Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शोषणमुक्ती हा कॉ. शरद पाटील यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू : कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के

कार्ल मार्क्स, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विचारवंतांच्या विचाराला एकत्र मांडताना त्यांनी शोषणमुक्ती हाच त्यांच्या लेखन कार्याचा गाभा असल्याचा विचार प्रखरपणे मांडला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 08, 2026 | 07:48 AM
शोषणमुक्ती हा कॉ. शरद पाटील यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू : कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के

शोषणमुक्ती हा कॉ. शरद पाटील यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू : कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : कॉ. शरद पाटील यांच्या साहित्याचा गाभा हा शोषणमुक्तीचा असल्याचे कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांनी सांगितले. येथील कला व वाणिज्य महाविद्यालय, शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ व विद्रोही सांस्कृतिक चळवळ यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित एकदिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उ‌द्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप गायकवाड हे होते. ‘कॉ. शरद पाटील यांच्या साहित्यातील सौंदर्यशास्त्र’ या चर्चासत्राचा विषय होता.

कुलगुरू डॉ. ज्ञानदेव म्हस्के म्हणाले, कॉ. शरद पाटील यांनी प्राचीन भारतीय तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास केला. या तत्वज्ञानाची त्यांनी आताच्या काळासाठी तार्किक मांडणी केली. बौध्द तत्वज्ञानाचा अभ्यास करताना त्यांनी त्याची आजच्या काळातील उपयुक्तता आपल्या लिखाणातून सादर केली. कॉ. शरद पाटील यांनी मार्क्सवादाच्या तत्वज्ञानाला फुले, आंबेडकर तत्वज्ञानासी जोडून घेत नवा सांस्कृतिक अध्याय उभा केला. कार्ल मार्क्स, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विचारवंतांच्या विचाराला एकत्र मांडताना त्यांनी शोषणमुक्ती हाच त्यांच्या लेखन कार्याचा गाभा असल्याचा विचार प्रखरपणे मांडला. नव्या सौंदर्यशास्त्राची मांडणी करून कॉ. शरद पाटील यांनी आपल्या विचाराची उंची सिध्द केल्याचे ही त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय चर्चासत्राचे बीजभाषण मुंबई विद्यापीठचे डॉ. अनिल सपकाळ यांनी केले. यावेळी ‘कॉ. शरद पाटील पाटील यांचा सौंदर्यशास्त्र विचार’ या विषयावर डॉ. रणधीर शिंदे, ‘नव्या सौंदर्यशास्त्राची गरज’ या विषयावर विद्रोहीचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव, ‘शोषणमुक्तीचे सौंदर्यशास्त्र’ या विषयावर प्रा. सचिन गरूड यांनी वैचारिक मांडणी केली.

चर्चासत्राच्या समारोप सत्रास प्राचार्य डॉ. सतिश घाटगे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अध्यक्ष म्हणून सातारा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे चेअरमन जयेंद्र चव्हाण हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी महाविद्यालयात अशा विचारावर मंथन झाले पाहिजे, असे मत मांडले.
या चर्चासत्रात शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे व मुंबई विद्यापीठ, मुंबई येथील अभ्यासक व प्राध्यापक सहभागी झाले होते. चर्चासत्राचे प्रास्ताविक डॉ. भरत जाधव व आभार प्रा. गौतम काटकर यांनी मानले. या आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय चर्चासत्राचे संयोजन महाविद्यालयातील मराठी, हिंदी, इंग्रजी, इतिहास, अर्थशास्त्र व वाणिज्य विभागातर्फे करण्यात आले.

सातारा पालिका सभा की औपचारिकता? ४२ विषयांना गडबडीत मंजुरी; अतिक्रमण आणि पाणीटंचाईवरून प्रशासनावर नगरसेवकांचा संताप

Web Title: Liberation from exploitation is the focal point of comrade sharad patils literature says vice chancellor dr dnyandev mhaske

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2026 | 07:48 AM

Topics:  

  • Satara News

संबंधित बातम्या

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा ‘डंका’! दीड लाख पर्यटकांची हजेरी; प्रतिसादाअभावी ९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
1

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा ‘डंका’! दीड लाख पर्यटकांची हजेरी; प्रतिसादाअभावी ९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

अमेरिकेतील अपघातानंतर १४ महिने मृत्यूशी झुंज; निलम शिंदेची अखेरची लढाई हरली; अवयवदानातून दिला जीवनाचा संदेश
2

अमेरिकेतील अपघातानंतर १४ महिने मृत्यूशी झुंज; निलम शिंदेची अखेरची लढाई हरली; अवयवदानातून दिला जीवनाचा संदेश

म्हसवड पोलीस ठाणे ‘रामभरोसे’! दोन महिन्यांपासून अधिकारीच नाही; श्वानांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये संताप
3

म्हसवड पोलीस ठाणे ‘रामभरोसे’! दोन महिन्यांपासून अधिकारीच नाही; श्वानांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये संताप

सातारा पालिका सभा की औपचारिकता? ४२ विषयांना गडबडीत मंजुरी; अतिक्रमण आणि पाणीटंचाईवरून प्रशासनावर नगरसेवकांचा संताप
4

सातारा पालिका सभा की औपचारिकता? ४२ विषयांना गडबडीत मंजुरी; अतिक्रमण आणि पाणीटंचाईवरून प्रशासनावर नगरसेवकांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.