Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठा आरक्षणाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर हालचाली वाढल्या; नोंदी धारकांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी..

मावळातील नागरिकांना त्यांच्या गावातील कुणबी नोंदी शोधून देण्यासाठी मावळ अखंड मराठा समाजाच्या वतीने मावळचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.

  • By प्रीति माने
Updated On: Sep 19, 2025 | 06:07 PM
Letter to Tehsildar from Maratha community in Vadgaon Maval to issue Kunbi certificate

Letter to Tehsildar from Maratha community in Vadgaon Maval to issue Kunbi certificate

Follow Us
Close
Follow Us:

Kunbi certificate : वडगाव मावळ : मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन केले. सर्व नोंदी असलेल्या कुणबी धारकांना प्रमाणपत्रं देण्यात यावी अशी त्यांची मागणी पूर्ण झाली आहे. याची अंमलबजावणी करण्यासाठी आता हालचाली वाढल्या आहेत.  कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी येणारे अडथळे व कुणबी प्रमाणपत्र लवकरात लवकर कमी खर्चात मिळण्यासाठी, मावळातील नागरिकांना त्यांच्या गावातील कुणबी नोंदी शोधून देण्यासाठी मावळ अखंड मराठा समाजाच्या वतीने मावळचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तसेच यासंदर्भात चर्चाही करण्यात आली.

मावळ तालुक्यात जन्म-मृत्यू रजिस्टरमध्ये अनेक गावातील कुणबी नोंदी मोडी लिपीत उपलब्ध आहेत. त्या नोंदी मोडीलिपीत असल्याने अनेकांना त्याबद्दल कल्पना नाही. तसेच मोडी लिपी वाचता येत नसल्याने अनेक अडथळे येत आहेत. जुन्या दस्तांमध्ये आढळलेल्या कुणबी नावापर्यंत पोहचण्यासाठी गाव, देवस्थान, शाळा, वन, नगरपालिका, आरोग्य विभाग व जमीन संदर्भात असलेले टीपण, कडईपत्रक, जन्म-मृत्यू रजिस्टर, वारस रजिस्टर, जंगल गुणाकार बुक, खासरा पत्रक, बोट खत, कुळ रजिस्टर, सूद रजिस्टर हे व्यवस्थितपणे उपलब्ध होत नाहीत. तसेच यातील काही कागदपत्रे गहाळ सुद्धा झालेली दिसत आहेत. काही गावातील हीच कागदपत्रे दुसऱ्या गावातील कागदपत्रात एकत्र झालेली आहेत. ही जुनी कागदपत्रे काढण्यासाठी काही एजंट लोकांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे गोर-गरीब शेतकऱ्यांना हे प्रमाणपत्र काढण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागत आहे म्हणून मावळ मराठा समाजाच्या वतीने काही मागण्या करण्यात आल्या आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

पैसे घेणाऱ्या एजंटवर कठोर कारवाई

येत्या 26 तारखेला वनविभाग, शिक्षण विभाग, महसूल विभाग, पोलीस प्रशासन, आरोग्य विभाग यांचे अधिकारी व मराठा समाज यांच्यासोबत मिटिंग घेऊन, तालुक्यातील या विभागातील जुन्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच कुणबी नोंदी शोधून देणारे, जुने कागदपत्रे, प्रमाणपत्र काढून देणारे व अधिक पैसे घेणारे जे कोणी एजंट आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे अशी माहिती मावळचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

काय आहेत मुख्य मागण्या? 

  • मोडी लिपितील कुणबी नोंदींचे भाषण करून गाववाईज याद्या जाहीर कराव्यात
  • वंशावळ जुळवण्यासाठी लागणारी जुनी सर्व कागदपत्रे व्यवस्थित मिळावी.
  • मावळातील शाळा, देवस्थान, जुने खटले, नगरपालिकेलतील, वनविभागातील, आरोग्यविभागातील,
  • शिक्षण विभागातील कुणबी नोंदी शोधाव्यात
  • ब्रिटिशकाळात झालेल्या लसीकरणातील नावे, रेकॉर्ड उपलब्ध व्हावं
  • मावळातील जुने खरेदीखत रजिस्टर उपलब्ध कराव
  • इनाम, वतन व कुळातील नावे उपलब्ध करावी
  • जुनी मोडी लिपितील कागदपत्रे मराठी मध्ये लिप्यांतर करून सही-शिक्क्याने उपलब्ध करावी
  • एकत्रित झालेली जुनी कागदपत्रे ज्या-त्या गावच्या दप्तरात व्यवस्थित ठेवावी
  • अधिक पैसे घेणाऱ्या एजंटचा सुळसुळाट थांबवावा त्यांच्यावर कारवाई करावी

 

Web Title: Letter to tehsildar from maratha community in vadgaon maval to issue kunbi certificate

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2025 | 06:07 PM

Topics:  

  • Kunbi
  • Maratha Reservation
  • Wadgaon Maval

संबंधित बातम्या

Maratha Reservation: विषय गंभीर! हैदराबाद गॅझेटबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; भुजबळ म्हणाले…
1

Maratha Reservation: विषय गंभीर! हैदराबाद गॅझेटबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय; भुजबळ म्हणाले…

Jarange Patil in Delhi : मनोज जरांगे पाटलांनी दिला ‘दिल्ली चलो’चा नारा; मराठा समाजाचा आवाज राजधानीत घुमणार
2

Jarange Patil in Delhi : मनोज जरांगे पाटलांनी दिला ‘दिल्ली चलो’चा नारा; मराठा समाजाचा आवाज राजधानीत घुमणार

Raigad : खोट्या कुणबी नोंदींना ठाम विरोध, कर्जत ओबीसी महासंघ आक्रमक
3

Raigad : खोट्या कुणबी नोंदींना ठाम विरोध, कर्जत ओबीसी महासंघ आक्रमक

Karjat News : हैद्राबाद गॅझेटला ओबीसी समजाचा विरोध; जीआर रद्द करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात निवेदन
4

Karjat News : हैद्राबाद गॅझेटला ओबीसी समजाचा विरोध; जीआर रद्द करण्यासाठी तहसीलदार कार्यालयात निवेदन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.