Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Civic Polls: आयात? छे, ९० टक्के निष्ठावंत उमेदवारच विरोधकांच्या आरोपांवर संभाजी पाटील-निलंगेकरांचा पलटवार

काही निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, लातूरमध्ये भाजपाने प्रामुख्याने जुने, प्रामाणिक कार्यकर्तेच उमेदवार म्हणून मैदानात उतरवले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 04, 2026 | 04:49 PM
Latur Municipal Corporation Election, BJP Latur civic polls,

Latur Municipal Corporation Election, BJP Latur civic polls,

Follow Us
Close
Follow Us:
  • निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी
  • ९० टक्क्यांहून अधिक उमेदवार हे अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते
  • भावनांपेक्षा वास्तव आणि विजयाचे गणित भाजपासाठी महत्त्वाचे
Latur Municipal Corporation Election:  लातूर शहर महापालिका निवडणूक रणधुमाळी भारतीय जनता पार्टीत निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरून आलेल्या उमेदवारांना संधी दिली जात असल्याचा आरोप सध्या जोर धरत असला, तरी तो पूर्णतः फोल असल्याचा ठाम दावा महानगरपालिका निवडणूक प्रमुख आ. संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी केला आहे.

काही निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, लातूरमध्ये भाजपाने प्रामुख्याने जुने, प्रामाणिक कार्यकर्तेच उमेदवार म्हणून मैदानात उतरवले आहेत. दै. ‘नवराष्ट्र’शी बोलताना निलंगेकर म्हणाले की, लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा ७० जागांवर लढत असून त्यापैकी ९० टक्क्यांहून अधिक उमेदवार हे अनेक वर्षांपासून पक्षासाठी काम करणारे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. केवळ सुमारे १२ प्रभागांमध्ये स्थानिक राजकीय समीकरणे, सामाजिक समतोल आणि विजयाची शक्यता लक्षात घेऊन बदल करावे लागले आहेत. हे चित्र केवळ लातूरपुरते मर्यादित नसून राज्यातील २९ महानगरपालिकांमध्येही अशीच परिस्थिती असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक प्रभागाचे राजकीय व सामाजिक वास्तव वेगळे असते.

निवडणूक रणधुमाळीला वेग ! नांदेडमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांसह भाजप पक्षश्रेष्ठींच्या सभा

भाजपा कोणत्याही कार्यकर्त्याला केवळ निवडणुकीसाठी उभे करून पराभवाच्या दिशेने ढकलत नाही. यासाठीच योग्य आणि प्रभावी उमेदवाराची निवड केली जाते. विकासाच्या नेतृत्वावर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर विश्वास ठेवून एखादा सक्षम व प्रभावशाली उमेदवार भाजपामध्ये येत असेल आणि त्यामुळे विजयाची शक्यता वाढत असेल, तर पक्षहितासाठी त्याला सोबत घेणे अपरिहार्य ठरते..

भावनांपेक्षा वास्तव आणि विजयाचे गणित

भावनांपेक्षा वास्तव आणि विजयाचे गणित भाजपासाठी महत्त्वाचे आहे. एखादा प्रभाग सामाजिक समीकरणांमुळे अडचणीत येत असेल, तर स्थानिक परिस्थिती पाहून निर्णय घ्यावा लागतो, हीच पक्षाची भूमिका आहे. लातूर जिल्ह्यात भाजपाकडे जवळपास ६५० इच्छुकांचे अर्ज आले होते. जागा एकच असल्याने सर्वांनाच संधी देणे शक्य नसते. त्यामुळे काही प्रमाणात नाराजी निर्माण होणे स्वाभाविक आहे. मात्र साडेसहाशे अजर्जापैकी केवळ चार-पाच जणांनीच उघड नाराजी व्यक्त केली असून, हजारो कार्यकर्ते उमेदवारी नसतानाही पक्षाचा उमेदवार जिंकवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत आहेत. हा भाजपचा खरा चेहरा असल्याचे आ. निलंगेकर यांनी सांगितले.

२०२५ ठरलं तिसरं सर्वाधिक उष्ण वर्ष! हवामान बदलाचे गंभीर संकेत पुन्हा स्पष्ट, २०२३ अजूनही दुसऱ्या क्रमांकावर

उमेदवारी बदलाच्या निर्णयाचे केले समर्थन

उमेदवारी ठरवण्याची प्रक्रिया कोणत्याही एका नेत्याच्या हातात नाही. प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि निवडणूक प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून सर्वेक्षण केले जाते आणि त्या सर्वेक्षणातील निष्कर्षांवरच अंतिम उमेदवारी ठरते. लातूरमधील कोणताही आमदार एकट्याने निर्णय घेत नाही. एखाद्या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अडचणी निर्माण होत असतील किंवा विजय धोक्यात येत असेल, तर बदल करणे पक्षहितासाठी आवश्यक ठरते, असे सांगत निलंगेकर यांनी उमेदवारी बदलाच्या निर्णयाचे समर्थन केले.

 

 

 

 

Web Title: Latur civic polls bjp backs loyal workers claims outsider candidate allegations baseless

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • Latur Politics
  • maharashtra poliotics
  • Sambhaji Patil Nilangekar

संबंधित बातम्या

Maharashtra Politics : शहराच्या विकासाचा अजेंडा गायब, निवडणुकीत प्रचाराची पातळी घसरली; व्यक्तिगत स्तरावर आरोप-प्रत्यारोप
1

Maharashtra Politics : शहराच्या विकासाचा अजेंडा गायब, निवडणुकीत प्रचाराची पातळी घसरली; व्यक्तिगत स्तरावर आरोप-प्रत्यारोप

Vilasrao Deshmukh : रवींद्र चव्हाणांनी पत्रकार परिषद सोडली अर्धवट; विलासराव देशमुखांच्या वक्तव्याबद्दल व्यक्त केली दिलगिरी
2

Vilasrao Deshmukh : रवींद्र चव्हाणांनी पत्रकार परिषद सोडली अर्धवट; विलासराव देशमुखांच्या वक्तव्याबद्दल व्यक्त केली दिलगिरी

“विलासराव देशमुख आठवणी पुसल्या जातील…लातूरमधील रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावरुन रंगलं राजकारण
3

“विलासराव देशमुख आठवणी पुसल्या जातील…लातूरमधील रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यावरुन रंगलं राजकारण

Latur Municipal Election 2026: महायुतीत मिठाचा खडा; भाजप’चा स्वबळाचा नारा
4

Latur Municipal Election 2026: महायुतीत मिठाचा खडा; भाजप’चा स्वबळाचा नारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.