फोटो सौजन्य सोशल मीडिया
या धडकेत मुलगी संजीवनी लांबाते गंभीर जखमी झाली असून तिच्या आईसह इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे. सुदैवाने जीवितहानी टळली असून अपघाताचे नेमके कारण पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
महाबळेश्वर-पाचगणी परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या इको वाहनाला रोहा-कोल्हापूर एसटी बसने (क्रमांक एम.एच.१४ KQ ३९७२) धडक दिल्याने मेटगुताड परिसरात मोठा अपघात झाला. हा अपघात महाबळेश्वर-पाचगणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडला असून इको वाहनाचे (एम.एच.४२ बी.जे.०१४४) मोठे नुकसान झाले आहे. पुण्याच्या इंदापूर येथील अमोल सदाशिव लांबाते (वय ३९) हे कुटुंबासह महाबळेश्वरला पर्यटनासाठी आले होते.
या धडकेत लांबाते यांची मुलगी संजीवनी अमोल लांबाते गंभीर जखमी झाली असून तिच्या आईला किरकोळ दुखापत झाली आहे. इतर काही जणांनाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती आहे. अपघाताची तीव्रता मोठी असूनही सुदैवाने जीवितहानी टळली आहे. जखमींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
Satara News: सत्तेची हवा नाही! वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत व्यापाऱ्यांच्या कट्ट्यावर
पोलिस तपास सुरूस्थानिकांच्या म्हणण्यानुसार, घाटरस्ते, तीव्र वळणे आणि अरुंद रस्त्यांचा अंदाज न आल्याने बस चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पर्यटकांच्या वाहनावर आदळली. वेळेत पोहोचण्याच्या घाईत काही एसटी चालक घाटात वेगाने गाडी चालवत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या अपघाताची नेमकी कारणे वाहनाचा वेग, चालकाचा निष्काळजीपणा आणि रस्त्याची स्थिती याबाबत पोलिस तपासानंतर स्पष्ट होणार आहे.






