Udgir Panchayat Samiti: सभापतीपदावर कोणाची मोहर? उदगीर पंचायत समितीत रंगली तिरंगी चुरस
Udgir Panchayat Samiti: उदगीर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदाची निवड ९ मार्च रोजी होणार आहे. सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या आरक्षणासाठी राखीव असल्याने या पदासाठी तिरंगी चुरस निर्माण झाली आहे. उदगीर पंचायत समितीत एकूण १४ सदस्य असून त्यापैकी ८ महिला सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ सदस्य, भाजपचे ३, काँग्रेसचे ३ व २ अपक्ष सदस्य निवडून आले आहेत. अपक्ष सदस्य सुरेखाताई भांगे व चंद्रकांत कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने राकाँचे संख्याबळ ८ झाले असून पंचायत समितीवर त्यांचे बहुमत आहे.
सभापतीपदासाठी दावणगाव गणातील कोमलताई फुले, गुडसूर गणातील वनमालाबाई मरलापल्ले आणि शिरोळ (जा.) गणातील सुनीताताई राठोड या सदस्यांचे नाव चर्चेत आहे. सुनीताताई राठोड या बंजारा समाजाच्या असल्याने त्यांना प्रतिनिधित्व मिळावे अशी मागणी होत आहे, तर कोमलताई फुले या माळी समाजाचे प्रतिनिधित्व करीत असल्याने त्यांचdhही पाठिंबा व्यक्त होत आहे. वनमालाबाई मरलापल्ले या माजी उपसभापती बाळासाहेब मरलापल्ले यांच्या मातोश्री असल्याने त्यांचीही दावेदारी मजबूत मानली जात आहे. दरम्यान, उपसभापतीपदासाठी भाजपकडून धनराज नादरगे यांचे नाव पुढे येत आहे. आ. संजय बनसोडे यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून सभापतीपदाची ‘आडथळ्याची शर्यत’ कोण जिंकणार हे ९ मार्च रोजी स्पष्ट होणार आहे.
बहुचर्चित ठरलेल्या कळंब पंचायत समितीच्या सभापतीपदी अखेर शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री वरपे यांची निवड झाली असून उपसभापतीपदी या निवडीनंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रणिता चव्हाण यांची वर्णी लागली आहे. उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवड प्रक्रिया उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार हेमंत ढोकले व गटविकास अधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडली. शिवसेना शिंदे गट, भाजप व ठाकरे सेना यांचे सदस्य संख्याबळ समान असल्याने निर्णयासाठी ईश्वर चिठ्ठीचा पर्याय अवलंबण्यात आला. लहान मुलाच्या हस्ते चिठ्ठी काढण्यात आली आणि त्यात राजश्री वरपे यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांची सभापतीपदी निवड निश्चित झाली.
या निवडणुकीत भाजप व शिवसेना शिंदे गटाचे मिळून आठ सदस्य तर ठाकरे सेनेचेही आठ सदस्य निवडून आले होते. दोन्ही बाजूंना स्पष्ट बहुमत नसल्याने अखेर ईश्वर चिठ्ठीचा आधार घेण्यात आला. सभापती व उपसभापतीपदाच्या या निकालानंतर महायुतीच्या गोटात समाधान व्यक्त केले जात असून हा निकाल राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात आहे. निवड झाल्यानंतर पदाधिकारी, कार्यकत्यांनी जल्लोष केला आहे.






