मुंबई : भाजपा नेते व माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somayya) पुन्हा एकदा अँक्शन मोडमध्ये आले आहे. माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक, माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Nawab Mailk, anil deshmukh and sanjay raut) यांना तुरुंगात पाठवल्यानंतर, आता किरीट सोमय्या यांनी आपल्या मोर्चा अनिल परब, आदित्य ठाकरे व अस्लम शेख (Anil parab, Aditya Thackeray and Aslam Shaikh) यांच्याकडे वळविला आहे. अनिल परब यांचा रिसॉर्ट (Anil Parab Resort) लवकरच तुटणार असल्याचं सोमय्यांनी सांगितलं आहे. तसेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आज पुन्हा त्यांनी अस्लम शेख आणि आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मढ मार्वे (Madh Marve studio) येथील सीआरझेड (CRZ) जमिनीवर अनधिकृत स्टुडिओच्या बांधकामाला तत्कालीन पालकमंत्री अस्लम शेख व राज्यातील पर्यटन मंत्रालयाने परवानगी कशी दिली? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
[read_also content=”अब दिल्ली दूर नही…, पण भाजपाचे ‘हे’ मनसुबे मिळाले धुळीस https://www.navarashtra.com/india/after-maharashtra-political-changes-then-bjp-next-traget-to-delhi-319590.html”]
दरम्यान, सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून मढ मार्वे येथे स्टुडिओ बांधण्यात आला आहे. तसेच या प्रकल्पात जवळपास एक हजार कोटींचा भ्रष्टाचार अस्लम शेख व आदित्य ठाकरेंनी केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. या स्टुडिओची पाहणी अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांनी केली होती, तरी सुद्धा बांधकामास परवानगी कशी काय मिळाली असा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला आहे. किरीट सोमय्या, आमदार अतुल भातखळकर, खासदार गोपाळ शेट्टी यांनी मढ मार्वे येथील स्टुडिओची पाहणीही केली. यावेळी महापालिकेचे अधिकारीही उपस्थित होते. तसेच, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. दरम्यान, केंद्राने ही जागा सीआरझेडच्या अंतर्गत आहे असं म्हटलं आहे, पण राज्यातील पर्यटन विभागाने या बांधकामास परवानी कशी दिली असा सवाल सोमय्यांनी उपस्थित केला आहे.