Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पीएम श्री शाळा भरते भाड्याच्या घरात; विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर

स्वतंत्र इमारतीची मागणीभाड्याच्या घरात सुरू असलेली शाळा, अरुंद बोळातील इमारत, स्वतंत्र खेळाचे मैदान नसणे, ९७ विद्यार्थ्यांसाठी एकच शौचालय, शिक्षकांचे रिक्त पद आणि किरायाचा शिक्षकांवर पडत असलेला आर्थिक भार या बाबींचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 26, 2026 | 03:45 PM
पीएम श्री शाळा भरते भाड्याच्या घरात; विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर

पीएम श्री शाळा भरते भाड्याच्या घरात; विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न ऐरणीवर

Follow Us
Follow Us:

निलंगा : ‘पीएम श्री’ योजनेअंतर्गत शाळांच्या पायाभूत सुविधा आणि शैक्षणिक वातावरणाचा विकास करण्यावर भर दिला जात असताना, निलंगा शहरातील पेठ भागातील पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील ९७विद्यार्थ्यांना मात्र भाड्याच्या घरात शिक्षण घ्यावे लागत आहे. शाळेच्या किरायाचा आर्थिक भार कार्यरत शिक्षकांकडून उचलला जात असल्याची माहिती समोर समोर आली आहे. त्यामुळे शाळेला स्वतंत्र इमारत कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पेठ येथील ही शाळा १५ जून २०२५ पासून स्थानिक रहिवासी महादेव पटणे यांच्या घरात सुरू आहे. सुमारे १० बाय १० फूट आकाराच्या आठ खोल्यांमध्ये पहिली ते सातवीचे वर्ग भरतात. शाळेची इमारत अरुंद बोळात असल्याने पालकांकडूनही चिंता व्यक्त होत आहे. काही पालक आपल्या पाल्यांना या शाळेत पाठविण्यास तयार नसल्याचे सांगण्यात येत असून, त्याचा परिणाम विद्यार्थीसंख्येवर होत असल्याची माहिती आहे.

शाळेत पहिली ते सातवीपर्यंत ९७ विद्यार्थी असून त्यात ४६ मुले आणि ५१ मुलींचा समावेश आहे. पहिलीमध्ये ९, दुसरीत ९, तिसरीत ११, चौथीत १४, पाचवीत १९, सहावीत २० आणि सातवीत १५ विद्यार्थी आहेत. चार शिक्षक कार्यरत असून एक शिक्षक पद रिक्त आहे. या ९७ विद्यार्थ्यांसाठी मुला मुलींसाठी एकच शौचालय असल्याची माहिती आहे. तसेच शाळेला स्वतंत्र खेळाचे मैदान नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच स्वच्छता, सुरक्षितता आणि शारीरिक विकासासाठी आवश्यक सुविधा पुरेशा आहेत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शाळेला स्वतंत्र इमारतीची मागणी

स्वतंत्र इमारतीची मागणीभाड्याच्या घरात सुरू असलेली शाळा, अरुंद बोळातील इमारत, स्वतंत्र खेळाचे मैदान नसणे, ९७ विद्यार्थ्यांसाठी एकच शौचालय, शिक्षकांचे रिक्त पद आणि किरायाचा शिक्षकांवर पडत असलेला आर्थिक भार या बाबींचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. पीएम श्री शाळेला स्वतंत्र इमारत, पुरेशी स्वच्छतागृहे, खेळाची जागा आणि आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा पालक व नागरिकांतून व्यक्त होत आहे.

NCC Benefits for Students : विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! NCC चे ‘हे’ सर्टिफिकेट मिळवण्याचे फायदे लगेच वाचा

Web Title: Pm shri school operates from a rented house

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Education Sector
  • Latur news
  • maharashra news
  • School

संबंधित बातम्या

Khed Zilla Parishad Schools: विद्यार्थी गेले, शाळांना टाळे! खेड तालुक्यात 8 जिल्हा परिषद शाळा बंद
1

Khed Zilla Parishad Schools: विद्यार्थी गेले, शाळांना टाळे! खेड तालुक्यात 8 जिल्हा परिषद शाळा बंद

शेतकरी संकटात, पंचनामे युद्धपातळीवर करा SDRF ची मदत द्या; धीरज देशमुखांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मांडल्या मागण्या
2

शेतकरी संकटात, पंचनामे युद्धपातळीवर करा SDRF ची मदत द्या; धीरज देशमुखांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मांडल्या मागण्या

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी ! आता 1 तारखेलाच मिळणार वेतन; उच्चशिक्षण संचालनालयाचे निर्देश
3

शिक्षकांसाठी आनंदाची बातमी ! आता 1 तारखेलाच मिळणार वेतन; उच्चशिक्षण संचालनालयाचे निर्देश

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत
4

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.