Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सातारा पालिका सभा की औपचारिकता? ४२ विषयांना गडबडीत मंजुरी; अतिक्रमण आणि पाणीटंचाईवरून प्रशासनावर नगरसेवकांचा संताप

पायाभूत सुविधांच्या कमतरतेवरून प्रशासनावर नगरसेवकांनी जोरदार हल्लाबोल करत अतिक्रमण, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तीव्र संताप व्यक्त केला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 07, 2026 | 04:12 PM
सातारा पालिका सभा की औपचारिकता? ४२ विषयांना गडबडीत मंजुरी; अतिक्रमण आणि पाणीटंचाईवरून प्रशासनावर नगरसेवकांचा संताप
Follow Us
Follow Us:

 

  • सातारा पालिका सभा की औपचारिकता?
  • ४२ विषयांना गडबडीत मंजुरी
  • अतिक्रमण आणि पाणीटंचाईवरून प्रशासनावर नगरसेवकांचा संताप
सातारा, दि. ७ (प्रतिनिधी): सातारा नगरपालिकेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत कारभाराच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. पायाभूत सुविधांच्या कमतरतेवरून प्रशासनावर नगरसेवकांनी जोरदार हल्लाबोल करत अतिक्रमण, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर तीव्र संताप व्यक्त केला. मात्र, या सर्व चर्चेनंतर ४२ विषयांना अक्षरशः गडबडीत मंजुरी देत सभा आटोपण्यात आल्याने “ही सभा की औपचारिकता?” असा सवाल उपस्थित झाला आहे.

सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमोल मोहिते होते. सुरुवातीला गटनेते अविनाश कदम यांनी ‘वसुंधरा अभियानात’ मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला; मात्र त्यानंतर लगेचच सभागृहात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली.

अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापले. नगरसेविका मुक्ता लेवे, विनोद खंदारे आणि फिरोज पठाण यांनी अतिक्रमण विभागावर थेट निष्क्रियतेचा ठपका ठेवत कठोर कारवाईची मागणी केली. गोडोली-विलासपूर मार्गावरील, विशेषतः साईबाबा मंदिर चौकातील अतिक्रमणांवर तब्बल ४५ मिनिटे चर्चा झाली. प्रशासनाकडून “पाइपलाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर कारवाई” असे उत्तर देण्यात आले; मात्र ठोस कालमर्यादा न दिल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

स्वच्छता व्यवस्थेचा मुद्दाही तितकाच गाजला. अनेक भागात घंटागाड्या पोहोचत नसल्याच्या तक्रारी, कंत्राटी महिला कर्मचाऱ्यांचे अत्यल्प वेतन आणि ठेकेदारांच्या कथित गैरव्यवहारांमुळे आरोग्य विभागाचे कामकाजच संशयाच्या भोवऱ्यात सापडले. “हा बिहार नाही, सातारा आहे,” अशा शब्दांत स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी करत नगरसेवक जयवंत भोसले यांनी प्रशासनाला सुनावले.
पाणीटंचाईवरूनही सदस्य आक्रमक झाले. शाहूनगर परिसरात सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक त्रस्त असल्याचे नगरसेवक सुशांत महाजन आणि नगरसेविका हेमलता भोसले यांनी निदर्शनास आणले. गाळे वाटपातील कथित अनियमितता आणि भाडेवाढीचा प्रश्नही चांगलाच गाजला.

शासकीय निवासस्थानी ‘मटणावळ’ अन् ‘दारूचा पूर’; महावीर जयंतीदिनी जलसंपदा विभागाचा ‘नंगा नाच’, कृष्णा खोरे महामंडळ चर्चेत

मात्र, सभेचा शेवट सर्वाधिक वादग्रस्त ठरला. केवळ काही विषयांचे औपचारिक वाचन करून उर्वरित ४२ विषयांना एकाच वेळी मंजुरी देण्यात आली. उपनगराध्यक्ष दत्ता बनकर यांनी पुढाकार घेत सभा संपवली. त्यामुळे अनेक नगरसेवकांना आपले मुद्दे मांडण्याची संधीच मिळाली नाही. या पार्श्वभूमीवर “लोकशाही प्रक्रियेचा बळी देत निर्णय लादले जात आहेत का?” असा प्रश्न उपस्थित होत आहे. पहिल्याच सभेत उघड झालेला अविश्वास आणि गोंधळ यामुळे नगरपालिकेच्या कारभाराबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत. पुढील काळात प्रशासनाची उत्तरदायित्वाची भूमिका आणि निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकता यावरच नागरिकांचा विश्वास टिकणार आहे.

कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आर्थिक शोषणाची पोलखोल

सातारा पालिकेतील स्वच्छतेचे ठेकेदार कंत्राटी कर्मचाऱ्यांना केवळ पाच हजार रुपये पगार देतात याचा गौप्यस्फोट नगरसेवक फिरोज पठाण यांनी केला .ते म्हणाले माझ्याकडे महिला कंत्राटी कर्मचाऱ्याला पाच हजार रुपये पगार मिळतो याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे .यावरून बांधकाम सभापती बाळासाहेब खांदारे आक्रमक झाले .ते म्हणाले ठेकेदार कर्मचाऱ्यांचे पासबुक आणि एटीएम कार्ड काढून घेतात मिनिमम सेवा वेतन जे दिले जाते त्यातून त्यांचे पैसे कापून घेतले जातात आणि सातच हजार रुपये पगार दिला जातो ही कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक आहे याबाबत मुख्याधिकारी यांनी खुलासा करावा अशी आक्रमक मागणी खंदारे यांनी केली .मुख्याधिकारी बसून राहिल्याने तुम्ही मुख्य आहात की बोला की काहीतरी अशा परखड भाषेत खंदारे गरजले.मुख्याधिकारी विनोद जळक यांनी यासंदर्भात प्राप्त तक्रारीनुसार विनोद चौगुले या ठेकेदाराला काळ्या यादी टाकण्यात आल्याची स्पष्टीकरण त्यांनी दिले .अविनाश कदम यांनी सुद्धा कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळालेच पाहिजेत हा त्यांचा अधिकार आहे या संदर्भात कोणाची तक्रार असल्या त्यांनी थेट नगराध्यक्षांच्या दारात येऊन तक्रार करावी असे आवाहन केले.

Wai News: वाईत गद्दारीचा निषेध! विराज शिंदेंच्या विरोधात राष्ट्रवादीचा विराट मोर्चा, पुतळ्याचे जोडे मारून दहन

Web Title: Satara municipal council stormy meeting contract labor exploitation news updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News
  • Satara Politics

संबंधित बातम्या

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू
1

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी
2

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!
3

Satara News: विकासाच्या नावाखाली वाईच्या ऐतिहासिक घाटांची तोडफोड; कृष्णाकाठचा शेकडो वर्षांचा वारसा धोक्यात!

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत
4

Pune News: भावासोबत आनंदाने पोहायला गेली; काही वेळातच अनर्थ, १० वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.