"वीज पुरवठा खंडीत करु..."; अदानी समूहाची बांग्लादेशाला धमकी, नेमकं प्रकरण काय?
बांग्लादेशातील राजकराणात होणारे पडसाद शेजारील देशांवर उमटताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर जागतिक स्तरावर पुन्हा एकदा बांग्लादेश चर्चेत येताना दिसत आहे. याच कारण म्हणजे अदानी पॉवर हाऊस. झारखंडमधील फॅक्टरीत कोळश्याचा वापर करुन अदानी समूहाकडून वीजनिर्मिती केली जाते. या फॅक्टरीतून तयार होणाऱ्या विजेचा पुरवठा काही प्रमाणात बांग्लादेशाला केला जातो. सुमारे 1,600 मेगावॅट वीज अदानी समूह बांग्लादेशाला पुरवते. बांग्लादेशमधील राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थिती पाहता, अदानी समूहाने बांगलादेश पॉवर बोर्डाला 7000 कोटी रुपयांहून अधिक कर्ज दिले आहे होते.
या कर्जाची दखल घेण्यासाठी अदानी समूहाने सतत बांग्लादेश पॉवर बोर्डाला अधिकृत नोटीस पाठवली होती. मात्र वारंवार पाठपुरवठा करुनही बांग्लादेश पॉवर बोर्डाची अपेक्षित प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे झारखंड अदानी समूहाने याबाबत ठोस भूमिका घेतली आहे. बांग्लादेश दिलेल्या कर्जाची दखल घेत नाही हे लक्षात घेत झारखंड अदानी समूहाने वीजेचा करण्यात येणारा पुरवठा निम्याने कमी केला. त्यामुळे बांगलादेशात वीजेअभावी अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या.
हेही वाचा-Godrej च्या उत्पादनांना मोठी मागणी !मेक्सिकोतील रिफायनरीसाठी 20 हून अधिक उपकरणांचा करणार पुरवठा
सदर परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेत बांग्लादेश पॉवर बोर्ड नेअदानी समूहाला वीज पुरवठा खंडित न करण्याचं आवाहन केलं. तसंच प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेत बांग्लादेशने वीज पुरवठा सुरू ठेवण्यासाठी सुमारे 1,450 कोटी रुपयांचे नवीन लेटर ऑफ क्रेडिट (LC) जारी केले आहे.
इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, बांग्लादेशाला दिलेल्या कर्जाबाबत अदाने समूहाने त्याचा वारंवार पाठपुरावा केला. मात्र बांग्लादेशाने या कर्जाबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नाही की, कर्ज परत करण्याबाबत आश्वासनंही दिलं नाही. त्यामुळे ही बाब लक्षात घेत अदानी समूहाने वीजपुरवठा अर्ध्यावर आणून पुरवठा बंद करण्याची धमकी बांग्लादेशाला दिली. त्यानंतर रुपये 1,450 कोटींचे बांग्लादेशाने नवीन लेटर ऑफ क्रेडिट (LC) जारी केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डाने अदानी समूहाने तिसरे क्रेडिट लेटर (LC) दिले आहे. हे लेटर बांग्लादेशच्या कृषी बॅंकेतून देण्यात आले आहे.
झारखंडमध्ये अदानी समूहाचे 800-800 मेगावॅटचे दोन युनिट आहेत. अदानी पॉवरने देखील BPDB कडून $15-20 दशलक्ष देय देण्याची मागणी केली आहे, नाहीतर अदानी पॉवर हाऊलमधून मागील आठवड्यात बंद केलेले पहिले 800 मेगावॅट युनिट पुन्हा सुरू करणार नाही. अशी धमकी देण्यात आली.
हेही वाचा-ॲपल कंपनीला या एआय कंपनीने टाकले मागे, बनलीये जगातील सर्वात मोठी कंपनी!
सुमारे 10वर्षांपूर्वी 2015 मध्ये अदानी समूह आणि बांग्लादेशमध्ये वीजपुरवठ्याबाबत करार झाला होता. हा वीज खरेदीचा करार 25 वर्षांचा आहे. असं सांगण्यात आलं होतं. या करारानुसार अदानी बांग्लादेशाला 10 टक्के वीजपुरवठा देणार असल्याचे नमूद झाले.
सध्या बांग्लादेशाला (IMF) कडून कर्ज देण्यात आल्याने बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्ड अदानी समूहाचे कर्जाची परतफेड करत आहे. असं बांगलादेश पॉवर डेव्हलपमेंट बोर्डच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे. दरम्यान जुलै ते ऑक्टोबर दरम्यान अदानी पॉवरची देयके सुमारे $400 दशलक्ष आहेत. बांगलादेशने त्यातील निम्म्याहून कमी पैसे दिले आहेत. त्यामुळे कर्जाची संपूर्ण परतफेड करण्यासाठी बांग्लादेश प्रयत्नशील आहे. असं देखील सांगण्यात आलं आहे.