिय दिसून येतो. पावसाची सुरुवात उशिरा होते आणि थांबतानाही उशीर होतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 14, 2025 | 04:49 PM
Maharashtra Rain: 'मूडी वरुणराजा'! पावसाचा बदलता पॅटर्न; अतिवृष्टीच्या घटनांमध्ये...

Maharashtra Rain: 'मूडी वरुणराजा'! पावसाचा बदलता पॅटर्न; अतिवृष्टीच्या घटनांमध्ये...

Follow Us
Close
Follow Us:
सुनयना सोनवणे/ पुणे:  गेल्या काही वर्षांत ‘वरुणराजा’चा म्हणजेच मान्सूनचा स्वभावच बदलल्याचे हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. पूर्वी संपूर्ण हंगामभर पाऊस सम प्रमाणात पडायचा, पण आता पावसाचा कालावधी कमी झाला असून, थोड्याच दिवसांत मुसळधार पावसाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. परिणामी शहरांमध्ये पूरस्थिती, वाहतूक कोंडी आणि नागरी जीवन विस्कळीत होण्याच्या घटना वाढल्या आहेत.
हवामान विभाग आणि विविध संशोधन संस्था या बदलत्या पावसाच्या पॅटर्नचा सखोल अभ्यास करत आहेत. हवामान बदलाचा स्थानिक मान्सूनवर नेमका कसा परिणाम होत आहे, हे समजून घेण्यासाठी पुढील काही वर्षांत अधिक तपशीलवार माहिती गोळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

पूर्वी जून-जुलै महिन्यांत जोरदार पाऊस पडायचा, पण आता ऑगस्ट, सप्टेंबर आणि अगदी ऑक्टोबरमध्येही पाऊस जास्त सक्रिय दिसून येतो. पावसाची सुरुवात उशिरा होते आणि थांबतानाही उशीर होतो. यावर्षी तर मे महिन्यातच पावसाने हजेरी लावल्याने तो ही एक अभ्यासाचा विषय बनला आहे.

Maharashtra Rain: यंदाचा पाऊस ठरला अनोखा! एक महिना आधी आगमन अन्…; सविस्तर वाचा

शेती आणि जलव्यवस्थेवर परिणाम
मान्सूनचा कालावधी कमी झाला असला तरी त्याची तीव्रता वाढली आहे. याचा थेट परिणाम शेती, जलस्रोत व्यवस्थापन आणि शहरी नियोजनावर होत आहे. पावसाचे अतिरेकामुळे काही ठिकाणी पिके वाहून गेली तर काही ठिकाणी पाणीटंचाई कायम आहे. दीर्घकालीन दृष्टीने या बदलांचा सखोल अभ्यास करून धोरण आखण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

यावर्षी इतका पाऊस का?

गेल्या काही दशकांत तापमानात १ ते २ अंश सेल्सियस वाढ झाली आहे. समुद्राचे तापमान वाढल्यामुळे हवेतील आर्द्रता वाढली असून त्यामुळे पावसाचे स्वरूप अधिक अस्थिर झाले आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात निर्माण होणारे कमी दाबाचे पट्टे वाढल्याने अतिवृष्टीच्या घटनाही वाढल्या आहेत.
गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यावर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक पाऊस नोंदवला गेला आहे. सप्टेंबरमध्ये पुण्यात तब्बल २३७.४ मिमी पाऊस पडला. हवामान अभ्यासकांनी याला ‘अतिरिक्त पर्जन्य’ असे संबोधले आहे.

कमी दिवसांत जास्त पाऊस — हवामान बदलाचे नवे चित्र

हवामान तज्ज्ञांच्या मते, ग्लोबल वॉर्मिंगमुळे वातावरणात अधिक आर्द्रता साठते आणि त्यामुळे पाऊस पडतो तेव्हा तो अत्यंत तीव्रतेने, पण कमी कालावधीत पडतो. गेल्या पाच वर्षांत ही प्रवृत्ती सातत्याने दिसत असून, काही तासांच्या मुसळधार पावसाने शहर आणि जिल्ह्यांतील जनजीवन विस्कळीत होत आहे.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा बदल आता कायमस्वरूपी पॅटर्न बनत चालला आहे. त्यामुळे शहरी नियोजन, जलस्रोत व्यवस्थापन आणि हवामानाशी सुसंगत शेती धोरण आखणे ही काळाची गरज आहे.

Web Title: Last few years increase incidence heavy rainfall in maharashtra latest weather report

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2025 | 04:48 PM

Topics:  

  • maharashtra rain news
  • Rain News
  • Weather Update

संबंधित बातम्या

वातावरणात होतोय कमालीचा बदल; तापमानाचा पारा पुन्हा चढणार, आता…
1

वातावरणात होतोय कमालीचा बदल; तापमानाचा पारा पुन्हा चढणार, आता…

IMD  Weather Alert : दिल्ली-NCR मध्ये भरली हुडहुडी; या राज्यांना थंडीचा यलो अलर्ट, राजस्थानाचा पारा शून्यच्या खाली
2

IMD  Weather Alert : दिल्ली-NCR मध्ये भरली हुडहुडी; या राज्यांना थंडीचा यलो अलर्ट, राजस्थानाचा पारा शून्यच्या खाली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.