Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हसवड पोलीस ठाणे ‘रामभरोसे’! दोन महिन्यांपासून अधिकारीच नाही; श्वानांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये संताप

गेल्या २ महिन्यांपासून म्हसवड पोलीस ठाण्याचा अतिरिक्त भार हा दहिवडी येथील स.पो.नि. दत्तात्रय दराडे यांच्याकडे सोपवण्यात आला असला, तरी त्यांची दहिवडी-म्हसवड अशी धावपळ करताना मोठी दमछाक होत आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 07, 2026 | 05:09 PM
म्हसवड, सातारा, पोलीस, जयकुमार गोरे, महाराष्ट्र पोलीस, सातारा बातम्या, Mhaswad, Satara Police, Maharashtra Police, Breaking News, Local News Satara,

म्हसवड, सातारा, पोलीस, जयकुमार गोरे, महाराष्ट्र पोलीस, सातारा बातम्या, Mhaswad, Satara Police, Maharashtra Police, Breaking News, Local News Satara,

Follow Us
Close
Follow Us:

Satara Police : माण तालुक्यातील सर्वात मोठे शहर असलेल्या म्हसवड शहरातील पोलीस ठाण्यात गेल्या २ महिन्यांपासून अधिकारीच नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. पोलीस ठाण्याला अधिकारीच नसल्याने सध्या हे पोलीस ठाणे भटक्या श्वानांचा अड्डा बनल्याचे चित्र आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बालेकिल्ल्यातील हे अत्यंत महत्त्वाचे शहर म्हणून ओळखले जाते. याच म्हसवड पोलीस ठाणे हद्दीत ४२ छोट्या-मोठ्या गावांचा समावेश आहे, तर या पोलीस ठाणे हद्दीत ८ बीट येत असून त्यासाठी ५१ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती आहे. दोन पोलीस अधिकारी या ठिकाणी कार्यरत असतात,  ज्यामध्ये एक पी.एस.आय. व एक ए.पी.आय. अशा २ अधिकाऱ्यांची नियुक्ती असते. मात्र, १४ फेब्रुवारी रोजी या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले ए.पी.आय. अक्षय सोनवणे यांची अचानक तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांची बदली होऊन जवळपास दोन महिने लोटले तरी अद्यापही त्यांच्या जागी एक सक्षम व जबाबदार अधिकारी न आल्याने पोलीस ठाणे सध्या ‘रामभरोसे’ सुरू असल्याचा प्रत्यय येत आहे. शहरात ११ एप्रिल रोजी महात्मा फुले व १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी होत असते. या काळात शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्याची प्रमुख जबाबदारी ही म्हसवड पोलिसांची असते. ही जबाबदारी यंदाही चोखपणे पार पाडण्यासाठी जयंतीपूर्वीच येथे जबाबदार पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी, अशीच अपेक्षा सर्वसामान्य म्हसवडकर जनता करीत आहे.

सातारा पालिका सभा की औपचारिकता? ४२ विषयांना गडबडीत मंजुरी; अतिक्रमण आणि पाणीटंचाईवरून प्रशासनावर नगरसेवकांचा संताप

वास्तविक पाहता, सातारा जिल्ह्यामध्ये म्हसवड हे एकमेव असे पोलीस ठाणे आहे, जिथे गेल्या २ महिन्यांपासून पोलीस अधिकारी नाही. सातारा पोलीस मुख्यालयात जवळपास असे ११ स.पो.नि. अतिरिक्त आहेत की ज्यांच्याकडे अद्याप कोणत्याही पोलीस ठाण्याचा अधिकृत कार्यभार नाही, अशीही माहिती समोर येत आहे. मात्र, त्यांच्या नियुक्तीला हिरवा कंदील अद्याप मिळाला नसल्याने ते मुख्यालयातच थांबलेले असल्याचे समजते.

खरे तर सातारा जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेले म्हसवड शहर आहे, या शहराच्या पुढे सोलापूर जिल्हा सुरू होतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत आजवर मोठ्या ताकतीने हे म्हसवड शहर उभे राहिलेले आहे. ना. गोरे हे ज्या सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्या जिल्ह्यात त्यांना सातत्याने याच म्हसवड शहरातून जावे लागते. अशा महत्त्वपूर्ण शहरातील पोलीस ठाण्याला अधिकारी नसणे, ही पोलीस दलासाठीही खेदाची बाब आहे.

यापूर्वी येथील पोलीस ठाण्यात आपली वर्णी लागावी यासाठी अनेक अधिकाऱ्यांचे ‘लॉबिंग’ सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. यावेळी सुद्धा या ठिकाणी आपली वर्णी लागावी यासाठी अनेकजण ‘फिल्डिंग’ लावून बसलेले आहेत. मात्र येथे नेमका कोणाचा नंबर लागतो, हे पाहणे जरी औत्सुक्याचे ठरणार असले, तरी येथे जो अधिकारी येईल तो निश्चितच ना. गोरे यांच्या मर्जीतील असणार यात तिळमात्र शंका नाही. तरीही, तो अधिकारी सर्वसामान्य जनतेला न्याय देणारा असावा, एवढीच माफक अपेक्षा सर्वसामान्य म्हसवडकर जनतेतून व्यक्त होत आहे.

Accident News : मसूर-उंब्रज रस्त्यावर भीषण अपघात; महिलेचा जागीच मृत्यू तर 7 महिला जखमी

प्रभारीवरच सर्व भार :

गेल्या २ महिन्यांपासून म्हसवड पोलीस ठाण्याचा अतिरिक्त भार हा दहिवडी येथील स.पो.नि. दत्तात्रय दराडे यांच्याकडे सोपवण्यात आला असला, तरी त्यांची दहिवडी-म्हसवड अशी धावपळ करताना मोठी दमछाक होत आहे. दहिवडी, म्हसवड व शिखर शिंगणापूरचे आऊटपोस्ट असा संयुक्त कारभार सध्या दराडे पाहत आहेत.

पोलीस ठाण्यात चक्क भटक्या कुत्र्यांचा वावर :

सेनापती नसल्यावर ज्याप्रमाणे सैन्य निर्धास्त होते, अगदी त्याप्रमाणेच म्हसवड पोलीस ठाण्याची अवस्था झाली आहे. येथे प्रमुख अधिकारीच नसल्याने सर्व कार्यरत कर्मचारीही निर्धास्तपणे वावरत आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यात कोण येते-जाते याकडेही त्यांचे लक्ष नाही. याचा फायदा चक्क भटक्या श्वानांनी घेतला असून भरदिवसा भटके श्वान पोलीस ठाण्यात निवांतपणे पडलेले दिसत होते. त्यांना बाहेर काढण्याची साधी तसदी कोणीही घेत नसल्याने, ‘हे पोलीस ठाणे भटक्या श्वानांचा अड्डा तर बनले नाही ना?’ असा प्रश्न येथे येणाऱ्यांना पडल्याशिवाय राहत नाही.

 

Web Title: Mhaswad police station left without officers for 2 months citizens concerned over security ahead of festivals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • Satara Crime
  • Satara News
  • Satara Police

संबंधित बातम्या

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा ‘डंका’! दीड लाख पर्यटकांची हजेरी; प्रतिसादाअभावी ९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
1

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा ‘डंका’! दीड लाख पर्यटकांची हजेरी; प्रतिसादाअभावी ९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

अमेरिकेतील अपघातानंतर १४ महिने मृत्यूशी झुंज; निलम शिंदेची अखेरची लढाई हरली; अवयवदानातून दिला जीवनाचा संदेश
2

अमेरिकेतील अपघातानंतर १४ महिने मृत्यूशी झुंज; निलम शिंदेची अखेरची लढाई हरली; अवयवदानातून दिला जीवनाचा संदेश

सातारा पालिका सभा की औपचारिकता? ४२ विषयांना गडबडीत मंजुरी; अतिक्रमण आणि पाणीटंचाईवरून प्रशासनावर नगरसेवकांचा संताप
3

सातारा पालिका सभा की औपचारिकता? ४२ विषयांना गडबडीत मंजुरी; अतिक्रमण आणि पाणीटंचाईवरून प्रशासनावर नगरसेवकांचा संताप

शाहू कला मंदिरात कंत्राटी कर्मचारी बेपत्ता अन् साऊंड सिस्टिम ठप्प; नगरपालिकेच्या कंत्राटी व्यवस्थेचा खेळखंडोबा
4

शाहू कला मंदिरात कंत्राटी कर्मचारी बेपत्ता अन् साऊंड सिस्टिम ठप्प; नगरपालिकेच्या कंत्राटी व्यवस्थेचा खेळखंडोबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.