Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Rural News: लातूर ग्रामीण मतदारसंघातील रस्ते व पुलांसाठी ३१ कोटींची तरतूद; आ. रमेशआप्पा कराड यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश

लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विविध पाच रस्त्यांच्या कामांसह दोन मोठ्या पुलांच्या बांधकामासाठी आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नांतून राज्याच्या अर्थसंकल्पात तब्बल ३० कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 10, 2026 | 12:02 PM
Latur Rural News: लातूर ग्रामीण मतदारसंघातील रस्ते व पुलांसाठी ३१ कोटींची तरतूद; आ. रमेशआप्पा कराड यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश (photo-social media)

Latur Rural News: लातूर ग्रामीण मतदारसंघातील रस्ते व पुलांसाठी ३१ कोटींची तरतूद; आ. रमेशआप्पा कराड यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश (photo-social media)

Follow Us
Close
Follow Us:

Latur Rural News: लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील विविध पाच रस्त्यांच्या कामांसह दोन मोठ्या पुलांच्या बांधकामासाठी आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नांतून राज्याच्या अर्थसंकल्पात तब्बल ३० कोटी ८० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीमुळे मतदारसंघातील महत्त्वाच्या रस्ते व पुलांची कामे मार्गी लागणार असून संबंधित भागातील नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. या कामांसाठी निधी मिळावा यासाठी आ. रमेशआप्पा कराड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजेभोसले यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश मिळत राज्याच्या अर्थसंकल्पात संबंधित कामांसाठी निधीची तरतद करण्यात आली आहे.

Latur Municipal Corporation: लातूर मनपात स्वीकृत नगरसेवकांचा सस्पेन्स संपला; अधिकृत निवड आज होणार

महाराष्ट्र विधिमंडळाच्या सुरू असलेल्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या विविध योजनांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत लातूर ग्रामीण मतदारसंघातील अनेक रस्ते व पुलांच्या कामांसाठी निधी मंजूर करण्यात आल्याने विकासाला चालना मिळणार आहे.

मुरुड ते पाडोळी रस्ता (४ किमी) सुधारणा तसेच मुरुड गावात काँक्रीट रस्ता व नाली बांधकाम ६ कोटी रुपये निधी मंजूर झाला. कासारजवळा-गातेगाव-मुरुड-अकोला ते भोयरा-सावरगाव रस्ता सुधारणा तसेच मुरुड-अकोला गावात काँक्रीट रस्ता ३ कोटी ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले. सलगरा बु.-बोकनगाव-बिंदगीहाळ ते तालुका सरहद्ददरम्यान रस्त्याची पूल-मोऱ्यासह सुधारणा ७ कोटी रुपये निधी मंजूर झाला. अनेक वर्षांपासूनची नागरिकांची मागणी पूर्ण झाली. गेल्या अनेक वर्षांपासून वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या या रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी नागरिकांकडून करण्यात येत होती. आता अर्थसंकल्पात निधी मंजूर झाल्याने पाच रस्त्यांची दुरुस्ती व दोन रस्त्यांवरील तीन पुलांची कामे मार्गी लागणार आहेत.

Udgir Panchayat Samiti: सभापतीपदावर कोणाची मोहर? उदगीर पंचायत समितीत रंगली तिरंगी चुरस

औसा तालुक्यातील आंदोरा ते भेटादरम्यान रस्त्याची दुरुस्ती ५ कोटी रुपये दिले. रेणापूर तालुक्यातील जवळगा सेलू-रामवाडी-कुंभारवाडी रस्त्याची सुधारणा ३ कोटी ५० लाख रुपये दिले. रामेश्वर गावाजवळ प्रजिमा ९२ वर मोठ्या पुलाचे बांधकाम २ कोटी ९० लाख रुपये दिले. भादा सर्कलमधील भेटा-आंदोरा रस्त्यावर लहान पुलाचे जोडरस्त्यासह बांधकाम २ कोटी ९० लाख दिले.
एकूण तरतूद ३० कोटी ८० लाख रुपये करण्यात आली. यामुळे वाहतुकीची सोय सुधारून ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळणार आहे. या कामांसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल आ. रमेशआप्पा कराड यांचे संबंधित भागातील भाजप कार्यकर्ते तसेच नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.

Web Title: Provision of rs 31 crore for roads and bridges in latur rural constituency mla ramesh appa karads pursuit was successful

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • Budget
  • Latur
  • Latur Politics

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.