Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कर्ज काढून योजना म्हणजे राज्य खड्ड्यात जाणार’; विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा महायुतीवर निशाणा

विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे. मोदी सरकारकडून अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रासाठी कोणत्याही तरतूद करण्यात आलेल्या नसल्याच आरोप विरोधकांनी केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 24, 2024 | 03:26 PM
विजय वडेट्टीवार यांचा महायुतीवर निशाणा

विजय वडेट्टीवार यांचा महायुतीवर निशाणा

Follow Us
Close
Follow Us:

नाशिक : राज्यामध्ये लवकरच विधानसभा निवडणूका होणार आहे. त्यामुळे महायुतीसह महाविकास आघाडी जोरदार तयारी करत आहे. मात्र केंद्रातून महाराष्ट्रासाठी कोणत्याही खास घोषणा करण्यात आलेल्या नाहीत असा आरोप विरोधकांनी केला आहे. दरम्यान, निवडणूकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी नेते अजित पवार यांनी देखील दिल्ली वारी करत भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली. या सर्व मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. विधानसभेचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.

महाराष्ट्राचा अवमान ठरणारे बजेट

काल केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी लोकसभेमध्ये देशाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये आंध्र प्रदेश व बिहारसाठी योजनांचा आणि निधीचा पाऊस पडला. मात्र महाराष्ट्र केंद्राच्या निधीबाबत उपेक्षित राहिला असा सूर विरोधकांकडून व्यक्त केला जात आहे. मुंबईसारख्या अर्थिक राजधानीकडे देखील केंद्र सरकारने लक्ष दिले नाही असे देखील म्हटले जात आहे. याबाबत विजय वडेट्टीवार यांनी देखील टीका केली आहे. वडेट्टीवार म्हणाले, केंद्राकडून सादर करण्यात आलेलं बजेट महाराष्ट्राचा अवमान ठरणार बजेट आहे. यामध्ये फक्त आंध्र प्रदेश आणि बिहारला पैसे दिले गेले आहेत. महाराष्ट्राच्या वाट्याला 15 हजार कोटी आले नाही. त्यामुळे केंद्रामध्ये यांची ताकद किती आणि मिंध्ये आहेत हे दिसले आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. तसेच केंद्राने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या योजनांचा फायदा होईल की नाही माहिती नाही. सॅटेलाईट घेऊन माहिती घेता येत नाही. त्याची अंमलबजावणी होते का हे पाहणे महत्त्वाचे आहे. पंतप्रधान आवास योजना जाहीर केली पण पैसे नाहीत, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.

अजित पवारांची कोंडी

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यामध्ये जाहीर करण्यात आलेल्या योजनांवर देखील निशाणा साधला आहे. वडेट्टीवार म्हणाले, राज्यातील जनता सुजाण आहे. हे सर्व महायुतीचे महापाप आहे. राज्यामध्ये महिला अत्याचारात वाढ झालेली आहे. तसेच हिट अँड रनची प्रकरण अद्यापही सुरू आहेत. मात्र सगळं बदलून टाकलं जातंय. योजना जाहीर करुन यांची लुटायची कामे सुरू आहे. 30 टक्के पर्यंत कमिशन वर गेले आहे. योजना सुरू करण्यासाठी हे कर्ज काढणार म्हणजे राज्य खड्ड्यात जाणार, अशी घणाघाती टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. तसेच अजित पवार व आरएसएसमधील वाढत्या तणावपूर्ण वातावरणामुळे यांची कोंडी झाली आहे. आजित पवार कोणत्या दिशेला जाईल माहित नाहीत.  त्यांचे तिकडे भले नाही ते डबक्यात गेले, असे मत विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.

Web Title: Leader of opposition congress vijay wadettiwar target mahayuti leader for union budget 2024 nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 03:26 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Cm Eknath Shinde
  • DCM Devendra Fadnavis
  • Union Budget 2024
  • Vijay wadettiwar

संबंधित बातम्या

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट
1

Pravin Tarde : ‘या’ दोन राजकीय नेत्यांवर Biopic काढणं अभिनेत्याचं स्वप्न! अजित दादांच्या पात्रासाठी असा असावा नट

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक
2

Rohit Pawar: जनाई-शिरसाई योजनेसाठी रोहित पवार ‘ॲक्शन मोड’वर! सिंचन भवनात अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक

“… संस्था सुरु करण्यास परवानगी दिली जाणार नाही”; नेमके काय म्हणाले CM Devendra Fadnavis?
3

“… संस्था सुरु करण्यास परवानगी दिली जाणार नाही”; नेमके काय म्हणाले CM Devendra Fadnavis?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.