खेडमध्ये राजकारण तापले (फोटो - सोशल मीडिया)
खेडात महायुती फिस्कटणार?
नप निवडणुकीत मोठी धुसफूस
भाजपाचा ‘एकला चलो रे’चा नारा
खेड: खेड नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर वरच्या स्तरावर ‘महायुती’चा निर्णय झाला असला तरी, स्थानिक राजकारण मात्र पूर्णपणे ढवळून निघाले आहे. शिवसेना (शिंदे गट), भारतीय जनता पक्ष (भाजपा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जागावाटपावरून, नेतृत्वावरून तीव्र मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. भाजपाने ‘एकला चलो रे’चा नारा दिल्याने खेडमध्ये महायुतीचा फॉर्म्युला फिस्कटण्याची चिन्हे स्पष्ट झाली. शिवसेना (शिंदे गट) यांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली असून, नगराध्यक्ष पदासह एकूण २० नगरसेवक पदाचे उमेदवार निश्चित केले आहेत. १२ नोव्हेंबर रोजी माजी मंत्री रामदास कदम व गृहराज्यमंत्री कदम यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी सुरू आहे.
खेडात शिवसेना-भाजपा संघर्ष गेला टोकाला
महायुतीत असतानाही भाजपाने स्वतंत्र भूमिका घेत ‘स्वबळाचा’ नारा दिला आहे. त्यामुळे खेडमधील शिवसेना-भाजप संघर्ष टोकाला गेला आहे. भाजपाने नगराध्यक्ष पदासाठी वैभवी खेडेकर यांना उमेदवार म्हणून पुढे केले आहे. अलीकडील एका बैठकीत माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी ‘एकला चलो रे’ अशी आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी थेट गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडले. दळवींच्या या भूमिकेमुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील संघर्ष अधिक चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आहे नाराज
महायुतीतील तिसरा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्येही नाराजीचा सूर आहे, विश्वासात न घेतल्याचा आरोपः राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जागा वाटपाच्या प्रक्रियेत आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा आणि ‘डावलल्याचा’ सूर व्यक्त केला आहे. स्थानिक स्तरावर व्यक्त झालेल्या या तीव्र नाराजीची माहिती बेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापर्यंत पोहोचली आहे. त्यांनी, रस्थानिक स्तरावर विनधास्त लढा चार असा स्पष्ट सल्ला दिल्याचे वृत्त आहे.
Maharashtra Politics: कोकणात महायुती डळमळणार; ‘या’ नगरपरिषदेसाठी भाजप स्वबळाचा नारा देणार?
विरोधी गटांकडूनही तयारी झाली सुरू
महायुतीत तणाव असतानाच, विरोधी गटांकडूनही निवडणुकीची तयारी सुरू आहे. शिवसेना (ठाकरे गट) यांनीही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे.






