Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Weather: लई अवघड रे गड्या! छत्री, रेनकोट सोडा अन्…; देशात यंदा उष्णतेचा कहर असणार

२०१६ पासून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेला भारतीय हवामान विभाग देशासाठी हिवाळा व उन्हाळा या दोन्ही हंगामांसाठी हंगामी तापमानाचा अंदाज जाहीर करत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 10, 2026 | 04:15 PM
India Weather: लई अवघड रे गड्या! छत्री, रेनकोट सोडा अन्…; देशात यंदा उष्णतेचा कहर असणार
Follow Us
Close
Follow Us:

यंदा देशात असणार कडक उन्हाळा
किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज
उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढण्याची शक्यता

सुनयना सोनवणे/पुणे: भारतीय हवामान विभागाने मार्च ते मे या कालावधीसाठीचा हंगामी तापमान आणि पावसाचा अंदाज नुकताच जाहीर केला. यंदा देशातील उन्हाळा अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मार्च ते मे २०२६ या कालावधीत देशातील बहुतांश भागांत कमाल तसेच किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. काही भागांत उष्णतेच्या लाटांचे प्रमाणही वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार संपूर्ण उन्हाळी हंगामात देशातील बहुतेक भागांत किमान तापमानही सरासरीपेक्षा जास्त राहू शकते. मात्र दक्षिण भारतातील काही भाग आणि काही इतर ठिकाणी किमान तापमान सामान्य ते किंचित कमी राहण्याची शक्यता आहे. मार्च २०२६ महिन्याचा विचार करता देशातील अनेक भागांत कमाल तापमान सामान्य ते किंचित कमी राहण्याची शक्यता आहे. मात्र ईशान्य भारत, पूर्व भारतातील काही भाग, पश्चिम हिमालयीन प्रदेश तसेच मध्य आणि द्वीपकल्पीय भारतातील काही भागांत कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे मार्च महिन्यात देशातील बहुतांश भागांत किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहू शकते. तर उत्तर-पश्चिम भारत, दक्षिण द्वीपकल्प आणि पूर्व किनारपट्टीवरील काही भागांत किमान तापमान सामान्य ते कमी राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, उष्णतेच्या लाटांबाबतही हवामान विभागाने इशारा दिला आहे. मार्च ते मे या कालावधीत पूर्व आणि पूर्व-मध्य भारत, आग्नेय द्वीपकल्प तसेच उत्तर-पश्चिम आणि पश्चिम-मध्य भारतातील काही भागांत उष्णतेच्या लाटांचे दिवस सरासरीपेक्षा अधिक राहू शकतात. मार्च महिन्यात गुजरात आणि आंध्र प्रदेशातील काही भागांत उष्णतेच्या लाटा वाढण्याची शक्यता आहे.

पावसाच्या बाबतीत मार्च महिन्यात देशातील सरासरी पावसाचे प्रमाण सामान्य राहण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन सरासरीनुसार मार्चमध्ये देशात सुमारे २९.९ मिमी पाऊस पडतो. यंदा अनेक भागांत सामान्य ते सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज असला तरी ईशान्य भारत तसेच उत्तर-पश्चिम आणि पूर्व-मध्य भारतातील काही भागांत पाऊस कमी पडू शकतो.

सध्या प्रशांत महासागरात कमकुवत ‘ला नीना’ परिस्थिती असून ती पुढील काही महिन्यांत कमी होण्याची शक्यता आहे. तसेच हिंदी महासागरातील ‘इंडियन ओशन डायपोल’ सध्या तटस्थ अवस्थेत असून पुढील काळातही हीच स्थिती कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

वाढत्या उष्णतेमुळे आरोग्य, पाणीपुरवठा आणि वीज वापरावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दुपारच्या तीव्र उन्हापासून बचाव करणे, पुरेसे पाणी पिणे तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

हवामान अंदाजाची आधुनिक प्रणाली
२०१६ पासून पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेला भारतीय हवामान विभाग देशासाठी हिवाळा व उन्हाळा या दोन्ही हंगामांसाठी हंगामी तापमानाचा अंदाज जाहीर करत आहे. सध्या हा अंदाज मल्टी-मॉडेल एन्सेंबल पद्धतीवर आधारित असून त्यात ‘मॉन्सून मिशन क्लायमेट फोरकास्ट सिस्टिम’ या भारतीय मॉडेलचाही समावेश आहे. याच प्रणालीच्या मदतीने मार्च ते मे २०२६ या उन्हाळी हंगामाचा अंदाज तयार करण्यात आला आहे.

Web Title: India is going to experience extreme heat waves in march may weather update 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 04:14 PM

Topics:  

  • heat wave
  • Indian Weather
  • summer heat
  • Weather Update

संबंधित बातम्या

Heat Wave: उष्णतेचा हाहा:कार; महाराष्ट्र ‘या’ भागात भयानक उन्हाळा, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन
1

Heat Wave: उष्णतेचा हाहा:कार; महाराष्ट्र ‘या’ भागात भयानक उन्हाळा, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

शरीरातील ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी दुपारच्या जेवणात प्या थंडगार काकडीचे ताक, पोटातील जळजळ होईल कमी
2

शरीरातील ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी दुपारच्या जेवणात प्या थंडगार काकडीचे ताक, पोटातील जळजळ होईल कमी

कडक उन्हाळ्यात शरीराला मिळेल गारवा! झटपट घरी बनवा आंबटगोड कैरीचे पन्ह, नोट करून घ्या रेसिपी
3

कडक उन्हाळ्यात शरीराला मिळेल गारवा! झटपट घरी बनवा आंबटगोड कैरीचे पन्ह, नोट करून घ्या रेसिपी

उन्हाळ्यात शरीराला द्या गारवा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार बडीशेप सरबत, पचनक्रिया राहील सुरळीत
4

उन्हाळ्यात शरीराला द्या गारवा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा थंडगार बडीशेप सरबत, पचनक्रिया राहील सुरळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.