Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बस नाम ही काफी है! Tukaram Mundhe यांची धडक कारवाई; दुधात डिटर्जंटचा घातक खेळ, सोनाई डेअरीपर्यंत धागे?

Tukaram Mundhe: मंचर प्रकरणात भेसळ द्रव्य व रसायन पुरवठादार, वाहतूकदार, दूध संकलन व शीतकरण केंद्रे तसेच दुग्ध व्यावसायिक अशा ३७ आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 07, 2026 | 08:25 PM
दुधात डिटर्जंटचा घातक खेळ, भेसळीचे धागे सोनाई डेअरीपर्यंत

दुधात डिटर्जंटचा घातक खेळ, भेसळीचे धागे सोनाई डेअरीपर्यंत

Follow Us
Follow Us:
  • दुधात डिटर्जंटचा घातक खेळ, भेसळीचे धागे सोनाई डेअरीपर्यंत
  • मंचरपासून माळशिरसपर्यंत एफडीएची कारवाई
  • ३७ आरोपी निष्पन्न, १६,७३० लिटर दूध नष्ट
Tukaram Mundhe/FDA: दुधात डिटर्जंट आणि नॉनिलफेनॉल इथॉक्सिलेटसारख्या रसायनांची भेसळ करून ते पुढे प्रक्रिया डेअऱ्यांपर्यंत पोहोचविणाऱ्या साखळीचा अन्न व औषध प्रशासनाने पर्दाफाश केला आहे. पुणे जिल्ह्यातील मंचरपासून सुरू झालेल्या तपासात भेसळयुक्त दूध इंदापूर येथील सोनाई डेअरीपर्यंत पोहोचत असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात आतापर्यंत ३७ आरोपी निष्पन्न झाले असून २५ जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच (Tukaram Mundhe) माळशिरस येथील दोन कारवायांमध्ये १६ हजार ७३० लिटर दूध नष्ट करण्यात आले.

अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ४ जुलै रोजी आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील मे. नवकार डिस्ट्रिब्युटर्सवर संयुक्त कारवाई करण्यात आली. या ठिकाणी व्हे पावडर, व्हे परमिएट पावडर, डिटर्जंट, इमल्सिफायर आदी भेसळीसाठी वापरल्या जाणाऱ्या संशयित पदार्थांचा साठा आढळला. याप्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान मंचर येथील मे. आकाश डेअरी फार्ममधून घेतलेल्या सहाही दूध नमुन्यांमध्ये डिटर्जंट आढळले. पूरक अहवालात या नमुन्यांमध्ये नॉनिलफेनॉल इथॉक्सिलेट असल्याचेही स्पष्ट झाले. तसेच अथर्व मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट इंडस्ट्रीजच्या नमुन्यातही डिटर्जंट आढळून दूध मानवी सेवनास असुरक्षित असल्याचे निष्पन्न झाले.

Pune University Canteen Raid: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात FDAची धडक कारवाई! निकृष्ट अन्नावरून कॅन्टीन चालकाला नोटीस

३७ आरोपी; २६ आस्थापनांवर कारवाई –

मंचर प्रकरणात भेसळ द्रव्य व रसायन पुरवठादार, वाहतूकदार, दूध संकलन व शीतकरण केंद्रे तसेच दुग्ध व्यावसायिक अशा ३७ आरोपींची नावे निष्पन्न झाली आहेत. त्यापैकी २५ आरोपींना अटक करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. उर्वरित १२ आरोपींना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. आतापर्यंत २६ अन्न आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित अथवा व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सोनाई डेअरीपर्यंत पुरवठ्याचे धागे 

तपासाची व्याप्ती सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसपर्यंत पोहोचली. पिलीव येथील महालक्ष्मी मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्समधील ७,६३४ लिटर आणि डेलीविश अॅग्रो डेअरी प्रॉडक्टमधील ९,०९६ लिटर दूध नष्ट करण्यात आले. दोन्ही ठिकाणच्या नमुन्यांमध्ये दुधातील चरबी व घन पदार्थांचे प्रमाण निर्धारित मानकांपेक्षा कमी आणि डिटर्जंट आढळले.

महालक्ष्मी मिल्कमधील दूध योगिनीनाथा मिल्क सप्लायर्सच्या टँकरद्वारे इंदापूर येथील सोनाई डेअरी अर्थात इंदापूर डेअरी अँड मिल्क प्रॉडक्ट्स लिमिटेडकडे पाठविल्याचे दूध वितरण व टँकर पोहोच चलन तपासात मिळाले. याशिवाय अन्य एका मार्गानेही भेसळयुक्त दूध सोनाई डेअरीला विकले जात असल्याचे प्रथमदर्शनी तपासात समोर आले आहे. माळशिरसच्या दोन्ही प्रकरणांत एकूण १६,७३० लिटर दूध, सुमारे १६.६९ लाख रुपये किमतीचे, नष्ट करण्यात आले असून संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तुटलेला फ्रिज, शाकाहारी- मांसाहारी अन्न एकत्र अन्…; गुडइयर कॅन्टीनला FDA चा दणका

‘आर्थिक फायद्यासाठी दुधात अनधिकृत पदार्थांचा वापर करून नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. भेसळीचा अंतिम नमुना पकडण्याबरोबरच मूळ पुरवठादारापासून अंतिम दूध पुरवठ्यापर्यंतची संपूर्ण साखळी शोधली जात आहे.’
– तुकाराम मुंढे, आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य

Web Title: Tukaram mundhe fda take action and adulterated milk pune manchar sonai dairy indapur breaking news tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 08:25 PM

Topics:  

  • Adulterating Milk
  • FDA
  • FDA Raid
  • milk
  • Tukaram Mundhe

संबंधित बातम्या

Pune University Canteen Raid: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात FDAची धडक कारवाई! निकृष्ट अन्नावरून कॅन्टीन चालकाला नोटीस
1

Pune University Canteen Raid: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात FDAची धडक कारवाई! निकृष्ट अन्नावरून कॅन्टीन चालकाला नोटीस

Chemical Ripened Bananas: तुर्भे APMC मध्ये 1,394 किलो रासायनिक पिकवलेली केळी जप्त; ‘इथेफॉन’चा वापर, केमिकलयुक्त केळी कशी ओळखाल
2

Chemical Ripened Bananas: तुर्भे APMC मध्ये 1,394 किलो रासायनिक पिकवलेली केळी जप्त; ‘इथेफॉन’चा वापर, केमिकलयुक्त केळी कशी ओळखाल

FDA Hits Vaijapur: वैजापूरमध्ये FDAचा दणका! नॅचरल डेअरीचा परवाना निलंबित; पनीर-तुपाचा साठा नष्ट
3

FDA Hits Vaijapur: वैजापूरमध्ये FDAचा दणका! नॅचरल डेअरीचा परवाना निलंबित; पनीर-तुपाचा साठा नष्ट

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका; गुटखा जप्त, नियमभंग करणाऱ्या चहा सेंटरचाही परवाना निलंबित
4

बीडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा दणका; गुटखा जप्त, नियमभंग करणाऱ्या चहा सेंटरचाही परवाना निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.