Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुकाराम मुंढेंची पुन्हा मोठी कारवाई; आयुर्वेदिक औषध कंपन्यांचे परवानेच केले रद्द

परवाने रद्द करण्यात आलेल्या संस्थांमध्ये गोंदिया व पुण्यामध्ये सर्वाधिक संस्था आहेत. गोंदियातील लालशाह ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स, आदित्य फार्मा, अंगरस आयुर्वेद, हिलॅरियस आयुर्वेद या चार संस्थांचे परवाने रद्द करण्यात आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 13, 2026 | 03:33 PM
तुकाराम मुंढेंची पुन्हा मोठी कारवाई; आयुर्वेदिक औषध कंपन्यांचे परवानेच केले रद्द

तुकाराम मुंढेंची पुन्हा मोठी कारवाई; आयुर्वेदिक औषध कंपन्यांचे परवानेच केले रद्द

Follow Us
Follow Us:

मुंबई : गुटखा, सुगंधित तंबाखू विक्रेते, हॉटेल, रेस्टॉरंट आणि औषध विक्रेत्यांविरोधात कारवाई सुरू असतानाच अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यातील आयुर्वेदिक उत्पादक संस्थांविरोधातही धडक मोहीम राबविली आहे. राज्यातील ४३४ परवानाधारक आयुर्वेदिक उत्पादक संस्थांची तपासणी करण्यात आली.

नियमांचे पालन न करणाऱ्या १३५ संस्थांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या १० आयुर्वेदिक औषध उत्पादकांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. या तपासणीत औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०, नियम १९४५ तसेच परिशिष्ट ‘टी’नुसार संस्थांकडून होणाऱ्या अनुपालनाची पडताळणी करण्यात आली.

कारखाना परिसर, तांत्रिक मनुष्यबळ, चांगल्या उत्पादन पद्धती, गुणवत्ता नियंत्रण विभाग, कच्चा माल व तयार औषधांच्या चाचणी नोंदी, बॅच उत्पादन अभिलेख, वितरण नोंदी आणि तक्रार नोंदवहीची तपासणी झाली. तपासणीत मान्यताप्राप्त तांत्रिक व्यक्तींची अनुपस्थिती, गुणवत्ता नियंत्रण विभाग कार्यरत नसणे, आवश्यक यंत्रसामग्रीचाअभाव, अस्वच्छता, उत्पादन नोंदींमध्ये तफावत, लेबलवर चुकीचा उत्पादन दिनांक, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण व वैद्यकीय तपासणीच्या नोंदींचा अभाव अशा गंभीर त्रुटी आढळल्या.

डॉमिनोझच्या 3 दुकानांवर बडगा

मुंबईतील विलेपार्ले, बोरीवली आणि घाटकोपर येथील डॉमिनोझच्या तीन दुकानांचे खाद्य व्यवसाय परवाने एफडीएने निलंबित केले. तपासणीत स्वच्छता, अन्नसाठवणूक, तापमान नियंत्रण, कीटकनियंत्रण आणि कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेत गंभीर त्रुटी आढळल्या. आर-सिटी मॉलमधील दुकानात कीटकांचा प्रादुर्भाव तसेच फिफो, फेफो नियमांचे उल्लंघन आढळले. आवश्यक कागदपत्रे, स्वच्छता वेळापत्रक आणि कर्मचाऱ्यांच्य वैद्यकीय तपासणीचे रेकॉर्डही उपलब्ध नव्हते. कराडमधील डोमिनोज दुकानावरही कारवाई झाली.

गोंदिया व पुण्यामध्ये सर्वाधिक संस्था

परवाने रद्द करण्यात आलेल्या संस्थांमध्ये गोंदिया व पुण्यामध्ये सर्वाधिक संस्था आहेत. गोंदियातील लालशाह ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स, आदित्य फार्मा, अंगरस आयुर्वेद, हिलॅरियस आयुर्वेद या चार संस्थांचे परवाने रद्द करण्यात आले असून त्याखालोखाल पुण्यातील कृष्णा हर्बल, कालिदास गांधी, मे. इंडुकेअर फार्मा प्रा. जेजुरी एमआयडीसी या तीन संस्था, नाशिकमधील शिवनाथ आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स कंपनी, यशोदा लॅब प्रा. लि या दोन आणि अमरावतीमधील हकीम आयुर्वेदिक ब्युटी केअर आयुर्वेदिक औषधांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो.

ग्रंथोक्त औषधांचे उत्पादन मान्यताप्राप्त संदर्भ ग्रंथात विहित करण्यात आल्याप्रमाणे व पेटंट आणि मालकीहक्क औषधांचे उत्पादन व गुणनियंत्रण नियमातील ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे करणे बंधनकारक आहे. असे न करणाऱ्या उत्पादकविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांवरील कँटीनकडे; सिल्लोडमध्ये FDA ची धडक कारवाई

Web Title: Licenses of ayurvedic medicine companies cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • FDA Action
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Tukaram Mundhe on Nana Patekar: ‘लव्ह यू, बाळा! माझा अत्यंत जिवलग मित्र गमावला…’, नाना पाटेकरांच्या निधनाने तुकाराम मुंढे भावुक
1

Tukaram Mundhe on Nana Patekar: ‘लव्ह यू, बाळा! माझा अत्यंत जिवलग मित्र गमावला…’, नाना पाटेकरांच्या निधनाने तुकाराम मुंढे भावुक

बस नाम ही काफी है! Tukaram Mundhe यांची धडक कारवाई; दुधात डिटर्जंटचा घातक खेळ, सोनाई डेअरीपर्यंत धागे?
2

बस नाम ही काफी है! Tukaram Mundhe यांची धडक कारवाई; दुधात डिटर्जंटचा घातक खेळ, सोनाई डेअरीपर्यंत धागे?

Chemical Ripened Bananas: तुर्भे APMC मध्ये 1,394 किलो रासायनिक पिकवलेली केळी जप्त; ‘इथेफॉन’चा वापर, केमिकलयुक्त केळी कशी ओळखाल
3

Chemical Ripened Bananas: तुर्भे APMC मध्ये 1,394 किलो रासायनिक पिकवलेली केळी जप्त; ‘इथेफॉन’चा वापर, केमिकलयुक्त केळी कशी ओळखाल

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; तब्बल 1900 किलो खाद्यपदार्थ केले जप्त
4

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; तब्बल 1900 किलो खाद्यपदार्थ केले जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.