Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हाय गर्मी! यंदा उन्हाळा म्हणजे जाळ अन् धूरच…; ‘या’ जिल्ह्यात पारा 37 अंशाच्या पुढे, मे महिन्यात तर…

मार्च महिन्यातच उन्हाचे चटके बसू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शहर- परिसरातील नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी ,उपरणे, चष्मा यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 07, 2026 | 02:56 PM
हाय गर्मी! यंदा उन्हाळा म्हणजे जाळ अन् धूरच...; 'या' जिल्ह्यात पारा 37 अंशाच्या पुढे, मे महिन्यात तर...

हाय गर्मी! यंदा उन्हाळा म्हणजे जाळ अन् धूरच...; 'या' जिल्ह्यात पारा 37 अंशाच्या पुढे, मे महिन्यात तर...

Follow Us
Follow Us:

राज्यातील तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ
नाशिक जिल्ह्यात कडक उन्हाळा
दुपारच्या सत्रात कमी झाली रस्त्यावरील वर्दळ

मालेगाव: मालेगाव शहर परिसरात मार्चच्या प्रारंभीच उन्हाची काहीली वाढली आहे. तापमानाचा पारा ३७.४ अंश सेल्सिअसवर नोंदवला जात आहे. दुपारच्या सत्रात रस्त्यांवरची वर्दळ ही कमी झाली आहे. उन्हापासून (Heat Wave) बचाव करण्यासाठी नागरिकांनी टोपी ,उपरणे  चष्मे खरेदी कडे कल वाढवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा टोपी, उपकरणे यांना काही प्रमाणात महागाईचा फटका बसला आहे. शहर- परिसरात दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात तापमान ४० ते ४५ अंश सेल्स एवढे उच्चांकी नोंदवले जाते. गेल्या तीन वर्षांपासून उन्हाच्या तीव्रतेत कमालीची वाढ झाली आहे.

सध्या लग्नसराईची धामधूम सुरू आहे. मार्च महिन्यातच उन्हाचे चटके बसू लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. शहर- परिसरातील नागरिक उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी ,उपरणे, चष्मा यांची मोठ्या प्रमाणात खरेदी करीत आहेत. शहरातील किदवाई रस्ता, कॅम्प रस्ता , सटाणा रस्ता तसेच विविध चौकात हातगाडीवर टोपी विक्रीची दुकाने थाटले आहेत. टोपीच्या किमतीत गेल्या वर्षीच्या तुलनेत ५० टक्के व उपरण्यामध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. येथे टोपी विक्रीचा माल मुंबईहून येतो . येथील किदवाई रस्त्यावरील दुकानांमध्ये फॅशनच्या टोपीला वर्षभर मागणी असते .

Pune Weather: यंदा काय खरे नाही! पुणे आणखी तापणार; पारा थेट ३९ अंश सेल्सिअस…

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिकांनी दुकानांमध्ये मालाची साठवणूक केली आहे. उपरण्याचा माल तामिळनाडू मधून येत असतो. शहरातील उपरणे व इतर माल सटाणा ,कळवण, देवळा, नांदगाव ,चांदवड, यासह जिल्ह्यात विक्रीला जातो. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी वस्तूंना चांगली मागणी असल्याचेही व्यावसायिकांनी सांगितले.

पुणे आणखी तापणार

पुणे शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. नागरिकांना आतापासूनच उन्हाच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहेत. बहुतांश भागात पारा ३५ अंशांच्या पुढे गेला असून मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाचा कडाका वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहर आणि परिसरात वाढत असलेल्या उष्णतेमुळे उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मार्चच्या सुरुवातीलाच सलग चार दिवस कमाल तापमानाने पस्तीशी ओलांडली आहे. पुढील काही दिवसांत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुणेकरांनो सनस्क्रीन, सनकोट विकत घ्या! तापमानात सातत्याने वाढ; पारा ३५ अंशांच्या पुढे

शहर आणि परिसरात शुक्रवारी (ता.६) १५.८ अंश सेल्सिअस इतके किमान तापमान तर ३७ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले. आकाश मुख्यतः निरभ्र होते. तापमानामध्ये वाढ झाली असल्याने दुपारी पुणेकरांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. पुणे आणि परिसरात शनिवार (ता.७) किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.

 

Web Title: Heat wave in nashik malegaon city temperature 374 update marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • heat wave
  • Malegaon
  • Weather Update

संबंधित बातम्या

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह…
1

Weather Update : पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह…

Weather Update : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाकडून 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’
2

Weather Update : राज्यातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होणार; हवामान विभागाकडून 11 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! एल-निनोनं टेन्शन वाढलं, ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
3

Weather Update: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! एल-निनोनं टेन्शन वाढलं, ‘या’ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची….
4

पावसाबाबत महत्त्वाची अपडेट ! राज्यात पुढील तीन ते चार दिवस पावसाची….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.