Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OLA Uber: महाराष्ट्र सरकारची नजर आता ओला-उबरवर,’ॲग्रीगेटर नियम 2025′ मुळे काय बदलणार? वाचा सर्व माहिती

नवीन नियमांनुसार चालकांना सरासरी दोन-स्टार रेटिंग राखणे आवश्यक आहे. जर एखाद्या चालकाचे रेटिंग या पातळीपेक्षा कमी झाले तर त्यांना प्रशिक्षणातून जावे लागेल आणि त्यांना अॅपमधून तात्पुरते काढून टाकले जाईल.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 11, 2025 | 09:21 AM
महाराष्ट्र सरकारची नजर आता ओला-उबरवर,'ॲग्रीगेटर नियम 2025' मुळे काय बदलणार? वाचा सर्व माहिती

महाराष्ट्र सरकारची नजर आता ओला-उबरवर,'ॲग्रीगेटर नियम 2025' मुळे काय बदलणार? वाचा सर्व माहिती

Follow Us
Close
Follow Us:
  • “महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रीगेटर नियम, 2025” या मसुदा नियमांची घोषणा
  • ओला , उबर, ई-रिक्षा, बाईक-टॅक्सी सेवांसाठी नवीन आणि कठोर नियम लागू
  • ई-रिक्षासह सर्व प्रवासी मोटार वाहनांच्या ॲग्रीगेटरना लागू
मुंबई : राज्यातील ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांमध्ये (जसे की ओला, उबर, रॅपिडो) अधिक शिस्तबद्धता, पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनाने “महाराष्ट्र मोटर वाहन ॲग्रीगेटर नियम, २०२५” या मसुदा नियमांची घोषणा केली. हे नियम मोटर वाहन कायदा, १९८८ च्या कलम ७३, ७४ आणि ९३ अंतर्गत प्रस्तावित असून, १७ ऑक्टोबर २०२५ पर्यंत या हरकती व सूचना मागविण्या आल्या असून त्यानंतर लागू होईल . अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. या नव्या नियमांमुळे ॲग्रीगेटर कंपन्या, चालक आणि प्रवासी यांच्यातील संबंध अधिक पारदर्शक होतील तसेच भाडे, सेवा गुणवत्ता, चालकांचे हक्क आणि प्रवासी सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत.

आता No Traffic Jam ! सी-लिंक, बीकेसी ते विमानतळ मार्गाला जोडणारा नवा भुयारी मार्ग, कुठून कसा असेल मार्ग?

नियम यांना लागू होणार

हे नियम ई-रिक्षासह सर्व प्रवासी मोटार वाहनांच्या ॲग्रीगेटरना लागू होतील. म्हणजेच, ओला-उबरसारख्या कॅब सेवांसोबत ई-रिक्षा सेवा देखील या चौकटीत येतील. तसेच, बाईक-टॅक्सी सेवांसाठी स्वतंत्र “महाराष्ट्र बाईक-टॅक्सी नियम, २०२५” लागू राहतील आणि त्यासाठी वेगळा परवाना घ्यावा लागेल.

परवाना शुल्क आणि सुरक्षा ठेव

राज्य परिवहन प्राधिकरण (प्रति जिल्हा)

परवाना देणे ₹१०,००,०००, परवाना नूतनीकरण ₹२५,०००

प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (प्रति जिल्हा)

परवाना देणे ₹२,००,०००, परवाना नूतनीकरण ₹५,०००

याशिवाय ॲग्रीगेटरला वाहनसंख्येप्रमाणे सुरक्षा ठेव द्यावी लागेल.

वाहनांची संख्या १०० बस किंवा १००० वाहनांपर्यंत- सुरक्षा ठेव – १० लाख

वाहनांची संख्या १००० बस किंवा १०,००० वाहनांपर्यंत – सुरक्षा ठेव – २५ लाख

वाहनांची संख्या १००० हून अधिक बस किंवा १०,००० हून अधिक वाहनं सुरक्षा ठेव – ५० लाख

भाड्याचे नियमन

सर्ज प्राइसिंग :

मागणी वाढल्यास ॲप भाडे वाढवू शकेल, परंतु ते प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ठरवलेल्या मूळ भाड्याच्या दिड पटापेक्षा जास्त नसावे.

मागणी कमी झाल्यासही भाडे मूळ दराच्या २५ टक्के पेक्षा कमी ठेवता येणार नाही.

सुविधा शुल्क :

राइडरकडून आकारले जाणारे सुविधा शुल्क मूळ भाड्याच्या ५ टक्के पेक्षा जास्त नसावे, आणि एकूण कपात मूळ भाड्याच्या १० टक्के पेक्षा अधिक नसावी.

चालक आणि वाहनांवरील अटी

कामाचे तास:

चालक एका दिवशी जास्तीत जास्त १२ तास ॲपवर लॉग-इन राहू शकतो. त्यानंतर किमान १० तासांची विश्रांती घ्यावी लागेल.

प्रशिक्षण

ॲग्रीगेटरकडे जोडण्यापूर्वी चालकांना ३० तासांचा प्रेरणा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करावा लागेल.

रेटिंग व्यवस्था

चालकाचे सरासरी रेटिंग पाचपैकी दोन स्टार्सपेक्षा कमी असल्यास त्याला सुधारात्मक प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि तोपर्यंत ॲपवरून काढण्यात येईल.

विमा

प्रवाशांना ५ लाख रुपयांपर्यंतचा प्रवास विमा घेण्याचा पर्याय ॲपमध्ये अनिवार्यपणे उपलब्ध असावा.

वाहनाची मर्यादा

ऑटोरिक्षा व मोटारकॅब — नोंदणीपासून ९ वर्षांपेक्षा जास्त जुन्या नसाव्यात.

बस ८ वर्षांपेक्षा जुनी नसावी.

 ॲप आणि वेबसाइटच्या अटी

ॲप मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध असावे.

चालकाला राइड स्वीकारण्यापूर्वी प्रवाशाचे गंतव्यस्थान दिसणार नाही, असे ॲप डिझाइन असावे.

प्रवाशाला लाइव्ह लोकेशन शेअरिंग व प्रवास स्थिती पाहण्याची सुविधा ॲपवर असावी.

दिव्यांग प्रवाशांसाठी विशेष सुविधा अनिवार्य असतील.

Mangal Prabhat Lodha: छट पूजेदरम्यान मेट्रो आणि बससेवा उशिरापर्यंत सुरू; मंत्री लोढांच्या प्रयत्नांना यश

FAQs(संबंधित प्रश्न)

प्रश्न 1. कोणाला लागू होणार हे नियम?

हे नियम ई-रिक्षासह सर्व प्रवासी मोटार वाहनांच्या ॲग्रीगेटरना लागू असतील. म्हणजेच, ॲप-आधारित कॅब सेवांसोबत आता ई-रिक्षा सेवा देखील या नियमांच्या चौकटीत येतील.

प्रश्न 2. भाड्याचे काय आहेत नियम?
नव्या नियमांमुळे ॲप-आधारित सेवांमधील भाड्याच्या मनमानीवर नियंत्रण येणार आहे. सर्ज प्राइसिंगला (Surge Model) मर्यादा घालण्यात आली आहे.

प्रश्न 3.चालक आणि वाहनांसाठी अटी काय?
कामाचे तास निश्चित करण्यात आले आहेत. चालक एका दिवशी जास्तीत जास्त 12 तास ॲपवर लॉग-इन राहू शकतो. त्यानंतर त्याला किमान 10 तासांची विश्रांती (Rest) घेणे बंधनकारक असेल.

Web Title: Maharashtra aggregator rules 2025 ola uber fare cap surge pricing limited to 1 5 times driver working hours fixed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 09:21 AM

Topics:  

  • maharashtra
  • Pratap Sarnaiik

संबंधित बातम्या

Housing Schemes: ७२० लाभार्थ्यांना मिळणार हक्काचे घर; घरकुलासाठी ७.२० कोटींचा निधी मंजूर
1

Housing Schemes: ७२० लाभार्थ्यांना मिळणार हक्काचे घर; घरकुलासाठी ७.२० कोटींचा निधी मंजूर

Karjat News : लाल मातीची कर्जत तालुक्यातून वाहतूक, महसूल विभागाकडून कारवाईचा बडगा
2

Karjat News : लाल मातीची कर्जत तालुक्यातून वाहतूक, महसूल विभागाकडून कारवाईचा बडगा

Maharashtra Politics: भाजपचे मौन, मित्रपक्ष अस्वस्थ! महापौरांचा मुकुट कोणाच्या डोक्यावर; मनपात राजकारण तापले
3

Maharashtra Politics: भाजपचे मौन, मित्रपक्ष अस्वस्थ! महापौरांचा मुकुट कोणाच्या डोक्यावर; मनपात राजकारण तापले

Karjat News : लाडक्या बहिणींना शासकीय वस्तीगृहात अन्नधान्याची आबाळ, महिला बालविकास विभागाचा अनागोंदी कारभार
4

Karjat News : लाडक्या बहिणींना शासकीय वस्तीगृहात अन्नधान्याची आबाळ, महिला बालविकास विभागाचा अनागोंदी कारभार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.