Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 12.10.2026
Maharashtra to World Breaking News :
पुण्यात गेल्या ११ दिवसांपासून एस. एम. जोशी पुलावर सुरू असलेले MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन शासन मध्यस्थीनंतर अखेर स्थगित करण्यात आले. तसेच, MPSCचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असून तुकाराम मुंडे यांची समितीच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
मान्सूनचा हंगाम संपला असला तरी बहुतांश भागांत हवामानात अचानक बदल; हवामान खात्याकडून महाराष्ट्रासह २४ राज्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. दिल्लीतील आंदोलनादरम्यान पोलिसांकडून ताब्यात घेतलेले CJP नेते अभिजीत दिपके, सौरभ दास आणि रांका यांची कोर्टाकडून जामिनावर सुटका करण्यात आली आहे. शारदीय नवरात्रौत्सवाच्या दुसऱ्या दिवशी राज्यातील तुळजापूर, महालक्ष्मी आणि सप्तशृंगी देवीच्या मंदिरांमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले.
.
12 Oct 2026 09:30 AM (IST)
#MPSC विद्यार्थी सत्याग्रहाचा अखेर विजय…!✌🏻🥳
विजय एकजुटीचा, जिद्दीचा.. आणि चिकाटीचा…!
#MPSC_विद्यार्थी_सत्याग्रह #MPSC #विद्यार्थी_एकजूट #विजय_एकजुटीचा https://t.co/27N29WfeAM
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 11, 2026
12 Oct 2026 09:24 AM (IST)
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत टीम इंडियाने शानदार कामगिरी करत निर्णायक आघाडी घेतली आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा १४ धावांनी पराभव केला आहे.प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी २२३ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होतेया सामन्यात युवा फलंदाज अभिषेक शर्माची बॅट जोरदार तळपली, ज्यामुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली. भारताच्या २२३ धावांच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ निर्धारित षटकांत ७ गडी गमावून २०९ धावांपर्यंतच मजल मारू शकला.
12 Oct 2026 09:15 AM (IST)
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आवश्यक नियोजन व रणनीती आखण्याच्या दृष्टिकोनातून आज (१२ ऑक्टोबर) नागपुरात भाजपची एक महत्त्वाची बैठक पार पाडणार आहे. नागपूर पदवीधर मतदारसंघ पाच लोकसभा क्षेत्रांमध्ये विस्तारलेला असून, या बैठकीत प्रत्येक लोकसभा मतदारसंघानिहाय निवडणुकीसाठी भाजपच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. आज दुपारी तीननंतर कोराडी येथील नैवेद्यम हॉलमध्ये या बैठकीला सुरुवात होईल. भाजपचे बंडखोर अनिल सोले यांचे बंड शमवण्यासाठी पक्षाचे अनेक नेते पडद्यामागून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न अजूनही करत आहेत.
12 Oct 2026 09:05 AM (IST)
आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेले एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागणीनुसार, एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार हे पेपरफुटी प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावरून दूर राहत सक्तीच्या/माजी रजेवर गेले आहेत. त्यांनी याबाबत स्वतः ट्विट करून माहिती दिली होती.
पेपरफुटी प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी राज्य सरकारतर्फे उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यासह इतर तज्ज्ञांचा समावेश आहे. राज्य सरकार आगामी ३ वर्षांत ७० हजार रिक्त पदांची भरती करणार असून, २०२७ मधील 'गट क' परीक्षेच्या पदांमध्ये दुप्पट वाढ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.






