Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 21 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahabaleshwar Monsoon Update:महाबळेश्वर-पाचगणी रस्त्यावर तीव्र वाहतूक कोंडी, स्ट्रॉबेरी शेती पाण्याखाली

Mahabaleshwar Rain: स्कूलमोहल्ला परिसरात गटाराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच उप

  • By anuradha sagar
Updated On: Jul 06, 2026 | 12:53 PM
Mahabaleshwar Rain Updates, Mahabaleshwar Panchgani

Mahabaleshwar Rain Updates, Mahabaleshwar Panchgani

Follow Us
Follow Us:
  • संततधार पाऊस, दाट धुके आणि वेगवान वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली
  • वेण्णा नदीच्या सांडव्यावरील पाणी धोक्याच्या पातळीवर
  • गटाराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
Mahabaleshwar Monsoon Update: तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. संततधार पाऊस, दाट धुके आणि वेगवान वाऱ्यांमुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून रस्ते वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला आहे. दुसरीकडे, पर्यटकांची मोठी गर्दी आणि खराब हवामानामुळे शहरासह महाबळेश्वर–पाचगणी मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली. (Mahabaleshwar Monsoon Update: Heavy Rain Disrupts Life)

रांजणवाडी परिसरात भर पावसात एका इनोव्हा कारवर मोठे झाड कोसळल्याने वाहनाचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तर महाबळेश्वर–तापोळा मार्गावरही झाड उन्मळून पडल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर नगरपरिषदेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परतेने झाड हटवून वाहतूक सुरळीत केली. नगरपरिषदेच्या या तत्पर कार्यवाहीचे नागरिकांनी कौतुक केले.

Mumbai Rain : ‘सर्व खासगी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना…’, IMD चा रेड अलर्ट; ९० किमी वेगाच्या वाऱ्यांचा इशारा, WFH चे निर्देश

सततच्या पावसामुळे वेण्णा नदीच्या सांडव्यावरील पाणी धोक्याच्या पातळीच्या जवळ पोहोचले असून आणखी पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील दोन दिवसांत सांडव्यावरून पाणी वाहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लिंगमळा परिसरातील अनेक शेतांमध्ये पाणी साचू लागले असून स्ट्रॉबेरी शेती पाण्याखाली केली आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरी रोपाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

दरम्यान, स्कूलमोहल्ला परिसरात गटाराचे पाणी घरांमध्ये शिरल्याने स्थानिक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच उपनगराध्यक्ष नासिर मुलाणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

शनिवार व रविवार सुटीचे दिवस असल्याने मुंबई, पुणे, गुजरातसह विविध भागांतून मोठ्या संख्येने पर्यटक महाबळेश्वरात दाखल झाले. त्यामुळे मॅप्रो गार्डन, वेण्णा लेक आणि शहर परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. त्यातच मुसळधार पावसामुळे परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या पर्यटकांच्या वाहनांच्या रांगा महाबळेश्वर–पाचगणी–वाई मार्गावर लागल्या.

मावळ तालुक्यातील पाटण गावात घरावर दरड कोसळली; कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

दाट धुके, मुसळधार पाऊस आणि रस्त्यांवरील मोठमोठे खड्डे यामुळे वाहनचालकांना रात्रीच्या वेळी अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. महाबळेश्वर–पाचगणी मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी रिफ्लेक्टर साईड पट्टे व स्पष्ट मार्गदर्शक चिन्हांचा अभाव असल्याने धुक्यात वाहन चालविणे धोकादायक ठरत असून अपघाताचा धोका वाढला आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, २ जुलै रोजी ८२ मि.मी., ३ जुलै रोजी १८६ मि.मी., ४ जुलै रोजी २६६ मि.मी. आणि ५ जुलै रोजी १९८ मि.मी. अशी पावसाची नोंद झाली आहे. अवघ्या चार दिवसांत सुमारे ७३२ मि.मी. (सुमारे २८ इंच) पावसाची नोंद झाल्याने महाबळेश्वर तालुक्यात सर्वत्र ओढे-नाले दुथडी भरून वाहत असून जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवसही मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने प्रशासनाने नागरिक व पर्यटकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडू नये, घाटरस्त्यांवर सावधगिरी बाळगावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन केले आहे.

Web Title: Mahabaleshwar monsoon update heavy rain traffic jam panchgani road strawberry crop damage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • Mahabaleshwar News
  • Maharashtra Monsoon
  • Monsoon News

संबंधित बातम्या

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…
1

Weather Update : महाराष्ट्र, आसाम, केरळसह देशातील 21 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागने म्हटले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.