Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ST Bus चा प्रवास सुलभ, डिजिटल होणार; CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते ‘या’ कार्डचे लोकार्पण

या स्मार्ट कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना एसटी बस प्रवासातील सवलतींचा लाभ अधिक सुलभतेने मिळणार असून, प्रवास व्यवस्थापन अधिक डिजिटल व पारदर्शक होणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 01, 2026 | 06:24 PM
ST Bus चा प्रवास सुलभ, डिजिटल होणार; CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते 'या' कार्डचे लोकार्पण

ST Bus चा प्रवास सुलभ, डिजिटल होणार; CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते 'या' कार्डचे लोकार्पण

Follow Us
Follow Us:

एसटीच्या NCMC स्मार्ट कार्डचे लोकार्पण
सर्व कॅबिनेट मंत्री व एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित
प्रवास व्यवस्थापन अधिक डिजिटल व पारदर्शक होणार

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) वतीने विविध सामाजिक घटकांसाठी प्रवास अधिक सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. ‘RuPay On-The-Go’, NCMC सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते आज करण्यात आले.

यावेळी अमृतमहोत्सवी ज्येष्ठ नागरिक रमेश ढावरे, तसेच सवलतधारक महिला संगिता पालकर व वर्षा कांबळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या हस्ते NCMC स्मार्ट कार्डचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्यासह सर्व कॅबिनेट मंत्री व एसटी महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला तसेच विविध सवलतधारक प्रवाशांना आधार क्रमांकाशी संलग्न NCMC स्मार्ट कार्ड वितरित करण्यात येणार आहे. या कार्डच्या माध्यमातून प्रवाशांना एसटी बस प्रवासातील सवलतींचा लाभ अधिक सुलभतेने मिळणार असून, प्रवास व्यवस्थापन अधिक डिजिटल व पारदर्शक होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रालय, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 'RuPay On-The-Go' एनसीएमसी सक्षम स्मार्ट कार्ड योजनेचे लोकार्पण केले. या योजनेअंतर्गत प्रवाशांना एसटी बस प्रवासातील सवलतींचा लाभ अधिक सुलभतेने मिळणार असून, प्रवास व्यवस्थापन अधिक… pic.twitter.com/A3xree4zZy — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 1, 2026

सदर योजनेची अंमलबजावणी M/s. Ebix Technologies Ltd. आणि NSDL Payments Bank यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येत असून, राज्यातील सर्व आगार व बसस्थानकांवर नोंदणी व वितरण प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याशिवाय, सुमारे ३ हजार अधिकृत केंद्रांवर नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या स्मार्ट कार्डद्वारे प्रवाशांना वॉलेट टॉप-अपची सुविधा उपलब्ध राहणार असून, किमान ₹१०० पासून टॉप-अप करता येणार आहे. कार्डधारकांना बसमधील ईटीआयएम मशीन, संकेतस्थळ, मोबाईल ॲप तसेच अधिकृत एजंटमार्फत टॉप-अप करता येईल. नवीन NCMC कार्डची किंमत ₹१९९ इतकी निश्चित करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, “राज्याच्या एसटीसारख्या सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत डिजिटल क्रांती घडवून आणण्यासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे प्रवाशांना सुलभ, सुरक्षित व पारदर्शक सेवा मिळेल आणि एसटी महामंडळाच्या कामकाजातही अधिक कार्यक्षमतेने सुधारणा होईल.” या उपक्रमामुळे राज्यातील लाखो सवलतधारक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, एसटीच्या सेवांचा वापर अधिक सोयीस्कर व आधुनिक पद्धतीने करता येईल, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले.

Web Title: Launch of sts ncmc smart card by cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 06:24 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • msrtc
  • pratap sarnaik

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांना मोठी गुडन्यूज! 6.36 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी; मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय
1

शेतकऱ्यांना मोठी गुडन्यूज! 6.36 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 5,086 कोटी; मंत्रिमंडळाचे 4 मोठे निर्णय

World Vada Pav Day: वडापावप्रेमींनो पाहिलंत का? ४ किलोचा वडापाव अन् २.५ किलोचा समोसा! मीरा-भाईंदरमध्ये खवय्यांची गर्दी
2

World Vada Pav Day: वडापावप्रेमींनो पाहिलंत का? ४ किलोचा वडापाव अन् २.५ किलोचा समोसा! मीरा-भाईंदरमध्ये खवय्यांची गर्दी

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!
3

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!

‘फडणवीसांना कॉपी-पेस्टही करता येत नाही’; ‘राहुल गांधींच्या कार्यक्रमाची नक्कल फसली,’ हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
4

‘फडणवीसांना कॉपी-पेस्टही करता येत नाही’; ‘राहुल गांधींच्या कार्यक्रमाची नक्कल फसली,’ हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.