Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

युद्धाचा सर्वसामान्यांना फटका! मावळमध्ये घरगुती गॅससाठी नागरिकांच्या भरऊन्हात लांबच रांगा

आखाती देशांमध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम आता भारतामध्ये दिसू लागला आहे. एलपीजी गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिक वडगाव मावळमध्ये सिलेंडर मिळवण्यासाठी मोठी धावपळ करत आहेत.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 11, 2026 | 04:12 PM
Long queues of customers to get LPG gas due to war wadgaon Maval News

Long queues of customers to get LPG gas due to war wadgaon Maval News

Follow Us
Close
Follow Us:

वडगाव मावळ : सतिश गाडे : मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या अमेरिका आणि इराणमधील युद्धाच्या (Iran-Israel War) पार्श्वभूमीवर त्याचे परिणाम आता महाराष्ट्रातील ग्रामीण भागातही जाणवू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या तणावामुळे इंधन व नैसर्गिक वायू पुरवठ्यावर परिणाम होत असल्याची चर्चा असून त्याचा थेट परिणाम देशांतर्गत बाजारावर दिसून येत आहे. परिणामी पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाल्याने ग्रामीण जनतेच्या अर्थकारणावर मोठा ताण पडत आहे. (Maval News)

मावळ तालुक्यातील वडगाव मावळ, तळेगाव तसेच परिसरातील ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे. गॅस सिलेंडरचा पुरवठा अपुरा असल्याने नागरिकांना सिलेंडर मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. अनेक ठिकाणी गॅस एजन्सीसमोर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागत असून सिलेंडर मिळवण्यासाठी मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

दरम्यान, इस्रायल व अमेरिकेकडून इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे जागतिक स्तरावर नैसर्गिक वायू आणि इंधन पुरवठ्यात अडथळे निर्माण झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीचा परिणाम इंधनाच्या दरांवर होत असून घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात सुमारे ११५ रुपयांची, तर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात सुमारे ६० रुपयांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे.
वाढत्या महागाईमुळे आधीच त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांवर गॅस दरवाढीचा अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. त्यामुळे सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करावा तसेच दरवाढीवर नियंत्रण आणावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हे देखील वाचा : कोकणचा ‘राजा’ भीषण संकटात! ढगाळ वातावरण, धुके अन्…; मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

दरम्यान, अमेरिका आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक स्तरावर ऊर्जा बाजारपेठेत मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. इराण हा जगातील महत्त्वाचा तेल व नैसर्गिक वायू उत्पादक देश मानला जातो. त्यामुळे या भागात निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम थेट आंतरराष्ट्रीय इंधन बाजारावर होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मध्यपूर्वेतील तणाव वाढल्यास कच्च्या तेलाचा व नैसर्गिक वायूचा पुरवठा कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम भारतासारख्या आयातदार देशांवर होऊ लागला आहे. भारतात वापरल्या जाणाऱ्या पेट्रोल, डिझेल तसेच एलपीजी गॅसचा मोठा हिस्सा परदेशातून आयात केला जातो. त्यामुळे जागतिक बाजारातील दरवाढ आणि पुरवठ्यातील अडचणींचा परिणाम देशांतर्गत दरांवर आणि उपलब्धतेवर होत असल्याचे दिसून येत आहे.

हे देखील वाचा : “नाल्यातून गॅस निर्मिती अन् पुन्हा एकदा बैलगाड्यांचे युग…! गॅस तुटवड्यावरुन खासदार संजय राऊतांचे टीकास्त्र

विशेषतः ग्रामीण भागात गॅस वितरणाची व्यवस्था आधीच मर्यादित असल्यामुळे अशा आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा परिणाम अधिक तीव्रतेने जाणवत आहे. परिणामी वडगाव मावळसह मावळ तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली असून नागरिकांना सिलेंडर मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत आहे. काही ठिकाणी नागरिकांनी गॅस एजन्सीकडे वारंवार चौकशी करूनही सिलेंडर उपलब्ध होत नसल्याची तक्रार केली आहे.

Web Title: Long queues of customers to get lpg gas due to war wadgaon maval news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • Iran-Israel War
  • LPG gas cylinder
  • maval news

संबंधित बातम्या

LPG च्या वाढत्या किमतींना नितीन गडकरींचा मास्टरस्ट्रोक! सादर केली स्वस्तातली नवीन टेक्नॉलॉजी
1

LPG च्या वाढत्या किमतींना नितीन गडकरींचा मास्टरस्ट्रोक! सादर केली स्वस्तातली नवीन टेक्नॉलॉजी

LPG Rate Today: पेट्रोल आणि डिझेलनंतर, आता LPG सुद्धा महागला? काय आहेत आजचे गॅस सिलिंडरचे दर?
2

LPG Rate Today: पेट्रोल आणि डिझेलनंतर, आता LPG सुद्धा महागला? काय आहेत आजचे गॅस सिलिंडरचे दर?

NEET पेपरफुटी प्रकरणावरुन मावळ काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी
3

NEET पेपरफुटी प्रकरणावरुन मावळ काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

मावळला पुन्हा ‘लाल दिवा’ मिळणार? आमदार सुनील शेळके यांच्या मंत्रीपदाच्या चर्चांना उधाण
4

मावळला पुन्हा ‘लाल दिवा’ मिळणार? आमदार सुनील शेळके यांच्या मंत्रीपदाच्या चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.