Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Leopard News: मिरजोळेत वाढली बिबट्याची दहशत; जंगलात चरण्यासाठी गेलेल्या एका…

Ratnagiri News: मिरजोळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेवी माहिती मिळताच ग्रामपंचायत रत्नदीप पाटील यांनी तत्काळ वनविभागाला याची खबर दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 17, 2025 | 12:50 PM
Leopard News: मिरजोळेत वाढली बिबट्याची दहशत; जंगलात चरण्यासाठी गेलेल्या एका…
Follow Us
Follow Us:

वाडी परिसरातही बिबट्याचा मुक्त संचार वाढला 
सातत्याने होणारा वावर ग्रामस्थ झाले भयभीत
रत्नागिरी जिल्ह्यात वाढला बिबट्याचा वावर

रत्नागिरी: रत्नागिरी शहराला लागून असलेल्या मिरजोळे परिसरात पुन्हा एकदा बिबट्याच्या वाढत्या वावराने आणि हल्ल्यांनी मोठी दहशत निर्माण केली आहे. विशेषतः, रत्नागिरीमधील मिरजोळे येथील सोनारवाडी भागातील जंगल परिसरात बिबट्याने एकाच रात्रीत चार गुरांना ठार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. यापैकी एका गुराचा बिबट्याने फडशा पाडला आहे, हे गुरे जंगलात चरण्यासाठी सोडलेले असताना बिबट्याने हल्ला केला.

मिरजोळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. घटनेवी माहिती मिळताच ग्रामपंचायत रत्नदीप पाटील यांनी तत्काळ वनविभागाला याची खबर दिली. वनविभागाच्या कर्मचा-यांनी घटनास्थळी पंचनामा केला आणि मेलेल्या गुरांचे दफन करण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून मिरजोळे, मुक्त सार, शिळ या भागात बिबट्याचा मुक्त संचार वाढलेला आहे. येथे अनेकदा गुरे, शेळ्या आणि पाळीव कुत्र्यांवर बिबट्याने हल्ले केले आहेत.

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू, ग्रामस्थ संतप्त; जुन्नर तालुक्यातील धक्कादायक घटना

चार गुरांना मारल्यामुळे सोनारवाडी शिकार होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. आंबा बागायतीमध्ये काम करणाच्या गुराख्याना अनेकदा बिबट्याचे दर्शन होत असल्याने त्यांच्यातही मोठी भीती आहे. ३ वर्षांपूर्वी गावातील माळरानावर सडलेल्या अवस्थेत एक बिबट्याही आढळून आला होता. तर अलिकडे मिरजोळेला लागून असलेल्या खेडशी येथील डफळोळ वाडी परिसरातही बिबट्याचा मुक्त्त संचार वाढला आहे. या वाडीत ग्रामस्थांव्या घराच्या अंगणात बांधलेल्या कुत्र्यांवर हल्ले होण्याच्या घटना वाढल्या आहेत.

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकल्याचा मृत्यू

जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका थांबायला तयार नाही. पिंपरखेड येथील दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या पारगाव मंगरूळ येथे भरदिवसा साडेअकरा वाजताच्या सुमारास कांदा काढणीचे काम सुरू असताना शेताच्या बांधावर एका आठ वर्षीय मुलावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला आणि त्याला ऊसाच्या शेतात ओढून नेले. या हृदयद्रावक घटनेत गंभीर जखमी झालेल्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Satara: ऊसाच्या शेतात चार पाय कापलेल्या मादी बिबट्याचा सापडला मृतदेह; 18 नखे गायब

रोहित बाबू कापरे  असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेनंतर, “जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार मारत नाही तोपर्यंत मृतदेह दवाखान्यातून हलवणार नाही,” अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतली आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण पुन्हा निर्माण झाले आहे. पारगाव येथे श्रीराम भिकाजी भोर यांच्या शेतात कांदा काढणीसाठी आलेल्या मजुरांचा मुलगा रोहित कापरे हा शेताच्या बांधावर बसला होता. याचवेळी परिसरातील ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने संधी साधून रोहितवर हल्ला केला. त्याला ऊसाच्या शेतात ओढत नेले. यावेळी महिला मजुरांनी ऊसाच्या शेतात शिरून बिबट्याच्या तावडीतून सोडवून पारगाव येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले परंतु या हल्ल्यात रोहित हा गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

Web Title: Leopard alert in mirjole ratnagiri forest department marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 12:50 PM

Topics:  

  • Leopard
  • Ratnagiri
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

Fire News: खेर्डीत कारखान्याला आग; शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, कोट्यवधींचे नुकसान
1

Fire News: खेर्डीत कारखान्याला आग; शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज, कोट्यवधींचे नुकसान

Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार दुष्काळाच्या संकटात; मासेमारी नौकांची संख्या अन्…
2

Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार दुष्काळाच्या संकटात; मासेमारी नौकांची संख्या अन्…

Ratnagiri: गाड्या खचाखच भरल्या, स्टेशनवर तुफान गर्दी! बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणातून परतीचा प्रवास सुरू
3

Ratnagiri: गाड्या खचाखच भरल्या, स्टेशनवर तुफान गर्दी! बाप्पाच्या विसर्जनानंतर कोकणातून परतीचा प्रवास सुरू

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला
4

‘निसर्गसंपन्न भूमीत विनाशकारी प्रकल्प नकोच’; आघारी-भिवबंदर अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात जनआक्रोश पेटला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.