
Latur News: लातूर–कल्याण जनकल्याण महामार्गावर पेच! राज्य शासनाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष
Raigad News: माणगाव-म्हसळा-श्रीवर्धन बसफेऱ्यांचा बोजवारा! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे हाल
घोषणेनंतर मराठवाड्यातील जनतेने या निर्णयाचे स्वागत केले असून, हा महामार्ग उपयुक्त आणि लाभदायी ठरेल, याबाबत एकमत आहे. मात्र, या महामार्गाचा अहिल्यानगरकडे जाणारा मार्ग कोणता असावा, यावर बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील जनतेत दोन वेगवेगळे दृष्टिकोन पुढे आले आहेत. यामुळे पेच निर्माण झाला आहे. बीड जिल्ह्यातील नागरिकांचा आग्रह आहे की हा महामार्ग लातूर-अंबेजोगाई-केज-मांजरसुंबा-पाटोदामार्गे अहिल्यानगरकडे न्यावा, तर धाराशिव जिल्ह्यातील जनतेच्या मते, लातूर-तांदुळजा-शिराढोण-कळंब-पारा-ईट-खर्डा-जामखेड-आष्टी-अहिल्यानगर असा मार्ग अधिक सर्वसमावेशक ठरेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
धाराशिवकरांच्या मते, या मार्गाने महामार्ग नेल्यास तो धाराशिव व बीड जिल्ह्यांच्या सीमेवरून जाईल आणि दोन्ही जिल्ह्यांना समान लाभ मिळेल, तांदुळजा येथून अंबेजोगाईचे अंतर अवघे २४ किलोमीटर आहे, तर शिराढोण परिसरातून बीड जिल्ह्याची सीमा आठ ते दहा किलोमीटरवर येते. कळंबपासून केज तालुक्याची हद्द चार ते पाच किलोमीटरवर असून केज शहर केवळ १५ किलोमीटर अंतरावर आहे. पुढे पारा-इंटमार्गे जाताना बीड जिल्ह्याची हद्द ७ ते १० लिोमीटरवर राहते आणि खर्डा-जामखेडमार्गे आष्टी तालुक्यालाही थेट लाभ होतो.
धाराशिव जिल्ह्यातील कृती समितीने मांडलेल्या मुद्यांनुसार, या मार्गाने महामार्ग सरळ रेषेत जाईल, अंतर कमी राहील, खर्च आणि प्रवासाचा वेळ घटेल, तसेच जास्तीत जास्त तालुक्यांना थेट लाभ मिळेल. त्यामुळे ही मागणी रास्त आणि व्यवहार्य असल्याचे मत व्यक्त होत आहे. लातूर-कल्याण जनकल्याण महामार्गासाठी मोठ्या आर्थिक तरतुदीची आवश्यकता असल्याने, जास्तीत जास्त जिल्ह्यांना फायदा होईल, असा निर्णय शासनाकडून अपेक्षित आहे. मुंबई-पुण्यासारख्या विकसित शहरांशी मराठवाड्यातील जिल्हे जोडण्याचा शासनाचा विचार स्वागतार्ह असून, आता या महामार्गाचा अंतिम मार्ग कोणता ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
८८ धाराशिव जिल्ह्यातील जनतेची भूमिका आत्मकेंद्री नसून, बीड आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यांना समान लाभ देणारा महामार्ग व्हावा. शासन याबाबत कोणता निर्णय घेते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. – विश्वनाथ तोडकर, निमंत्रक, कृती समिती
या मार्गामुळे बीड जिल्ह्यातील अंबेजोगाई, केज, बीड आणि आष्टी असे चार तालुके, तर धाराशिव जिल्ह्यातील कळंब, वाशी आणि भूम हे तीन तालुके लाभार्थी ठरतील. यासोबतच अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड हा महत्त्वाचा बाजारपेठेचा तालुका महामार्गाशी जोडला जाईल, असा दावा केला जात आहे.