Raigad News: माणगाव-म्हसळा-श्रीवर्धन बसफेऱ्यांचा बोजवारा! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांचे हाल
भाजपाच्या विचारात स्त्री-पुरुष समानता नाही, महिलांना दुय्यम स्थान; हर्षवर्धन सपकाळांची टीका
श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील प्रवासी मोठ्या संख्येने माणगाववर अवलंबून आहेत. शासकीय कामकाज, शिक्षण, आरोग्य सेवा तसेच खासगी नोकरीसाठी दररोज प्रवाशांची वर्दळ असते. मात्र दर तासाला लोकल एसटी फेरी उपलब्ध नसल्याने प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. वेळेवर बस न मिळाल्यामुळे अनेक कर्मचारी कामावर उशिरा पोहोचले, तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा व कॉलेजच्या वर्गाना मुकावे लागले. (फोटो सौजन्य – Pinterest)
या पार्श्वभूमीवर प्रवाशांनी माणगाव-श्रीवर्धन-म्हसळा मार्गावर दर तासाला लोकल एसटी फेरी सुरू करावी, गर्दीच्या वेळेत अतिरिक्त बसेस लावाव्यात, तसेच स्थानकातील सुविधा तातडीने सुधाराव्यात अशी जोरदार मागणी केली आहे. प्रशासनाने वेळीच दखल न घेतल्यास प्रवासी संघटनांच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
त्यातच माणगाव एसटी स्थानकाचे बांधकाम सुरू असल्याने बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही. उन्हाच्या तीव्रतेत प्रवाशांना उभे राहावे लागत असून महिला, वृद्ध, लहान मुले आणि आजारी प्रवाशांचे विशेष हाल होत आहेत. पिण्याचे पाणी, सावली आणि स्वच्छतेच्या मूलभूत सुविधांचा अभाव यांसारख्या समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे. प्रवाशांच्या मते, ही समस्या नवीन नसून एसटी प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष केले जात आहे. गर्दी लक्षात घेऊन वेळापत्रकात बदल, अतिरिक्त बसेस किंवा तात्पुरत्या फेऱ्या लावण्याबाबत ठोस निर्णय घेतला जात नसल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी आहे.
मुंबईकडून येणाऱ्या एसटी बसेस आधीच प्रवाशांनी पूर्ण भरलेल्या असतात. त्यामुळे काही वेळा चालक व वाहक स्थानिक प्रवाशांना बसमध्ये घेण्यास नकार देत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. स्लीपर कोच बसेसमध्ये उभ्या प्रवाशांना प्रवेश दिला जात नसल्याने अनेक जण तासंतास प्रतीक्षेत उभे राहिले.






