नांदेड महापालिका निवडणुकीसाठी भाजप स्टार प्रचारकांची फौज मैदानात उतरली आहे (फोटो - सोशल मीडिया)
Nanded Politics : नांदेड : मनपा निवडणुकीची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यात प्रवेश करत असताना भारतीय जनता पक्षाने प्रचाराची धार अधिक तीव्र केली आहे. भाजपच्या वतीने राज्यातील दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभांचा धडाका सुरू होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पर्यावरणमंत्री तथा मनपा निवडणूक प्रभारी पंकजा मुंडे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे नांदेडच्या प्रचार मैदानात उतरणार आहेत. भाजपाचे महानगराध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांनी आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
यावेळी अॅड. चैतन्यबापू देशमुख, जिल्हा प्रवक्ते निलेश देशमुख, संतोष पांडागळे आदींची उपस्थिती होती. अमरनाथ राजूरकर यांनी सांगितले की, ४ जानेवारी रोजी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रचारसभा नांदेड शहरात विविध ठिकाणी होणार आहेत. आयोजित करण्यात आल्या आहेत. याच दिवशी आपटीआय समोरील भाजपाच्या केंद्रीय प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. तर ५ जानेवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इंदिरा गांधी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. मनपा निवडणुकीसाठी भाजपाकडे इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी होती. एकूण ५५० इच्छुकांनी पक्षाकडे अर्ज सादर केले होते. त्यातून सर्वेक्षण, स्थानिक परिस्थितीचा अभ्यास आणि मुलाखतींच्या माध्यमातून सक्षम व विजयी उमेदवारांची निवड करण्यात आली. ६७ उमेदवारांना भाजपाच्या अधिकृत चिन्हावर निवडणूक रिंगणात उत्तरवण्यात आले आहे. आज ४ जानेवारी रोजी दुपारी ४ ते ५ या वेळेत बूथ कमिटी अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख आणउमेदवारांची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत प्रचाराची अंतिम रणनीती, बूथ मैनेजमेंट आणि मतदार संपर्काबाबत दिशा दिली जाणार आहे.
हे देखील वाचा : देशातील लोकशाही संपून झुंडशाही सुरू…”; उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्रा
भाजपाच्या स्टार प्रचारकांची फौज मैदानात
राजूरकर यांनी स्पष्ट केले की, प्रभाग क्रमांक ७, ११ आणि १८ मध्ये पक्षाला अपेक्षेप्रमाणे प्रबळ उमेदवार मिळाले नाहीत. तसेच स्थानिक राजकीय परिस्थिती पक्षासाठी अनुकूल नसल्यामुळे त्या ठिकाणी उमेदवार देता आले नाहीत. मात्र उर्वरित प्रभागांमध्ये भाजपाची संघटनात्मक ताकद भक्कम असून, त्याचा थेट फायदा निवडणूक निकालात दिसून येईल, असा दावा त्यांनी केला. विरोधी पक्षांवर टीका करताना राजुरकर म्हणाले की, “विरोधक फेक नरेटिव्ह सेट करून आम्हीच विकास केला, असा खोटा प्रचार करत आहेत. महायुतीच्या काळात झालेल्या विकासकामांचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र नांदेडची जनता हुशार असून, खरा विकास कोणी केला हे ती ओळखते,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मित्रपक्षांच्या भूमिकेवरही, त्यांनी बोट ठेवले, शिंद शिवसेनेने नांदड दक्षिणमध्ये राष्ट्रवादीशी युती केली असून, नांदेड उत्तरमध्ये स्वबळावर लहण्याचा निर्णय घेतला आहे. या दुहेरी भूमिकेमुळे शिवसेनेची संभ्रमावस्था वाढलेली दिसून येते. काँग्रेसची अवस्था बिकट झाल्याचे सांगत, भाजपाच एकसंघपणे आणि आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरे जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
हे देखील वाचा : बंडखोरांना शिवसेनेचा दणका; विरोधात अर्ज भरणाऱ्या 26 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
महानगरपालिकेत युतीसाठी भाजपाने प्रामाणिक प्रयत्न केले, तीन वेळा जागावाटपाबाबत चचर्चा झाली भाजपाने उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. मात्र शिवसेनेने तशी प्रक्रिया राबवली नाही, असेही राजूरकर महणाले, “महापालिकेवर भाजपाचाच झेंडा फडकेल आणि भाजपाचा महापौर होईल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकूणच, स्टार प्रचारकांच्या सभांमुळे भाजपाच्या प्रचाराला नवे बळ मिळाले असून, नांदेड मनपा निवडणुकीत भाजपाची आक्रमक, संघटित आणि आत्मविश्वासपूर्ण मोहीम आता निर्णायक वळणावर पोहोचली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांची मोठी फौज प्रचारासाठी मैदानात उतरविली असून प्रभागा प्रभागात प्रचाराचे नारळ आज मान्यवरांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात फोडण्यात आले आहेत.






