Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Election 2024: आधी योगी आदित्यनाथांवर टीका; आता अजित पवारांना बारामतीत नकोय मित्रपक्षांची सभा

बारामतीतही अजित पवारांचा सूर वेगळाच दिसत आहे. नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते आज धुळ्यात महायुतीची सभा घेणार आहेत. पण अजित पवार यांच्या वक्तव्याची राज्यात चर्चा रंगू लागली आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 08, 2024 | 02:43 PM
जयंत पाटलांनी गलिच्छ राजकारण केलं : अजित पवार

जयंत पाटलांनी गलिच्छ राजकारण केलं : अजित पवार

Follow Us
Close
Follow Us:

बारामती:  राज्यात प्रचारसभांचा जोर वाढू लागला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नागपूरमधून महाविकास आघाडीच्या प्रचाराचा नारळ फोडला, तर भारतीय जनता पक्षानेही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही प्रचारात उतरवले. मुख्यमंत्री योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या वक्तव्याने राजकीय वातावरण ढवळून निघालं, विधानसभेतील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदीदेखील आज महाराष्ट्रात प्रचारसभा घेणार आहेत.धुळे जिल्ह्यातील गोशाळा मैदानावर होणाऱ्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पण महायुतीतीत घटक पक्षांमध्ये मात्र वेगळचं काहीतरी सुरू असल्याचे दिसत आहे. महायुतीत अजित पवार यांनी आपला सूर बदलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. विधानसभेच्या निकालानंतर राज्यातील सत्तासमीकरणे बदलू शकतात, असा दावा अजित पवारांच्या जवळच्या आमदारांकडून केला जात आहे. विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळात उलथापालथ होण्याचे संकेतही दिले जात आहेत. त्यामुळे महायुतीची धाकधूक वाढू लागली आहे.

हेही वाचा: अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 5 पैशांनी घसरून 84.37 च्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर

दरम्यान, युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल केलेल्या बटेंगे तो कटेंगे या विधानामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पण अजित पवार यांनी मात्र त्यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. राज्याच्या बाहेरचे लोक येऊन अशी विधाने करत असतात. पण आपल्या महाराष्ट्राती लोकांनी कायम सौहार्द जपलं आहे. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालतो, असा टोलाही त्यांनी लगावला.

तर अजित पवार गटाचे नेत नवाब मलिक यांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला होता. तरीही भाजपचा विरोध डावलून अजित पवारांनी नवाब मलिकांना तिकीट दिले. तर मानखुर्दमधून मलिकांच्या कन्या सना मलिक यांना अणुशक्तीनगर या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. पण त्यातच खुद्द नवाब मलिक यांनीच निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील सत्ता समीकरणे बदलू शकतात, असे संकेत दिले आहेत.

हेही वाचा: “वीज पुरवठा खंडीत करु…”; अदानी समूहाची बांग्लादेशाला धमकी, नेमकं प्रकरण काय?

दुसरीकडे बारामतीतही अजित पवारांचा सूर वेगळाच दिसत आहे. नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. ते आज धुळ्यात महायुतीची सभा घेणार आहेत. पण अजित पवार यांच्या वक्तव्याची राज्यात चर्चा रंगू लागली आहे. निवडणुकीमुळे आधीच राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच बारामतीत त्यांना कुणाच्याच रॅली, सभा, प्रचाराची गरज नसल्याचेही समोर आले आहे. उलट मोदींच्या प्रचारसभेची इतर विधानसभा मतदारसंघांना गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Web Title: Maharashtar assembly election 2024 why did ajit pawar reject the meeting of allies in baramati nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2024 | 02:43 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Maharashtra Assembly election 2024
  • nawab malik
  • Yogi adityanath

संबंधित बातम्या

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको
1

Beed News : गुत्तेदाराकडून 30 लाखांची फसवणूक; संतप्त गावकऱ्यांचा राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार
2

सांगली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करू : उपमुख्यमंत्री अजित पवार

सूरज चव्हाण ‘रिटर्न’! फ्री स्टाईल हाणामारीनंतर थेट मिळाली पदोन्नती; अजित पवारांच्या निर्णयावर टीका
3

सूरज चव्हाण ‘रिटर्न’! फ्री स्टाईल हाणामारीनंतर थेट मिळाली पदोन्नती; अजित पवारांच्या निर्णयावर टीका

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..
4

Ajit Pawar on Meat ban: १५ ऑगस्टला मांस विक्रीवर बंदी…! अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले श्रद्धेचा प्रश्न असल्यास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.