Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Metro 12A : मानपाडा ते तळोजा मेट्रोला मंजुरी! ‘१८.४० किमीचा मार्ग, साडेतीन वर्षांत काम पूर्ण होणार’ – मुख्यमंत्री फडणवीस

Mumbai Metro 12A : मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रो कनेक्टिव्हिटीला चालना देण्यासाठी मानपाडा-काटई नाका ते तळोजा मेट्रो मार्गिका १२-अ ला मंजुरी देण्यात आली आहे. १८.४० किमी लांबीच्या या प्रकल्पात १२ उन्नत स्थानके आणि एकात्मिक उड्डाणपुलाचा समावेश आहे.

  • By विवेक
Updated On: Oct 27, 2026 | 07:35 PM
फोटो सौजन्य- gemini

फोटो सौजन्य- gemini

Follow Us
Follow Us:
  • मेट्रो मार्गिका १२-अ ला मंत्रिमंडळ समितीची मंजुरी
  • १८.४० किमीचा मेट्रो मार्ग, १२ उन्नत स्थानकांचा समावेश
  • १३,८५६ कोटींचा प्रकल्प; साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य
 

Mumbai Metro 12A : मानपाडा-काटई नाका ते तळोजा (कल्याण फाटा मार्गे) या भागाला जोडणाऱ्या १८.४० किमी लांबीच्या मुंबई मेट्रो लाईन १२-अ ला मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीने मंजुरी दिली. हा मार्ग पुढील साडेतीन वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.

मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक मंत्रालयातील मंत्रिमंडळ कक्षात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, नगर विकास विभागाचे अपर मुख्य सचिव असीमकुमार गुप्ता, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी उपस्थित होते.

मेट्रो मार्गिका १२-अ मुळे औद्योगिक आणि लॉजिस्टिक केंद्रांशी संपर्क वाढण्याबरोबरच कल्याण-डोंबिवली आणि नवी मुंबई शहरांमधील वाहतूक जोडणी अधिक सक्षम होणार आहे. त्यामुळे ही मार्गिका साडेतीन वर्षात पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले. तसेच राज्यातील जी मेट्रोची कामे सुरू आहेत, त्या कामांचा वेग वाढवून ती वेळेत पूर्ण होतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

Ola-Uber, Rapido चालकांची काटेकोर तपासणी करा; दोषींवर गुन्हे दाखल करा, प्रताप सरनाईकांचे निर्देश

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मानपाडा-काटई नाका ते तळोजा (कल्याण फाटामार्गे) प्रस्तावित मेट्रो मार्गिका १२-अ या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या मंजुरीसाठी सादर केला होता. या मार्गिकेमुळे रस्ते प्रवासाच्या तुलनेत ४० ते ५० टक्के प्रवासवेळ वाचणे अपेक्षित असल्याचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी यावेळी सांगितले.

असा आहे प्रकल्प

ही संपूर्ण मेट्रो मार्गिका उन्नत असून त्यावर १२ स्थानके प्रस्तावित आहेत. प्रकल्पात ६.९३ किलोमीटर लांबीचा चारपदरी आणि ८.६९ किलोमीटर लांबीचा सहापदरी एकात्मिक उड्डाणपूल समाविष्ट आहे. या मार्गिकेवर दररोज ४ लाख ७४ हजार प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे.

काटई नाका येथे मेट्रो मार्गिका १२ व बुलेट ट्रेन जोडमार्ग, काटई नाका ते कल्याण फाटा दरम्यान मेट्रो मार्गिका १४ आणि अमनदूत येथे नवी मुंबई मेट्रो मार्गिका १ शी जोडणी प्रस्तावित आहे. सर्व स्थानकांवर फीडर बससेवाही प्रस्तावित आहे.

या प्रकल्पामुळे रस्ते प्रवासाच्या तुलनेत प्रवासासाठी लागणारा वेळ ४० ते ५० टक्क्यांनी कमी होणे अपेक्षित आहे. सार्वजनिक वाहतुकीची उपलब्धता आणि विविध वाहतूक माध्यमांतील सुविधा वाढल्याने खासगी वाहनांचा वापर कमी होण्यास मदत होईल. परिणामी कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात घट होण्यासह राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची घनता कमी होणे अपेक्षित असल्याचे यावेळी सांगण्यात आले. प्रवासाचा वेळ कमी करणे, रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी, पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला चालना देणे आणि प्रादेशिक आर्थिक विकासासाठी सक्षम वाहतूक व्यवस्था निर्माण करणे ही उद्दिष्ट्ये या प्रकल्पामुळे साध्य होणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या प्रकल्पाची अंमलबजावणी करणार आहे. मेट्रो मार्गिका आणि एकात्मिक उड्डाणपुलाच्या अंमलबजावणीसाठी प्राधिकरणाला विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त करण्याचासही यावेळी मान्यता देण्यात आली. प्रकल्पाच्या प्रभाव क्षेत्रातील निश्चित शासकीय जमिनी प्रकल्प विकास व निधी उभारणीसाठी प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यासही यावेळी मंजुरी देण्यात आली.

Mira-Bhayandar : मिरा-भाईंदरमध्ये पाणीटंचाईचा कहर! टँकरचे दर 50 टक्क्यांनी वाढले

💡

Frequently Asked Questions

  • Que: मानपाडा-काटई नाका ते तळोजा मेट्रो मार्गिका १२-अ किती लांब आहे?

    Ans: ही मेट्रो मार्गिका १८.४० किलोमीटर लांबीची असून, संपूर्ण मार्ग उन्नत असेल. त्यावर एकूण १२ स्थानके प्रस्तावित आहेत.

  • Que: मेट्रो मार्गिका १२-अ चा प्रकल्प खर्च किती आहे?

    Ans: या प्रकल्पासाठी १३ हजार ८५६.३७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. मेट्रो मार्गिकेसोबत एकात्मिक उड्डाणपुलाचाही या प्रकल्पात समावेश आहे.

  • Que: मेट्रो मार्गिका १२-अ कधी पूर्ण होणार?

    Ans: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प पुढील साडेतीन वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: Mumbai metro 12a manpada katai naka taloja metro approved vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 27, 2026 | 07:33 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • kalyan news
  • MMRDA
  • Mumbai Metro
  • Thane news

संबंधित बातम्या

Karjat torrent Power Project : ओमराजे निंबाळकरांचा सरकारला घरचा आहेर, वृक्षतोडीवरून राजकारण पेटलं…
1

Karjat torrent Power Project : ओमराजे निंबाळकरांचा सरकारला घरचा आहेर, वृक्षतोडीवरून राजकारण पेटलं…

Aaditya Thackeray : ‘मरण आलं तरी चालेल, पण लढा थांबणार नाही!’ साय डोंगरातील वृक्षतोडीवरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट इशारा
2

Aaditya Thackeray : ‘मरण आलं तरी चालेल, पण लढा थांबणार नाही!’ साय डोंगरातील वृक्षतोडीवरून आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना थेट इशारा

Rustomjee New Tower : ठाण्यात घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! रुस्तमजीने लाँच केला 58 मजली टॉवर; रूफटॉप पूल, बाल्कनीसह बरंच काही
3

Rustomjee New Tower : ठाण्यात घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! रुस्तमजीने लाँच केला 58 मजली टॉवर; रूफटॉप पूल, बाल्कनीसह बरंच काही

Kalyan News : ७० वर्षांपासून राहत असलेल्या कुटुंबांवर घर सोडण्याची वेळ? कल्याणच्या आतिश खान कंपाऊंडचा प्रश्न ऐरणीवर
4

Kalyan News : ७० वर्षांपासून राहत असलेल्या कुटुंबांवर घर सोडण्याची वेळ? कल्याणच्या आतिश खान कंपाऊंडचा प्रश्न ऐरणीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.